अर्थसाक्षर कॅमस्कॅनर ॲपला ६ पर्यायी ॲप
https://bit.ly/2DXIgTz
Reading Time: 3 minutes

CamScanner –  कॅमस्कॅनर ॲपला 6 पर्यायी ॲप्स

कॅमस्कॅनर (CamScanner) ॲपला पर्यायी ॲप्स कुठली ? चिनी ॲप्सवर बंदी आल्यावर अनेकांसमोर निर्माण झालेला हा महत्वाचा प्रश्न!  दस्तावेज किंवा डॉक्युमेन्ट स्कॅन करण्यासाठी कॅमस्कॅनर नसेल, तर कुठले ॲप वापरायचे, या प्रश्नाला एक नाही, तर सहा उत्तरे आहेत. 

दस्तावेज स्कॅन करण्यासाठी लाखो वापरकर्ते कॅमस्कॅनरचा वापर करत होते. परंतु कॅमस्कॅनर व्यतिरिक्त स्कॅनिंगसाठी अनेक चांगली ॲप्स गुगल पे स्टोअर वर उपलब्ध आहेत. वॉटरमार्क काढण्याचे महत्वाचे वैशिष्ट्य कॅम स्कॅनरमध्ये नव्हते, ते देखील काही ॲप्समध्ये उपलब्ध आहे. 

https://bit.ly/2WB7NIT

CamScannerकॅमस्कॅनर ॲपला  ६ पर्यायी प्स

१. मायक्रोसॉफ्ट ऑफिस लेन्स (Microsoft Office Lens) 

  • मायक्रोसॉफ्टचे हे अ‍ॅप अनेक वैशिष्ट्याने भरलेले दस्तावेज स्कॅनर आहे, परंतु आपण मायक्रोसॉफ्ट इकोसिस्टममधील उत्पादने वापरत असल्यास, ते जास्त फायदेशीर आहे.
  • सर्व प्रकारचे दस्तावेज स्कॅन करण्याशिवाय, मायक्रोसॉफ्ट ऑफिस लेन्स हस्तलिखित, व्हाइटबोर्ड टेबल्स आणि रेखाचित्र वाचण्याजोगी बनविण्यासाठी उपयोगी आहे. 
  • हे अ‍ॅप वापरून आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि पॉवरपॉईंट मधील फाईल्स सहज स्कॅन करता येतात.
  • यामध्ये ओसीआर आणि ऑटो-एज स्कॅनिंग यासारखी वैशिष्ट्ये असून जोडीला मायक्रोसॉफ्टची विश्वासार्हता  आहे. 
  • बॅच स्कॅनिंगचा पर्याय मात्र यामध्ये उपलब्ध नाही.  

आत्मनिर्भर भारत:  शेतीपासून मनोरंजनापर्यंत फक्त स्वदेशी ॲप्स! 

२. अ‍ॅडोब स्कॅन (Adobe Scan)

  • अ‍ॅडोब स्कॅन या अल्गोरिदममध्ये तयार केलेल्या अ‍ॅपमध्ये अ‍ॅपमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. 
  • पावती, नोट्स, आयडी कार्ड किंवा कोणतेही दस्तावेज क्रॉप करून स्कॅन करण्याची सुविधा आहे. याशिवाय यामध्ये दस्तावेजची इमेज मोठी(enlarge) करता येते.  
  • यामधील सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ओसीआर (OCR) म्हणजेच चित्रांमधून अक्षरे (text) वेगळी करता येतात. 
  • चित्रांमधील मजकूर शोधण्यासाठी असणाऱ्या या ओसीआर क्षमतेमुळे अ‍ॅडोब स्कॅन दस्तावेजमधील वॉटरमार्क देखील काढून टाकते.

३. स्कॅनबॉट  (Scanbot)

  • स्कॅनबॉट हे ॲप वैशिष्ट्यांच्या बाबतीत कॅम स्कॅनरच्या बरोबरीचे आहे. 
  • यामध्ये सर्व प्रकारचे दस्तावेज स्कॅन करू शकतो शिवाय यामध्ये मल्टी-पेज स्कॅनिंग सुविधा उपलब्ध आहे, म्हणजेच यामध्ये एकाचवेळी अनेक पाने स्कॅन करता येतात..  
  • यामधील ओसीआर टेक्स्ट रिकग्नाझेशन (OCR text recognition) या वैशिष्ट्यामुळे वापरकर्त्यांना आपले दस्तावेज शोधणे सहज शक्य होते..

