Arthasakshar Education Loan शैक्षणिक कर्ज
https://bit.ly/30gCyF4
Reading Time: 3 minutes

Education Loan: शैक्षणिक कर्ज

आजकाल शैक्षणिक कर्ज (Education Loan) अनेक विद्यार्थी घेतात. दिवसेंदिवस शिक्षण महागडं होत चाललं आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग सारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी किंवा परदेशात उच्च शिक्षण घ्यायचं असल्यास लाखो रुपयांचा खर्च येतो. अशावेळी शैक्षणिक कर्जाची खूप मोठी मदत होते.

२००४ सालापासून २०१२ पर्यंतच्या काळात शैक्षणिक कर्जाच्या मागणीत २३℅ वाढ दिसून आली. पण कुठलंही कर्ज घेताना काही नियम व अटी लक्षात घ्यायला हव्यात. शैक्षणिक कर्जाचं पुढे मोठ ओझं होऊ नये यासाठी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. 

कर्ज वसुली : वसुली अधिकाऱ्यांनी जेरीस आणले आहे का? मग हे कराच

कॉलेज /कोर्सची निवड करताना

  • परदेशात जायचं म्हणून किंवा अन्य कोणी ॲडमिशन घेतली म्हणून कोर्स निवडू नका. जर खरंच तुम्हाला तो अभ्यासक्रम शिकण्यात स्वारस्य असेल तरच तो कोर्स निवडा व नंतरच शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करा.
  • आपण बऱ्याच मोठमोठी कॉलेजेस आणि विद्यापीठांची नावे ऐकून असतो. मात्र प्रवेश निश्चित करण्याअगोदर कॉलेजच्या प्लेसमेंट धोरणाविषयी पूर्व माहिती असणे आवश्यक आहे. 
  • प्लेसमेंटची सुविधा चांगली असल्यास चांगली नोकरी मिळणे व कर्ज परतफेडीचं नियोजन करणे सोयीचे होते. 
  • जाहिरातीतल्या  “१००% प्लेसमेंट असिस्टंस” आणि “१००%  प्लेसमेंट गॅरंटी” या दोन संकल्पना समजून घ्या. उगाचच प्लेसमेंट शब्द आहे, म्हणजे कोर्स पूर्ण झाल्यावर नोकरी मिळेलच असं नाही.
  • प्लेसमेंट असिस्टंस म्हणजे फक्त नोकरीसाठी मदत असा अर्थ होतो. यामध्ये नोकरी मिळवून संस्था देत नाही. 

कर्ज नामंजूर होण्याची ११ कारणे

शैक्षणिक कर्ज – महत्वाच्या गोष्टी (Education Loan:Important points)

  • जेव्हा तुम्ही शैक्षणिक कर्ज घेण्याचा विचार करता त्यावेळी स्वतः बँकेत जाऊन बँकेच्या अटी व पात्रतेच्या नियमांची माहिती घेणे आवश्यक असते. 
  • तुम्ही निवडलेला कोर्स ,कॉलेज आणि विद्यापीठ ,तिथे मिळणाऱ्या प्लेसमेंट्स किंवा नोकरीच्या संधी या सर्व गोष्टींबद्दल तुम्ही जागरूक आहात, याचीही माहिती बँकेला देणे आवश्यक असते. सामान्यत: शैक्षणिक कर्जामध्ये तुमचे शिक्षण शुल्क, वसतिगृह, लायब्ररी फी, पुस्तके व कोर्स मटेरियल अशा विविध खर्चाचा समावेश असतो.
  • काही बँका विशिष्ट रकमेपर्यंत वाहन खरेदी, विमा संरक्षण, विनामूल्य क्रेडिट कार्ड इत्यादींसारख्या अतिरिक्त सुविधादेखील प्रदान करतात
  • अर्जदाराने सर्व अटी व शर्थीचे पालन केलेले असल्यास, अर्ज केल्यानंतर साधारणतः १५ दिवसांच्या आत कर्ज मंजूर केले जाते. 
  • कर्ज घेताना जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणे चांगले.

स्वप्नातल्या वस्तू खरेदी करण्याचा उत्तम पर्याय – कन्झ्युमर ड्युरेबल लोन (Consumer durable loan)!

Education Loan: शैक्षणिक कर्ज कुठल्या बँकेकडून घ्यावे?

  • देशांतर्गत असो किंवा परदेशी शिक्षण घायचे असो बँका सर्व प्रकारच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांना कर्जसुविधा देतात . 
  • आपण कुठल्या बँकेकडून कर्ज घ्यायचं, हे आपल्या सोयीनुसार आणि कर्जाच्या आवश्यकतेनुसार ठरवावे.  
  • बँक निवडताना हफ्त्याची पद्धत, परतफेडीच्या अटी ,व्याजदर या गोष्टींकडे लक्ष द्यावे. 
  • मुदतीच्या आधी कर्ज फेडता येऊ शकते का, याबद्दलच्या नियम व अटी समजून घ्याव्यात. 
  • सर्वात जास्त कर्जाची रक्कम देणाऱ्या बँकेपेक्षा सर्वोत्तम ऑफर देणारी बँक निवडणे फायद्याचे ठरेल. 
  • काही बँक मुलींसाठी ०.५% ते १% कमी व्याजदर आकारतात. त्यासंदर्भात माहिती घ्या. 

