Arthasakshar RBI Bonds info Marathi
https://bit.ly/2BWjimr
Reading Time: 3 minutes

 बदलत्या व्याजदाराचे नवे आरबीआय बॉण्ड

आजपासून नवीन स्वरूपातील सरकारी बॉण्ड (Govt. Bond), आरबीआय (RBI) कडून विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. यापूर्वी विक्रीस उपलब्ध असलेले अशा प्रकारचे ७.७५% करपात्र व्याजदर असलेले रोखे २९ मे २०२० पासून बंद करण्यात आले, त्यांची जागा हे बॉण्ड घेतील. यावरील व्याज दर सहा महिन्यांनी मिळेल पूर्वी असे व्याज सहा महिन्यांनी देय स्वरूपात अथवा मुदती अखेर संचयित स्वरूपात घेता येत असे. आता ते संचयित स्वरूपात मिळणार नाही. तसेच या बॉण्डवरील व्याजदर बदलत्या स्वरूपाचा असेल तो राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदरापेक्षा ०.३५% जास्त असेल.

प्रधानमंत्री मुद्रा योजना…

योजनेचे नाव फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉण्ड २०२० (Floating Rate Saving Bond) करपात्र  असून, योजनेची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे- 

  • बॉण्ड निवासीधारकास उपलब्ध असून ते व्यक्तीस स्वतःच्या नावे अथवा सहधारकासह, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) यांना घेता येतील मात्र अनिवासी भारतीयांना ते घेता येणार नाहीत. 
  • हे बॉण्ड राष्ट्रीयकृत बँका व खाजगी बँकांच्या निवडक शाखेत विक्रीसाठी उपलब्ध असून ते लेजर फॉर्ममध्ये उपलब्ध असतील. 
  • यासाठी धारकाच्या डी मॅट खात्याची जरुरी नाही. भविष्यात ते बिगर बँकिंग संस्थेच्या माध्यमातूनही विक्रीस उपलब्ध करून देण्याचा मनोदय आहे.
  • ₹२० हजार पर्यंतचे बॉण्ड रोख रक्कम स्वीकारून त्यावरील गुंतवणूकीसाठी चेक, डी डी, ऑनलाईन पेमेंट यांचा वापर करावा लागेल. 
  • हे बॉण्ड कोणत्याही मर्यादेशिवाय मूळ किमतीस उपलब्ध आहेत. ₹१०००/- (दर्शनी मूल्य) आणि त्या पटीत कितीही, त्यावरील व्याज पुढील सूचना मिळेपर्यंत संचित स्वरूपात मिळणार नाही. 
  • बॉण्ड जरी इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये असले तरी ते ज्यांच्याकडून वितरित केले जातील त्यांच्या खात्यातच (लेजर फॉर्म) धारकाच्या नावे राहतील. वितरित करणाऱ्या संस्थेकडून गुंतवणूक केल्याचे प्रमाणपत्र धारकास दिले जाईल.
  • बॉण्डवरील व्याजदर सहा महिन्यांनी १ जानेवारी व १ जुलै रोजी देण्यात येईल. 
  • चालू सहामाहीसाठी व्याजदर ७.१५% असेल. यात दर १ जानेवारी व १ जुलै रोजी बदल होईल पहिला बदल १ जानेवारी २०२१ रोजी होईल. हा दर NSC वरील व्याजदराशी जोडण्यात आला असून तेव्हा असलेल्या प्रचलित दराच्या ०.३५% हून तो अधिक असेल.
  • यावरील व्याज पूर्णपणे करपात्र असून ते धारकाच्या एकूण उत्पन्नात मिळवून, त्याने मान्य केलेल्या कर प्रणालीप्रमाणे उत्पन्नाची मोजणी त्यावर प्रचलित दराने त्यावर कर द्यावा लागेल. 

ए टी १ बॉण्ड – जोखमीची गुंतवणूक

  • देय व्याजावर मुळातून करकपात केली जाईल अशी कपात टाळण्यासाठी १५ H अगर १५ G फॉर्म देता येणार नाही. 
  • आयकर खात्याकडून संबंधित व्यक्तीचे करपात्र उत्पन्न करपात्र नसल्याचे प्रमाणपत्र मिळवल्यास अशी करकपात टाळता येईल अन्यथा  विवरणपत्र भरून ते परत मिळवावे लागेल.
  • बॉण्डची मुदत ७ वर्ष असून ६० ते ७० वयोगटातील जेष्ठ नागरिक ६ वर्षांनंतर, ७० ते ८० वयोगटातील व्यक्ती ५ वर्षानंतर तर ८० वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना ४ वर्षानंतर त्यांची इच्छा असल्यास त्यातील रक्कम काढून घेता येईल.
  • हे बॉण्ड अहसत्तांतरणीय असून, जर धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या सहधारकाच्या किंवा वारसाच्या नावे करण्यात येतील.
  • दुय्यम बाजारात याची विक्री करता येणार नाही तसेच कर्ज मिळवण्यासाठी तारण म्हणून ठेवता येणार नाही.
  • बॉण्ड धारक किंवा एकल सहधारक यांना वारस नेमता येईल. 

बचत आणि गुंतवणूक यामधील मूलभूत फरक…

बॉण्ड कोणाला जास्त फायदेशीर ठरतील?

  • ज्यांचे उत्पन्न करपात्र नाही अशा नागरिकांना उत्तम व्याजदर देणारे आणि पूर्णपणे सुरक्षित अशा स्वरूपाचे हे बॉण्ड आहेत. 
  • जेष्ठ नागरिक वैयक्तिक स्वरूपात वरीष्ठ नागरिक योजना (SCSS, करपात्र व्याजदर ७.४%, मुदत ५ वर्ष) अथवा प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY, करपात्र व्याजदर ७.४%, मुदत १० वर्ष) यात अधिकतम प्रत्येकी १५ लाख रुपये गुंतवणूक करून जर रक्कम शिल्लख राहात असेल आणि कर बसत नसेल, तर या योजनेत गुंतवणूक करून अधिक व्याज मिळवून निश्चित राहू शकतात. 
  • नियमितपणे उत्पन्नाची गरज असलेल्या सर्वांना त्यांच्याकडे याहून अधिक दरांच्या व्याजपर्यायांच्या उपलब्ध योजनांत गुंतवणूक करून बाकी रक्कम त्यात टाकता येईल.

बचत आणि गुंतवणुकीचे काही नियम…

सध्याच्या परिस्थितीत, जेष्ठ नागरिकांसह सर्वानाच हा अधिकचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. नजीकच्या काळात व्याजदर कमी होण्याची भीती असली तरी कोविड-१९ मधील ताळेबंदी शिथिल करत असताना ज्या नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात भाववाढ होण्यात होईल. याचा अप्रत्यक्ष परिणाम हे सध्या तळ  गाठलेल्या व्याजदरावर होईल. जेव्हा ते वाढतील तेव्हा भविष्यात अधिक दराने व्याज मिळू शकेल. व्याजदर कमी अधिक होणे ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. मुदत ठेवीपेक्षा ते  राष्ट्रीय बचतपत्रावर जास्त दराने मिळते त्याहून अधिक दराने व्याज या योजनेत मिळत राहून मुद्दल सुरक्षित राहील.

उदय पिंगळे

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…