Reading Time: 2 minutes
शेअर ट्रेडिंग व्यवहार विरुद्ध गुंतवणूक
शेअर बाजारात (Stock Market) खरेदी-विक्री व्यवहार (Trading) आणि गुंतवणूक (Investment) हे दोन पर्याय प्रसिद्धआहेत. पैसे कमावण्याची ही दोन माध्यमे सामान्यतः पाहिली जातात. सर्वसाधारपणे शेअर बाजाराच्या दुनियेत जे नवीनच असतात त्यांना यामधला मूलभूत फरक माहित नसतो.
शेअर बाजार – गुंतवणूक निर्णयाचा पुनर्विचार?
- साधारणतः एखादी व्यक्ती गुंतवणूक करताना सहज एक प्रयत्न म्हणून काही रक्कम गुंतवते.
- भविष्यात त्या शेअरची किंमत वाढली की तो विकून फायदा करून घ्यायचाअसा आशावाद,हेच या प्रयत्नांमागचे मूळ कारण.
- समजा अंदाज चुकून शेअरची किंमत कमी झाली, तर ते शेअर न विकता किंमत वाढण्याची वाट पाहतात आणि नुकसान झालेच, तर ते भरून काढण्यासाठी आणखी रक्कम गुंतवतात थोडक्यात पुन्हा नवा आशावाद!
- अशा प्रकारे आधी गुंतवणूकदार बनण्याचे ठरवले नसतानाही काहीजण परिस्थिती किंवा नशिबाने गुंतवणूकदार बनतात.
- व्यवहार आणि गुंतवणूक या दोन्हींसाठीही बाजाराचा नीट अभ्यास आणि कौशल्य या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. व्यवहारामध्ये तांत्रिक गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक असते, तर गुंतवणुकीसाठी पायाभूत विश्लेषण जास्त उपयोगी ठरते.
Stock Market : शेअर बाजारातील वादळी काळात टिकण्यासाठी ५ गोल्डन टिप्स…
शेअर ट्रेडिंग व्यवहार विरुद्ध गुंतवणूक (Stock Trading Vs Investment)
शेअर्सचे व्यवहार(Trading) |
गुंतवणूक (Investment) |
निर्णयाचा पाया |
|
|
|
कालावधी |
|
|
|
फायदा आणि नफा |
|
|
|
गुंतवणूकदारांच्या ५ मूलभूत चुका…
- वर दिलेल्या तक्त्यामध्ये आपण शेअर्सचे खरेदी-विक्री व्यवहार आणि गुंतवणूक या दोन्हींचा दृष्टिकोन, त्यासाठीची विचारसरणी आणि त्यानुसार घेतले जाणारे निर्णय यावर सविस्तर माहिती पाहिली.
- दोन्ही प्रकारांपैकी कोणताही विचारात घ्यायचा म्हणाल तरी त्यासाठी शेअर बाजार म्हणजेच stock Market चा सविस्तर आणि व्यवस्थित अभ्यास करण्याची आवश्यकता असते.
- शेअर बाजार (stock Market) संदर्भाची खाचाखोचा माहिती होण्याइतपत तुमचा योग्य अभ्यास असेल आणि त्यानुसार तुम्ही अंदाज बांधून घेतलेला निर्णय योग्य ठरले, तर यातून खूप चांगली आर्थिक प्रगती साधता येऊ शकते.
- यामध्ये आणखी एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीचा विचार केला गेलाच पाहिजे तो म्हणजे यासाठी तुम्हाला द्यावा लागणार वेळ.
- तुम्ही तुमच्या रोजच्या वेळात किती वेळ शेअर्सच्या व्यवहारांसाठी देऊ शकता हे ठरवून त्यानुसार तुम्ही यापैकी योग्य त्या पर्यायांची निवड केली, तर ते तुमच्यासाठी केव्हाही जास्तच उपयुक्त ठरणार आहे.
Download Arthasaksharr App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web Search- What is Trading & investment in Stock Market? Marathi info, Trading vs Investment in marathi
Share this article on :