पतंजली- आचार्य बाळकृष्ण यांचे साम्राज्य
पतंजली हा स्वदेशी ब्रँड अनेक प्रकारच्या उत्पादनांच्या माध्यमातून घराघरात पोचलेला आहे. पतंजलीचा सर्वांसमोर असणारा चेहरा जरी योग–गुरु बाबा रामदेव यांचा असला तरी पतंजली मधील ९८.६ टक्के शेअर्सची मालकी आचार्य बाळकृष्ण यांच्याकडे आहे.
‘मा यून’ ते ‘जॅक मा’ चा यशाचा प्रवास – भाग १…
- आजपर्यंत भारतामध्ये कोणी साधुसंत महात्मा यांच्याकडे फक्त एक धार्मिक व्यक्तिमत्व म्हणूनच पाहिलं गेलं आहे. परंतु आचार्य बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांनी या संकल्पनेला फाटा देत यांनी एक व्यवसाय सुरु केला आणि खूप कमी कालावधीमध्ये आज काही शेकडो कोटींपर्यंत नेऊन ठेवला आहे.
- याच आचार्य बाळकृष्ण यांचे नाव फोर्ब्स मासिकाच्या सर्वांत श्रीमंत भारतीयांमध्ये अंबानींसारख्या व्यक्तींच्या बरोबरीने घेतले जातात आहे.
- या यशस्वी वाटचालीची सुरुवात कशी आणि कधी झाली आणि आचार्य बाळकृष्ण यांनी हे कसे साध्य केले याचा इतिहास आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.
पार्श्वभूमी –
- शिक्षणासाठी गुरुकुलमध्ये असताना साधारण ९० च्या दशकामध्ये आचार्य बाळकृष्ण आणि रामदेव बाबा यांची भेट झाली.
- तिथे आचार्य बाळकृष्ण यांनी आयुर्वेदाबद्दल संपूर्ण ज्ञान घेतले, तर बाबा रामदेव यांनी योगाभ्यासावर त्यांचे लक्ष केंद्रित केले.
- काही वर्षांपूर्वी म्हणजे १९९५ मध्ये आचार्य बाळकृष्ण यांनी त्यांचा एक मित्र आणि बाबा रामदेव यांना सोबत घेऊन दिव्य फार्मसीची स्थापना केली.
- त्यानंतर पुढील काही वर्षातच त्यांनी बँकेकडून ६० कोटी रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेऊन ‘पतंजली आयुर्वेद‘ ची सुरुवात केली आणि विविध क्षेत्रामध्ये उतरून सलग ४ वर्ष दरवर्षी दुपटीने उत्पादनांच्या विक्रीमध्ये वाढ केली.
- आज हा ब्रँड आयुर्वेदिक उत्पादनांबरोबरच FMCG म्हणजेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन आणि विक्रीसाठी ओळखला जाऊ लागला आहे.
- यावर रामदेव बाबा म्हणतात, “आम्हांला कोणालाही खाली खेचायचे नाहीये तर देशवासियांना स्वदेशी उत्पादनांचा पर्याय उपलब्ध करून द्यायचा आहे ज्यामुळे देशातील पैसे देशाबाहेर न जात इथेच राहील.”
पतंजली उत्पादनांना मिळणारी पसंती –
- पतंजलीच्या उत्पादनांना खूप मोठ्या प्रमाणावर लोकांनी पसंती देण्याचे कारण जसे ‘स्वदेशी‘ उत्पादने हे आहे तसेच अत्यंत वाजवी किंमत हे देखील आहे.
- आचार्य बाळकृष्ण यांच्या कामाचे स्वरूप पाहता ते दिवसातील १५ तास काम करतात, कोणतीही सुट्टी न घेता, ज्याचा परिणाम म्हणजे २०१३ ते २०१७ मध्ये दरवर्षी सलग ४ वर्षे झालेली दुप्पट विक्री होय.
- या त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच २०१३ मध्ये ४५० कोटी रुपयांवरून पतंजलीने २०१७ मध्ये १०,५०० कोटींची मजल मारली आहे.