डिफॉल्टर होऊ नका 

  • कर्ज घेताना विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांच्याही सह्या घेण्यात येतात. याचाच अर्थ या कर्जामध्ये पालक सह-कर्जदार असतात. 
  • कर्जाचे हफ्ते नियमितपणे भरले गेले नाहीत, तर ९० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बँक तुमचे नाव  कर्ज न फेडणाऱ्यांच्या यादीत म्हणजे  ‘डिफॉल्टर लिस्ट’मध्ये टाकते. 
  • यामुळे भविष्यात विद्यार्थी व पालक दोघांच्याही क्रेडिटवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणून जर तुम्ही कर्जाचे हफ्ते वेळेवर फेडण्यास अक्षम असाल, तर तुम्ही बँकेला विश्वासात घेऊन तुमच्या परतफेडीची मुदत वाढवून घेऊ शकता. कर्जाची परतफेड करणे शक्य नसेल तर कर्ज घेतानाच योग्य नियोजनपूर्वक घ्यावे.

आपल्या पाल्याच्या भवितव्याचं नियोजन कसे कराल ?

परतफेडीचे नियोजन? (Repayment Strategy)

  • मोरॅटोरिअम कालावधी’ नंतर म्हणजेच अभ्यास संपल्यानंतर एक वर्षानंतर किंवा नोकरी मिळाल्यानंतर सहा महिन्यांनंतर, जे आधी असेल त्यापासून परतफेड सुरू होते. 
  • ईएमआय सुरू होण्यापूर्वी कर्जदाराकडे परतफेड करण्याचे धोरण असले पाहिजे.
  • विद्यार्थी कर्जदारांना अनेक सवलती मिळतात. या सवलती विद्यार्थ्यांवर येणारे परतफेडीचे ओझे कमी करण्यासाठी वापरल्या जाऊ शकते.
  • खर्च कमी करून बचतीस प्रारंभ करा. 
  • बँक कोर्सच्या किंवा सेमेस्टरच्या शेवटी वितरणाच्या वेळेपासून व्याज आकारण्यास सुरू करते. ही रक्कम वाढतच राहते.
  • ईएमआय कमी करण्यासाठी कोर्स  चालू असताना काही प्रमाणात रक्कम भरू शकता. या कालावधीत तुम्ही व्याज दिले, तर  ईएमआय मोठ्या प्रमाणात कमी होईल. 
  • कित्येक बँका स्थगिती कालावधीत व्याज भरणार्‍यांना एक टक्का व्याज सवलतही देतात.
  • परतफेड करण्याची क्षमता पाहून बँका कर्ज वाढवतात. अर्थात ही गोष्ट सहसा कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संधीवर आणि विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर अवलंबून असते. परंतु, कर्ज घेणारा चांगले उत्पन्न किंवा नोकरी मिळविण्यात अयशस्वी झाला, तर काय करावे?

मुलांना अर्थसाक्षर कसे बनवाल?

वेळेवर नोकरी न मिळाल्यास काय कराल ?

  • काही बँका कर्ज पुढे ढकलण्यास परवानगी देतात, परंतु यासाठी बँकेला भविष्यात कर्ज फेडण्याची हमी  द्यावी लागते. अर्थात ही गोष्ट  तशी कठीण आहे.
  • मुदतवाढ देताना बँक अनेक गोष्टींचा अत्यंत बारकाईने विचार करते. उदा. विद्यार्थ्यांची क्षमता, विश्वासार्हता, शैक्षणिक प्रगती, इत्यादी.
  • अपवादात्मक परिस्थितीमध्ये बँक विचार करून कर्जफेड करण्यास मुदतवाढ देऊ शकतात, उदा. सध्याची कोरोना महामारी.

शैक्षणिक कर्ज घेऊन अनेक हुशार विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवले आहे. मुळात हुशार मुलांचे शिक्षण ‘पैसा’ या कारणामुळे थांबू नये हाच शैक्षणिक कर्जाचा उद्देश आहे. त्यामुळे शैक्षणिक गरजेसाठी कर्ज घेण्यासाठी अजिबात कमीपणा बाळगू नका, मात्र ते घेताना परतफेडीचे नियोजन आधीच करून ठेवा. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Education Loan Marathi Mahiti, Education Loan in Marathi, Education Loan Marathi 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutesउद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes“खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutesथोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…