पैसा कसा वापरायचा?
https://bit.ly/34swQRd
Reading Time: 3 minutes

पैसा कसा वापरायचा?

तुम्हाला एकवेळ शेअर्स, स्टॉक, बॉण्ड्स, विमा, क्रेडिट कार्ड, याबद्दल माहिती नसेल तरी चालेल पण “पैसा कसा वापरायचा” याबद्दलचं योग्य ज्ञान मात्र हवं. जर हे ज्ञान असेल, तर तुम्ही पैशाचे व्यवस्थापन करण्यात यशस्वी झालात म्हणून समजा.

आर्थिक नियोजनातील पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे आपले पैसे म्हणजेच आपली आर्थिक स्थिती समजून घेणे आणि नंतर सुज्ञपणे त्याचे व्यवस्थापन  करण्यास सक्षम असणे.

हे नक्की वाचा: कोरोना संकट – दहा कलमी आर्थिक नियोजन 

‘आपले पैसे’ किंवा आर्थिक स्थिती कशी ठरते?

१. आपले उत्पन्न आणि खर्चः 

  • आपण काय कमवता आणि कुठे व किती खर्च करता यावरून आपल्या गरजा भागल्यानंतर आपल्याकडे किती पैसे शिल्लक राहणार आहेत यावरून तुमची बचत ठरते.
  • उत्पन्न आणि खर्चाचे ‘संतुलन’ हा आर्थिक व्यवस्थापनामधील सर्वात महत्वाचा घटक आहे व  यावरूनच तुमची आर्थिक परिस्थिती ठरत असते.
  • दरमहा केलेली चांगली बचत तुम्हाला उत्तम आर्थिक स्थितीकडे घेऊन जाते.

२. आपली मालमत्ता आणि कर्जे:

  • आपल्याकडे असलेल्या मालमत्तेची  किंमत आपली सद्य आणि भविष्यातील आर्थिक स्थिती ठरविते.
  • उदा. सोने / चांदी, ठेवी, साठा, म्युच्युअल फंड, कला / प्राचीन वस्तू, जमीन इत्यादी मालमत्ता आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यात मदत करतात. तर दुसरीकडे, आपली  कर्जे आर्थिक स्थिती कमकुवत करतात. 

इतर लेख: आर्थिक नियोजनाचे महत्व : आर्थिक नियोजन आणि सक्षम कुटुंब 

तुमची आर्थिक परिस्थिती निव्वळ तुमच्याजवळ किती पैसे आहेत यावर ठरत नाही. तुमची आर्थिक परिस्थिती खर्च, मालमत्ता व जबाबदाऱ्या या साऱ्याचा मेळ तुम्ही कसा घालता यावर तुमची आर्थिक परिस्थिती ठरते. पुढील उदाहरणांवरून हा विषय जास्त स्पष्ट आहे. 

नाव  वय 

(वर्षे)

उत्पन्न 

(रु.)

उत्पन्नाचा मार्ग  सरासरी मासिक खर्च (रु.) बचत 

(रु )

गुंतवणूक / (रु.) क्रेडिट कार्ड / कर्ज हप्ता 

(रु.) 

अमर  २२ ५०,००० नोकरी 

(कॉल सेंटर )

४२००० ३२,००० 

(क्रेडिट कार्ड  ओव्हरड्यू )

राजेश  २९ ३०,००० नोकरी (बँक क्लार्क) २०००० ४८०००

गृहकर्ज हप्ता  ८०००

संध्या  २५ १५,००० गृहिणी (पतीकडून मिळणारे उत्पन्न) ५००० प्रति माह 

 (३०००० च्या निधीसाठी तरतूद )