मा यून ते जॅक मा यशाचा प्रवास – भाग २ …
‘कोरोनील‘ –
- आचार्य बाळकृष्ण हे त्यांच्या कोणत्याही मीटिंगमध्ये, कोणत्याही बाबतीत फक्त ‘५ मिनिटांत‘ निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात.
- आज असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यामध्ये ‘पतंजली ‘ हे नाव नाही, अगदी खाद्यपदार्थांपासून ते कपडे, वीज निर्मिती, वैयक्तिक सुरक्षा ते आता तर अगदी क्लाऊड सर्व्हिसेस आणि आय टी सोल्युशन्स पर्यंत सर्व पराकारची उत्पादने पंतजलीने बनवली आहेत.
- आज जेव्हा कोरोना सारख्या महामारीचा भयानक प्रादुर्भाव सर्व जगावर पसरला असताना ‘पतंजली‘ ने नुकतेच कोरोनावर ‘कोरोनील‘ नावाचे पूर्णपणे आयुर्वेदिक औषध बाजारात आणले आहे.
- पतंजलीच्या म्हणण्यानुसार या औषधामुळे कोरोना बाधित व्यक्ती ३ ते १४ दिवसांमध्ये पूर्णपणे कोरोनातून मुक्त होते. ‘तसेच हे औषध हजारो कोरोना बाधित व्यक्तींना दिले असून त्यांचा बरे होण्याचा दर १००% आहे. या कारणास्तव अनेकांनी त्यांना खूप नावाजलं, तर अनेक जणांनी त्यांची टिंगलही केली.
- आजपर्यंत अशा अनेक संकटांवर आचार्य बाळकृष्णनी यशस्वीपणे मात केली आहे.
जेफ बेझोस आणि अमेझॉनच्या यशाचे रहस्य…
आरोप -प्रत्यारोप –
- २०१६ साली त्यांच्यावर आणि बाबा रामदेव यांच्यावर फसवाफसवीचे आरोप करण्यात आले होते.
- या आरोपांमध्ये सीबीआयचे असे म्हणणे होते की वाराणसी येथील पूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय येथून त्यांनी घेतलेली त्यांची पदवी खोटी आहे.
- हे आरोप या दोघांनीही नाकारले होते. परंतु हे इतके टोकाला गेले होते की सीबीआयने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला आचार्य बाळकृष्ण यांचा पासपोर्टही बनावट असल्याच्या कारणावरून तो रद्द करण्याची विनंतीही केली होती.
- पुढे त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्याने २ वर्षानंतर त्यांना क्लीन चिट देण्यात आली.
- त्यानंतर २०१७ मध्ये आचार्य बाळकृष्णाची गणना ‘१०,००० करोड‘ मिळवणाऱ्यांमध्ये झाली आणि ते भारतातील क्रमांक ८ चे सर्वांत ‘श्रीमंत‘ व्यक्ती बनले.
- वेदांचा सखोल अभ्यासाशिवाय इतर कोणतेही व्यावसायिक शिक्षण नसलेले आणि आणि अगदी तळागाळातून येऊन गर्भश्रीमंत बनलेल्या फार कमी व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होतो.
राकेश झुनझुनवाल – भारतीय शेअर बाजारातील बादशाह…
या सर्वांमध्ये आचार्य बाळकृष्ण यांनी त्यांची जवळजवळ ८० टक्के संपत्ती मागील काही वर्षांमध्ये गमावली आहे. पतंजली व्यवसायाची आर्थिक उलाढालही मागील २–३ वर्षांमध्ये खूपच घसरली असली तरी आत्ताच्या ‘चीनविरोधी‘ चळवळीचा फायदा होऊन पतंजली FMCG क्षेत्रात पुन्हा आपला चांगला जम बसवेल आणि पुनःश्च त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव मिळू शकेल.
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web Search: Acharya Balkrishna info in Marathi, Who is Acharya Balkrishna? Marathi info, Patanjali & Acharya Balkrishna marathi mahiti, Patanjali in Marathi