Reading Time: < 1 minute
  • अर्थार्जन हा जगण्यासाठी आवश्यक असणारा मूलभूत घटक आहे. आपण कमावलेल्या पैशाचे योग्य नियोजन व विनियोग करणे खूप आवश्यक आहे. यासाठी गरज असते ती अर्थसाक्षरतेची!
  • या जाणिवेतूनच आम्ही संपुर्णपणे आर्थिक विषयाला वाहून घेतलेली अर्थसाक्षर.कॉम ही वेबसाईट सुरु केली. इंटरनेटवर आर्थिक विषयांवर आधारित अनेक लोकप्रिय वेबसाईट आहेत, पण त्या इंग्रजी व हिंदीमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही अर्थसाक्षर करणारी आर्थिक विषयांची सविस्तर माहिती, आपल्या मायबोली मराठीतून लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम करणारी ‘अर्थसाक्षर’ ही एकमेव वेबसाईट आहे.
  • दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या आर्थिकसमस्यांपासून आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींपर्यंत सर्व प्रकारचे लेख अर्थसाक्षरवर उपलब्ध आहेत. तसेच  घरगुती आर्थिक नियोजनासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनापासून देशाच्या अर्थसंकल्पाचे तज्ञांनी केलेले परीक्षणही इथे वाचायला मिळेल. 
  • गेल्या वर्षभरात आपल्याकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादासमुळेच अर्थसाक्षर आज हजारो लोकांपर्यंत पोचण्यात यशस्वी झाले आहे. आपल्याकडून मिळणाऱ्या सूचना व आपल्या शंका यामुळे आम्हाला नवीन लेख लिहिताना मार्गदर्शन मिळत आहे.
  • वाचकांकडून आलेल्या प्रश्नांपैकी महत्वाचा प्रश्न म्हणजे, “अर्थसाक्षर पुस्तक रूपाने उपलब्ध आहे का?”
  • खरंतर आम्ही हा विचार केला नव्हता. पण सर्व स्तरातील जनतेपर्यंत पोचून त्यांना अर्थसाक्षर करायचे असल्यास, पुस्तक हा सर्वात प्रभावी मार्ग आहे, अशी आमची खात्री पटली आणि आम्ही पुस्तक प्रकाशनाचा निर्णय घेतला.
  • या पुस्तकच्या आखणीसाठी आपलं मोलाचं सहकार्य आवश्यक आहे. यासाठी फक्त खालील लिंकला क्लिक करून त्यावरील फॉर्म भरून आम्हाला लेखांच्या निवडीसाठी मदत करा.

                  लिंक : http://bit.ly/Question_Form


(अधिक माहितीसाठी आम्हाला info@arthasakshar.com वर संपर्क करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…