गौरव  १९ विद्यार्थी 

 म्युच्यअल फंड ५०००

 वरील कोष्टकाचा नीट अभ्यास केल्यास लक्षात येईल – 

  • अमर आणि राजेश नोकरी करून स्वतंत्र उत्पन्न कमावत आहेत. तर संध्या गृहिणी असून गौरव अजून विद्यार्थी दशेत आहे.  
  • अमरचा खर्च जास्त असून क्रेडिट कार्ड ओव्हरड्युही आहे.
  • राजेशचे गृहकर्ज असून मासिक गृहकर्ज हप्ता ८०० रुपये आहे. 
  • संध्याचे स्वतःचे उत्पन्न नसूनही पतीकडून मिळणाऱ्या पैशातून ५०० रुपये प्रतिमाह बाजूला ठेवून ३००० रुपयांच्या आपत्तकालीन निधीसाठी तरतूद करत आहे.
  • गौरवने त्याला महिन्याला खर्चासाठी मिळणारे पैसे (पॉकेटमनी), वाढदिवसाला मिळालेले पैसे, विविध स्पर्धांमधून मिळालेली रोख रकमेची बक्षिसे असे मिळालेले सर्व पैसे एकत्र करून ५००० रुपयांचा म्युच्युअल फंड गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार केला आहे. 

संबंधित लेख: आर्थिक नियोजन: आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स

विश्लेषण: पैसा कसा वापरायचा?

  • या उदाहरणांमध्ये निव्वळ उत्पन्नाचा विचार केल्यास अमरची आर्थिक स्थिती सर्वात उत्तम आहे असे तुम्हाला म्हणता येईल, पण त्याची आर्थिक परिस्थिती खरंच उत्तम आहे का? 
  • अचानक नोकरी गेल्यास उत्पन्नाचे एकमेव साधन बंद होईल. त्यानंतर काय? ना त्याने बचत केली ना गुंतवणूक ना आपत्तकालीन निधीची तरतूद. 
  • अशा परिस्थितीमध्ये अमरची आर्थिक स्थिती चांगली आहे असं नक्कीच म्हणता येणार नाही.
  • अमरचे खर्च जवळपास त्याच्या उत्पनाइतकेच आहेत. शिवाय क्रेडिट कार्डची ओव्हरड्यू रक्कमही जास्त आहे. त्यामुळे या सर्वांमध्ये अमरची आर्थिक स्थिती सर्वात जास्त वाईट आहे.
  •  याउलट बाकीच्या तिघांची आर्थिक स्थिती त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत ठीकठाक आहे असं म्हणता येईल. कारण या तिघांनीही बचत / गुंतवणूक / आपत्तकालीन निधी  यापैकी किमान एका गोष्टीचा विचार केला आहे. 
  • राजेशने घरखर्च सांभाळून घरही घेतले आहे व गृहकर्जाचा हप्ता असूनही बचतही बऱ्यापैकी आहे. 
  • संध्या गृहिणी असूनही पती जे काही पैसे हातात देतो त्यातून ५००० रुपये बाजूला ठेवून ती आपत्तकालीन निधीची तरतूद करत आहे. यासाठी ३०००० रुपये  साठविण्याचं ध्येयही तिने निश्चित केलं आहे. 
  • गौरवने तर विद्यार्थी दशेतच अगदी लहान वयातच पैशाचे महत्व ओळखून आपल्या जवळच्या पैशांची गुंतवणूकही सुरु केली आहे.
  • या साऱ्याचा विचार करता महिन्याला एकही पैसा न कमावणाऱ्या गौरवची आर्थिक स्थिती सर्वात उत्तम आहे.  

वरील चार उदाहरांवरून असे लक्षात येते की आर्थिक परिस्थिती ही उत्पन्न , खर्च , मालमत्ता (Assets), देणी (Liabilities) यांसारख्या विविध बाबींचा परिपाक आहे. तुम्ही किती कमावता यापेक्षा मिळालेल्या पैशाचे कसे नियोजन करता यावर तुमची आर्थिक स्थिती अवलंबून असते. म्हणूनच आर्थिक नियोजन करण्यापूर्वी ‘पैसा कसा वापरायचा?’ ही गोष्ट शिकून घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.