युपीआय विषयी काही महत्वाची प्रश्नोत्तरे
युपीआय (UPI) म्हणजेच ‘यूनिफाईड पेमेंट इंटरफेस’.आजच्या लेखात आपण युपीआय संदर्भातील काही महत्वाची प्रश्नोत्तरे (FAQ) पाहणार आहोत.
पैशांचे व्यवहार करण्याच्या युपीआय नामक नवीन पद्धतीच्या मदतीने आता तुमचा फोनच तुमचे डेबिट/क्रेडिट स्टेटमेंट झाला आहे. पैशांचे व्यवहारदेखील प्रत्यक्ष पैसे न हाताळताही अगदी मिनिटांमध्ये करणे आता शक्य होते आहे. QR कोडमुळे डिजिटल पेमेंट या संकल्पनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
भारतात वापरली जाणारी डिजिटल वॉलेट्स – भाग १
आपला देश हळू हळू यशस्वीरीत्या ‘पैसेविरहित अर्थकारणा’कडे (Cashless economy) वाटचाल करत आहे. याचे अगणित फायदे आहेत, त्यातले काही म्हणजे आता दरवेळी खिशात पैसे बाळगण्याचा धोका पत्करण्याची अजिबात गरज पडत नाही, यामुळे बरेच बदल झाले आहेत, भ्रष्ट्राचार, दलाली खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, फसवा फसवी खूपच नियंत्रणात येत आहे, लाचलुचपतीला आळा बसला आहे परिणामी गरजूंचे शोषण थांबायला याचा खूप मोठा हातभार यामुळे लागत आहे.
युपीआय (UPI) बद्दल महत्वाची प्रशनोत्तरे (FAQ)
1. युपीआय (UPI) हे नक्की काय आहे?
- या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. एकाच छताखाली बँकांच्या अनेक सेवा उपलब्ध असणारे अत्यंत सुरक्षित आणि सोयीस्कर छत म्हणजे युपीआय!
- यासाठी तुम्हाला फक्त एका युपीआय आयडीआणि त्यासाठीच्या पिन (PIN) ची गरज असते. याद्वारे तुम्ही मोबाइलला नंबरच्या आधारे देखील पैशांची देवाण-घेवाण करू शकता.
2. युपीआय या संकल्पनेचा कर्ताधर्ता कोण आहे?
- रिझर्व्ह बँक आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्या सोबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) पुढाकार घेऊन ही पद्धत विकसित केली.
- बँकांना अंतर्गत एकमेकांशी जोडून पैशांचे व्यवहार करण्याची परवानगी एनसीपीआय (NCPI) वैध करून देत असते.
- इमिजिएट पेमेंट सर्व्हिसेस (IMPS) म्हणजेच त्वरित पैसे पाठवण्याच्या या सुविधेची सुरुवातही ‘एनसीपीआय’ने केली होती.
- असे म्हणते येईल की युपीआय (UPI) हे आयएमपीएस (IMPS) ची सुधारित आवृत्ती आहे.
भारतात वापरले जाणारे डिजिटल वॉलेट्स – भाग २
3. युपीआय आयडी आणि पिन (PIN) म्हणजे काय असते?
- युपीआय आयडी म्हणजे तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर ‘@’ हे चिन्ह आहे नंतर तुम्ही या व्यवहारांसाठी जे अँप्लिकेशन वापरल्या त्याचे नाव असा असते.
- उदा. जर तुमचा मोबाइलला नंबर 88XXXXXX32 असा असेल आणि तुम्ही पेटीएम (Paytm) वापरात असाल, तर तुमचा युपीआय आयडी असू शकतो, ’88XXXXXX32@paytm’.
- हा आयडी बनवताना तुम्हाला तुमच्या बँकेची माहिती त्या ॲप्लिकेशन मध्ये द्यावी लागते. मग तुमच्या मोबाईल नंबर वर त्या बँकेकडून एक ओटीपी (One Time Password) येतो तो तुम्ही प्रमाणित केल्यावर तुमचा दिलेला मोबाईल नंबर बँकेकडे तुमच्या आर्थिक देवाण-घेवाणीसाठी नोंदवला जातो.आणि नंतर तुम्ही तुमचा PIN द्यायचा असतो.
- युपीआय पिन (PIN) म्हणजे चार अंकी पासवर्ड जो युपीआयद्वारे पैसे पाठवताना प्रत्येक वेळी टाकून तो व्यवहार प्रमाणित करावा लागतो.
- तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही पिन ठेवू शकता.
4. युपीआय नक्की काय काम करते?
- दरवेळी ज्यांना पैसे द्यायचे आहेत त्यांच्या खात्याची सर्व सविस्तर माहिती असण्याची युपीआय मुळे गरज पडत नाही.
- बहुतांश वेळा मोबाईल नंबरच्या माहितीवरही त्वरित पैसे पाठवता येतात किंवा तुमच्याकडे त्या व्यक्तीचा युपीआय आयडी असेल तरी तुमचे काम होऊ शकते.
5. युपीआय का वापरायचे?
- युपीआय मुळे तुम्ही ऑनलाईन कोणालाही काही सेकंदांमध्ये पैसे पाठवू शकता.
- तुमची जवळपास सर्व कामे याद्वारे होऊ शकतात. उदा. सर्व प्रकारची बिले भरणे, वस्तू खरेदी करणे, पैशांची देवाण-घेवाण करणे.
- या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला फार सविस्तर माहितीची गरज पडत नाही, तुमचे काम काही सेकंदांमध्ये अगदी रीतसर होते
- याला वेळेचे, जागेचे कोणतेही बंधन नसते, कधीही सुट्टी नसते
युपीआय (UPI) च्या माध्यमातून व्यवहार करताय ? सावधान
6. युपीआय सुरक्षित आहे का ?
- युपीआय हे अत्यंत सुरक्षित माध्यम आहे, याच्यावर घोटाळा करणे जवळजवळ अशक्य आहे.
- आयएमपीएस (IMPS) च्या माध्यमातून रोज ८००० करोड रुपयांचे व्यवहार होत असतात.
- तरीही योग्य ती काळजी न घेतल्यास या माध्यमातूनही फसवणूक होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने व्यवहार करताना सतर्क राहणे कधीही उत्तम.
7. युपीआय ॲप्स कोणकोणती आहेत?
- यूपीआय पेमेंट्सची सुविधा देणारी अनेक लोकप्रिय ॲप्स आहेत.
- यामध्ये गूगल पे, फोनपे, फ्रीचार्ज, मोबिक्विक, पेटीएम अशा ॲप्सचा समावेश आहे.
- आपण व्यवहार सुरू करण्यापूर्वी आपल्याला ॲपवर यूपीआय आयडी तयार करण्यासाठी आपली बँक खाते माहिती सत्यापित करणे आवश्यक आहे.
आपले आवडते ई-वॉलेट कितपत सुरक्षित आहे?
8. युपीआयची सुविधा देणाऱ्या बँका कोणत्या?
साधारण सर्वच महत्वाच्या बँका युपीआयची सुविधा देतात.
१. स्टेट बँक ऑफ इंडिया
२. आयसीआयसीआय बँक
३. ॲक्सिस बँक
४. एचडीएफसी बँक
४. युनियन बँक ऑफ इंडिया
५. बँक ऑफ महाराष्ट्र
अशा अनेक महत्वाच्या सरकारी व खाजगी बँका याला सहकार्य करतात.
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies