Stock Market : शेअर बाजारातील वादळी काळात टिकण्यासाठी ५ गोल्डन टिप्स

Reading Time: 2 minutes

शेअर बाजारातील वादळी काळात टिकण्यासाठी ५ टिप्स

Corona, Stock Market and Investors 

ट्रेडिंग (Trading) ही क्रिया आपणा सर्वांनाच आवडते. पैशांचा खणखणाट कुणाला नाही आवडणार? कधीकधी अशीही वेळ येते जेव्हा या क्षेत्रातील जाणकारांची देखील अचूक अंदाज बांधण्यात चूक होते. सध्या आपण अशाच अस्थिर काळातून जात आहोत.

नेहमी गुंतवणूक करणाऱ्यांकडे अशा काळात त्यांचा बचाव करणारी संरक्षणात्मक यंत्रणा असते. विरुद्ध बाजूने होणा-या अस्थिरतेपासून आपल्या पोर्टफोलिओचा बचाव करण्यास ते सक्षम ठरतात. या बचावात्मक दृष्टीकोनाची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:

गुंतवणुकीची ८ प्रमुख कारणे…

१. बाजाराच्या प्रवाहाचा आदर करा: 

 • सर्वप्रथम आणि महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक ट्रेडरने बाजाराच्या प्रवाहाचा आदर केला पाहिजे. 
 • बाजारात काही प्रसिद्ध तत्त्व आहेत. उदा. ‘भाव ही भगवान है’ आणि ‘ट्रेंड इज फ्रेंड.’ 
 • प्रत्येक ट्रेडरने दुराग्रह सोडून व्यापाराच्या दिशेचा आदर राखला पाहिजे, हेच यातून स्पष्ट होते. तरीही प्रवाहाचा कल पाहण्यासाठी आपण विविध रुपांतील सरासरीची रुपे वापरतो.

गुंतवणूकदारांच्या ५ मूलभूत चुका…

२. आर्थिक शिस्त पाळा: 

 • शिस्त हा तर प्रत्येकासाठी अंतर्मनातून आलेला प्रतिसाद असतो. मात्र बाजार अस्थिर झाल्यास, ट्रेडर्स आपल्या अंतर्ज्ञानाच्या विरुद्ध वागतात. 
 • भीती आणि लोभ या दोन्ही भावनांनुसार, मानवी पूर्वग्रह तयार होतात, त्यामुळे हे होत असावे. मात्र जोखीम व्यवस्थापन हा नेहमीच आपल्या गुंतवणुकीचा महत्त्वाचा पैलू असतो. 
 • जोखीम कमी करण्यासाठी कटाक्षाने नुकसान टाळणे आवश्यक आहे. कारण एखादा जतन केलेला पैसा हा कमावलेल्या पैशापेक्षा अधिक चांगला असतो.

३. लिव्हरेज्ड ट्रेडिंग टाळा: 

 • तुम्ही योग्य खेळी केली तर लिव्हरेज्ड ट्रेडिंग तुम्हाला उच्च परतावा देते. पण असे झाले नाही तर, तुम्ही गुंतवणूक केलेली संपूर्ण रक्कम गमावू शकता. 
 • कधी कधी काहीही क्लू न देता शेअर सामान्य ट्रेडमध्ये धोका देऊ शकतो. त्यामुळे लिव्हरेज्ड ट्रेडिंग ही तुम्हाला नेहमीच उच्च जोखिमीत टाकते. त्यामुळे हे टाळलेलेच बरे.

लॉकडाऊनचे रिअल इस्टेटवर होणारे परिणाम…

४. अंदाज बांधणे टाळा:

 • तुम्ही कोसळणारा चाकू पकडण्याचा प्रयत्न केल्यास, तुम्ही जखमी होण्याची शक्यता जास्त असते.
 • सध्यासारख्या स्थितीत सद्यस्थितीची ‘सरासरी’ काढण्यासारख्या क्रिया टाळल्या पाहिजेत. यातून बाजारातील आतील गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत. 
 • सर्वप्रथम गोष्टी स्थिर होऊ द्या आणि दर्जेदार प्रस्तावांमध्ये प्रवेश करणे सुरु करा.

५. कमी किंमतीचे शेअर्स घेणे टाळा: 

 • अशा संकटकाळात कमकुवत शेअर्स पेनी स्टॉक बनतात किंवा दोन अंकींच्या प्रदेशात प्रवेश करतात. 
 • कमी किंमतीत खरेदी करा आणि जास्त किंमतीत विका, ही बाजारातील प्रसिद्ध म्हण आहे. त्यामुळे ट्रेडर्स ते विकत घेताना दिसतात. 
 • सामान्यपणे, अशा प्रकारचे पेनी स्टॉक्स त्यानंतर वाढतच नाहीत. अर्थात त्यात काही अपवाद असतात. पण जोखीम घेण्याएवढे योग्य ते नसतात.

अनिश्चित उत्पन्न आणि गुंतवणूक नियोजनच्या ५ स्टेप्स…

वित्तीय अनिश्चितता आल्यास प्रत्येक गुंतवणूकदाराने अंगी बाणावेत असे काही गुण असतात. अशा काळात सोबत आलेल्या जोखीमींपासून तुमच्या पोर्टफोलिओचे रक्षण करण्यास ते दीर्घकाळ सहाय्य करतात. 

web Search – Corona impact on Stock Market Marathi, share bajarat pudhe kay Marathi, share baajar aani guntvnuk Marathi, korona ani share bajar marathi, corona ani guntvnuk Marathi 

– समित चव्हाण

मुख्य सल्लागार, टेक्निकल अँड डेरिव्हेटिव्हज, 

एंजल ब्रोकिंग लिमिटेड

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *