Reading Time: 2 minutes

कोविड-१९ कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अनेक उद्योग- व्यवसाय बंद आहेत. शक्य ते व्यवसाय घरून ऑनलाईन पद्धतीने केले जात आहेत. नोकरदार वर्गालाही घरून ऑनलाईन काम करावे लागत आहे (Work From Home). याच वर्क फ्रॉम होम मध्ये सर्वांत जास्त गाजलेले मोबाईल ॲप आणि सॉफ्टवेअर म्हणजे ‘झूम ॲप. 

झूमचा वापर करून ‘बॉस’ आपल्या कर्मचाऱ्यांसोबत अगदी सहजपणे ऑनलाईन मिटिंग करू शकतो. तसेच व्यावसायिक आपल्या गुणतंवणूकदार, पार्टनर किंवा गिऱ्हाईकांसोबत ऑनलाईन चर्चा करू शकतो. तेही अगदी मोफत! एका वेळी जास्तीत जास्त १०० जणांसोबत साधारणतः ४५ मिनिटाची मिटिंग मोफत करता येते. 

“वर्क फ्रॉम होम”साठी काही महत्वाच्या टीप्स

झूमचा वापर करून मिटींग कशी घ्यायची?

 • झूमचे विंडोज, अँड्रॉइड आणि आयओएस असे व्हर्जन आहेत, त्यापैकी कशाचाही वापर आपण करू शकतो. मोबाईलवर आधी ॲप इन्स्टॉल करून घ्यावे. 
 • झूम साठी सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे कॅमेरा. मोबाईल आणि लॅपटॉपला फ्रंट कॅमेरा असतोच, तसेच डेस्कटॉपसाठीही वेबकॅम वापरता येऊ शकतो. 

मिटिंग घेण्यासाठी :

 1. ‘झूम’च्या अधिकृत वेबसाईट zoom.us वर जाऊन किंवा ऍप मध्ये ‘Host A Meeting’ वर क्लीक करा. 
 2. शक्यतो मिटिंग कॅमेरा न वापरता होऊ शकत नसल्यामुळे ‘With Video On’ निवडा. 
 3. त्यानंतर लॉगिन करणे गरजेचे असते, गुगल किंवा फेसबुकचा वापर करून लॉगिन करता येऊ शकेल. किंवा ईमेल पासवर्डचा वापर करून नोंदणी करता येईल. 
 4. लॉगिन झाल्यावर झूमचे प्रोफाइल उघडेल. त्यात “Meetings” पर्याय निवडा. 
 5. नवीन मिटिंग घेण्यासाठी ‘Schedule a New Meeting’ वर क्लीक करा. 
 6. मिटिंगचा विषय, तपशील भरून झाल्यानंतर खाली मिटिंगची तारीख आणि वेळ निवडावी.
 7. मिटिंग किती वेळ चालू शकते त्यानुसार Duration निवडावा. ‘फ्री’ वापर करणार असाल तर केवळ ४५ मिनिटेच मिटिंग ठेवता येते. 
 8. मिटिंगमध्ये ‘बिन बुलाए मेहमान’ येऊ नये असे वाटत असेल, तर पासवर्ड सेट करावा. 
 9. व्हिडीओ चालू ठेवणे – मिटिंग घेणारा (Host) आणि उपस्थित दोघांचेही व्हिडिओ बघण्यासाठी ‘ON’ निवडावा. 
 10. ऑडिओ Both च राहू द्यावा. 
 11. वरील सर्व माहिती सेव्ह करण्यासाठी ‘सेव्ह’ वर क्लिक करावे.  
 12. त्यानंतर मिटिंग आयडी आणि लिंक तयार होईल. ती लिंक त्या सर्वांना पाठवावी ज्यांना तुम्हाला मिटिंगला बोलवायचे आहे. 
 13. मिटिंगच्या वेळेनुसार मिटिंग सुरु करा. 
 14. एक एक करून सर्व मेम्बर दिसू लागतील. 
 15. मिटिंग संपल्यावर आपोआप मिटिंग बंद होईल किंवा त्या आधी बंद करायची असल्यास ‘End Meeting’ वर क्लीक करावे. 

