Reading Time: 3 minutes

नोटबंदीच्या काळात हा अनुभव प्रत्येकाला आला असेल, रु. ५००-१०० च्या नोटा बंद होऊन रु. २०००/- ची एक नोट मिळवण्यासाठी तासनतास एटीएमच्या रांगेत उभे रहावं लागत असे. मग कॅशलेस पर्यांयांचा विचार करा की! होय, आता बरेच व्यवहार कॅशलेस करता येऊ शकतात. मग प्रत्येक ठिकाणी रोख रक्कम जवळ ठेवण्याची भितीही नाही शिवाय व्यवहारही अगदी चोख व जलद. 

डिजिटल वॉलेट्स, ई-वॉलेट्स आणि मोबाईल वॉलेट्स अशा काही सेवांमुळे कॅशलेस व्यवहार सुलभ झाले आहेत. गेल्या ४ वर्षात मोदी सरकारच्या ‘कॅशलेस इंडिया’ या उपक्रमामुळे याचा वापर अधिक वाढला आहे. आता आपण आपले पैसे डिजिटल वॉलेट्स मध्ये ठेवू शकता, म्हणजे बँकेचं खातं या वॉलेटशी जोडून ऑनलाइन किंवा ऑफलाइन सुद्धा आर्थिक व्यवहार करता येतात. 

कॅश – लेसकॅश ते कॅशलेस

डिजिटल वॉलेट्स म्हणजे काय ? 

  • डिजिटल वॉलेट्स, मोबाइल वॉलेट्स किंवा ई-वॉलेट्स म्हणजे अशा सेवा आहेत ज्या काही इलेक्ट्रॉनिक्स साधनांच्या मदतीने (उदा-मोबाईल, कॉम्प्युटर) इंटरनेटद्वारे म्हणजे ऑनलाइन व्यवहार करून देतात. जिथे हातात रोख रक्कम असणे गरजेचे नाही. इंग्रजीत याला ‘कॅशलेस पेमेंट’असं म्हणतात. 
  • या डिजिटल वॉलेटला आपलं बँकेचं खाते व मोबाइल नंबर जोडता येतो. भारतात याचा वापर प्रचंड प्रमाणात वाढत आहे. व देश कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे.ज्यामुळे दैनंदिन आयुष्यातील अनेक व्यवहार सुलभ व जलदरित्या होत आहेत. 

१. पेटीएम (PayTM)-

  • पेटीएम हे २०१०साली लाँच करण्यात आलं. पेटीएम हे भारतातील सर्वात मोठे ई-वॉलेट आहे. देशभरात पेटीएमचा वापर करणारे १६ कोटी अधिक लोक आहेत. त्यात सुमारे २.२ अब्ज गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे.
  • पेटीएम द्वारे मित्रांना पैसे पाठवणे किंवा मिळवणे, भाजीपाला खरेदी, दुधवाला , न्हावी , दुकानदारांच बिल यासारखे व्यवहार करता येतात. तसेच, मोबाइल रिचार्ज, विजेचे बिल, फोन बिल, गॅस, विमा पॉलिसी यांचेही ऑनलाइन बिल भरता येते.सिनेमा तिकीटे, रेल्वे तिकीट, विमान तिकीटे, हॉटेल्स बुकिंग अशा कामांसाठी पेटीएम वापरता येते. 
  • याशिवाय पेटीएमद्वारे खात्यावरील पैसे सुद्धा पाठवता येतात.काही बुकिंग्स किंवा रिचार्जवर पेटीएमकडून कॅशबॅक ऑफर मिळतात. 
  • पेटीएम द्वारे केलेले व्यवहार सर्व ठिकाणी स्विकारली जातात. अलिकडे, पेटीएमने काही शैक्षणिक संस्थांशी भागीदारी केली आहे त्यामुळे कॉलेजची फी कॅशलेस भरता येऊ शकते. 