चिनी ॲप्सवर बंदी: ५ स्वदेशी ॲप्सचा पर्याय 

४. टॅपस्कॅनर (TapScanner)

  • टॅपस्कॅनर या ॲप मध्ये  ओसीआर, बॅच स्नॅनिंग सोबतच अजून दोन अतिशय महत्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. 
  • पहिले म्हणजे बारीक तपशीलवार स्कॅन केलेली कागदपत्रे तयार करण्यासाठी हे अ‍ॅप एकाच वेळी तीन चित्रे घेऊ शकते. 
  • दुसरे म्हणजे आपल्या सेव्ह केलेल्या पीडीएफ वर डिजिटल स्वाक्षरी करण्याची सुविधा. ही सुविधा इतर कोणत्याही अ‍ॅपमध्ये उपलब्ध नाही.  
  • याशिवाय या अ‍ॅपमध्ये कॅमस्कॅनर सारखे डॉक्युमेंट फिल्टर्स देखील उपलब्ध आहेत.
  • काही मोबाईल डिव्‍हाइसेसवर इतर अ‍ॅप्‍सपेक्षा याचा स्पीड कमी असल्यामुळे वापरकर्ते काहीसे नाराज होतात, परंतु यामधील वैशिष्ट्ये बघता, ही गोष्ट फारशी विचारात घ्यायची गरज नाही. 

५. गूगल ड्राईव्ह (Google Drive) 

  • आपल्यापैकी अनेकजण गूगल ड्राईव्हचा वापर करत असतील परंतु या अ‍ॅपला दस्तावेज स्कॅन करण्याची सुविधा आहे, हे फार कमी लोकांना माहिती असेल.
  • अर्थात इतर पर्यायांच्या तुलनेत ड्राइव्हमध्ये कमी वैशिष्ट्ये आहेत. परंतु दस्तावेज स्कॅन करून लगेच पाठवायचं असेल, किंवा दस्तावेजामधला कंटेंट फक्त रेफरन्स अथवा माहिती पुरताच वापरायचा असेल, तर तुमच्या मोबाईलवर असणारा गुगल ड्राईव्ह हा पर्याय तुमच्यासाठी सर्वात उत्तम!
  • गुगलची सर्व वैशिष्ट्ये एका छताखाली मिळवायची असतील, तर या अ‍ॅपचा वापर करणे फायद्याचे आहे. 
  • ऑफिस डॉक्युमेंट किंवा महत्वाचा पुरावा म्हणून दस्तावेज स्कॅन करायचे असल्यास मात्र हे अ‍ॅप फारसे सोयीचे नाही. 

Farmitra app : शेतकऱ्यांच्या सर्व गरजांसाठी उपयुक्त “फार्मित्रा ॲप”

६. फोटोस्कॅन (Photoscan)

  • फोटोस्कॅन हे गूगलचे अ‍ॅप केवळ कागदपत्रांसाठी नसून चित्रांसाठी आहे.
  • या अ‍ॅपमध्ये ओसीआर आणि बॅच स्कॅनिंग यासारखी वैशिष्ट्ये नाहीत, परंतु फोटोंचा विचार केला तर तपशील न घालवता फोटो स्कॅन करू शकतो. 
  • अ‍ॅपची अल्गोरिदम उत्कृष्ट आहेत. दस्तावेजच्या कडा स्वत: शोधून काढतात, उच्च प्रतीची चित्रे घेतात आणि डाग दूर करून स्वच्छ दस्तावेज आपल्याला मिळते.  
  • या अ‍ॅप मधून स्कॅन केलेले दस्तावेज स्कॅनरमधून स्कॅन केलेल्या दस्तावेजसारखेच दिसते.  

“झूम ॲप” संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: alternatives to camscanner app Marathi Mahiti, best options to camscanner app Marathi mahiti,  camscanner app options in marathi, camscanner app la paryay konate 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.