अशाच पद्धतीने मोबाईलवरूनही मिटिंग करता येते. 

सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा

मिटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी:

दुसऱ्या व्यक्तीने तयार केलेल्या मिटिंग मध्ये सहभागी होण्यासाठी अगदी सोप्या स्टेप आहेत. 

 1. मोबाईल ॲप किंवा झूम वेबसाईटवर ‘Join a Meeting’ वर क्लिक करावे आणि दिलेला मिटिंग आयडी टाकावा किंवा समोरच्याने पाठवलेल्या “झूम मिटिंग लिंक”वर क्लीक करावे. 
 2. मिटिंगमध्ये तुमचा प्रवेश होईल. 
 3. कॅमेरा किंवा माईक चालू बंद करण्यासाठी योग्य त्या बटणाचा वापर करावा. 
 4. जर मधूनच मिटिंग सोडायची असल्यास ‘Leave Meeting’ पर्याय निवडावा. 

तुमचा मोबाईल सुरक्षित आहे का?

झूम सायबर सुरक्षेच्या दृष्टीने नापास का ठरते ?

 • झूमच्या संपूर्ण यंत्रणेमध्ये काही त्रुटी आहेत. झूमचे विंडोज, अँड्रॉइड आणि आयओएस असे व्हर्जन आहेत, त्यात प्रत्येकात काही ना काही चुका आहेत. 
 • काही महिन्यांपूर्वीच ‘आयओएस व्हर्जन’ मध्ये एका मोठ्या त्रुटीसाठी, झूमचे मालक ‘एरीक युआन’ यांना सर्वांची माफी मागावी लागली होती. त्यानंतर ॲप मध्ये बदल करण्यात आले आहेत.
 • झूममध्ये असणारी सर्वांत मोठी त्रुटी म्हणजे व्हाट्सअप प्रमाणे यात एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन (End – to – End Encryption) नाही, म्हणजेच जर हॅक करायचे ठरवले, तर झूम मीटिंगमध्ये चाललेला संवाद कधीही सार्वजनिक होऊ शकतो. 

सायबर सुरक्षेसाठी काही महत्वाच्या टिप्स

त्रुटी असल्या तरी सध्याच्या काळात गैर खाजगी मिटिंग आणि वेबिनार यासाठी झूम ॲप अत्यंत उपयोगी आहे. 

– ओंकार गंधे 

९४२२५८३७३९

(लेखक सायबर सुरक्षा विश्लेषक व डिजिटल मार्केटिंग सल्लागारआहेत.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
2 comments
 1. Cyber Security Today’s need.
  I would like to read more about Cyber Security in marathi and english.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

वाचनाचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 2 minutes वाचायचे कशासाठी? त्यातही नेमके काय वाचायचे, त्याचा फायदा काय? असे प्रश्न तुम्हालाही पडतात का? वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी काय करावे? ज्ञान मिळवण्याशिवाय वाचनाचा काय फायदा असतो? अशा सगळ्या प्रश्नांची उकल आपण या लेखात करूया.

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…

सहलीचे नियोजन करताना लक्षात ठेवा या ७ महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutes सहल म्हटलं की आठवते ती शाळेची बस, ते मित्र-मैत्रिणी आणि शाळेचे हवेहवेसे वाटणारे दिवस! या कल्पना त्याकाळीही खूप आनंददायी वाटायच्या. हल्ली मात्र सहलीच्या कल्पना बदलल्या आहेत. हल्ली ट्रीपसाठी बाहेर पडायचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या सहलीची ठिकाणे, सोबतीला लागणारे साहित्य, खाण्याचे पदार्थ वगैरे वगैरे. योग्य नियोजन नसेल, तर अचानक येणा-़या अडचणींमुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. सहलीच्या नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स –