. गुगल पे (Google pay) –

  • ‘गुगल पे’ हे सर्वोत्कृष्ट डिजिटल वॉलेटपैकी एक आहे. ‘गुगल पे’ भारतीय बाजारात उशीरा वापरात आले असले, तरी ते बरंच लोकप्रिय झालं आहे. 
  • सध्या गुगल पे चे सुमारे २५ दशलक्ष वापरकर्ते आहेत. इतर ई-वॉलेट्स साठी आपला केवायसी (KYC)  असणे गरजेचे आहे, मात्र गुगल पे वापरण्यासाठी केवायसी बंधनकारक नाही. ही एक मोठी गोष्ट आहे. 
  • बिले भरणे, ऑनलाइन खरेदी, मोबाइल रिचार्ज यासारखे बरीच कामे गुगल पे द्वारे काही मिनिटात यशस्वी होतात. 
  • आपल्या बँकेचे खाते आणि फोन नंबर गुगल पे सोबत जोडल्यास तुम्ही इतर खात्यात पैसे ही पाठवू शकता, किंवा कोणाकडून तुमच्या खात्यात मिळवू शकता. त्यासाठी गुगल पे चा ‘युपीआय’ (UPI) असणे आवश्यक आहे. 

डीजिटलायझेशन आणि रोजगाराच्या संधी

३. मेझॉन पे ( Amazon Pay) – 

  • जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ‘मेझॉन’ने स्वत:च ई-वॉलेट तयार केले आहे, ज्याचं नाव ‘मेझॉन पे’ हे वॉलेट २००७ साली जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आले. 
  • भारतात याचा वापर २०१७ पासून सुरू झाला. सुमारे ३३ दशलक्षहून अधिक लोक मेझॉन पे डिजिटल व्यवहारासाठी वापरतात. 
  • पूर्वी मेझॉनवरून काही खरेदी केली, तर त्याचं पेमेंट करण्यासाठीच फक्त मेझॉन पे वापरलं जायचं. मात्र आता इतरही काही निवडक खरेदीवरील पेमेंट्ससाठी ॲमेझॉन पे वापरता येते. 
  • कॅशबॅक ऑफर किंवा इतर काही सवलतीही याद्वारे देण्यात येतात. ॲमेझॉन पे द्वारे ऑनलाइन पेमेंट्ससाठी साठी कुठलेही निर्बंध नसतात, मात्र आपल्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डची माहिती व्यवस्थित प्रविष्ट केली पाहिजे. ही माहिती ॲमेझॉन पे कडे सुरक्षित असते.  कुठल्याही अँड्रॉईड फोनवरून सुद्धा हे प चालवता येते. 

४. फोन पे (PhonePay) –

  • फोन पे येस बँकेद्वारे ४ वर्षांपूर्वी लाँच करण्यात आलं. केवळ ४ वर्षात १०० दशलक्ष लोकांनी हे प्लिकेशन डाउनलोड केलं आहे आणि यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, म्हणजेच हे लोकप्रिय डिजिटल वॉलेट आहे. फोनपे हे युपीआय (UPI) वर आधारित चालते. 
  • फोनपे पद्वारे युपीआय वापरून पेमेंट करता येते, तसेच फोनपे-ईवॉलेट वापरून ही पेमेंट्स किंवा व्यवहार करता येतात. क्यू-आर कोड पेमेंट्सपासून ते डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वापरूनही पेमेंट करता येते. 
  • फोनपे द्वारे बिल भरणे, पैसे पाठवणे सोपे जाते व आकर्षक कॅशबॅक ऑफर्सही मिळतात. फोनपे मध्ये आपण दिलेली माहिती सुरक्षित असते. फोनपे चे मोबाइल प्लिकेशन इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. 

५. मोबिक्विक( Mobikwik) –

  • अलिकडे इतर डिजिटल वॉलेट्सप्रमाणे मोबिक्विक द्वारे आर्थिक व्यवहार होतात.
  • वीज बिल, पाणी बिल, गॅस बिल यासारखी बिले याद्वारे भरता येतात. तसेच, मोबाइल व डीटीएच रिचार्जही करता येतो.
  • मोबिक्विकचं प्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. याचा वापर पैसे पाठवण्यासाठी होत नाही. 

आपल्या आवडते ई-वॉलेट कितपत सुरक्षित आहे?

या प्रत्येक डिजिटल वॉलेट्सच्या आर्थिक व्यवहाराच्या ठराविक मर्यादांनुसार आपण सुरक्षितरित्या व्यवहार किंवा पेमेंट्स सोप्या आणि जलदगतीने करू करू शकतो. 

सावधान !! ऑनलाईन फ्रॉड कॉल…

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.