कार घेताय? थांबा… आधी हे वाचा

Reading Time: 3 minutes

भारतामध्ये स्वतःची कार असणे हा प्रेस्टीज इशू असतो. घरात चार चाकीचा ऐरावत उभा असणे म्हणजे मोठेपणा मानला जातो.  भारतीय लोक स्वतःच्या गाडीबद्दल, चारचाकी बद्दल, कारबद्दल, खूप भावनिक असतात. शेजाऱ्याने कार घेतली किंवा नातेवाईकांमध्ये कुणी कार घेतली की आपणसुद्धा कार घ्यायलाच हवी असं वाटतं. पण कार म्हणजे नक्की काय भानगड आहे? खरंच ती घ्यायला हवी का? आपण ती खरंच घेण्याच्या परिस्थितीत आहोत का? कार घेण्याचे फायदे व तोटे याचा विचार खोलात जाऊन प्रत्येक जण करत नाही.

आज आपण कार घेणे खरंच गरजेचं असतं का हे बघूया.

 • पुण्यात हिंजवडी येथे आयटी पार्कमध्ये तीन मित्र एकाच ऑफिसमध्ये काम करत आहेत. संदीप, अमित आणि केशव हे तिघे आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर्स आहेत. तिघेही कंपनीपासून पंधरा किलोमीटर दूर असलेल्या सोसायटीमध्ये ते राहतात.
 • आठवड्यातून चार दिवस तिघेही ऑफिसमध्ये काम करतात आणि एक दिवस वर्क फ्रॉम होम करतात. उरलेले दोन दिवस ते बाहेर फिरायला मॉल्समध्ये जातात,  मूव्हीज बघायला जातात, हँग आऊट करतात. त्यांच्या या कार्यपद्धती आणि लाइफ स्टाइलनुसार आठवड्यातून चार वेळा तीस किलोमीटर म्हणजे १२० किमी प्रवास  होतो. शनिवार किंवा किंवा रविवार ते तीस किलोमीटर दूर मॉल्स किंवा इतर ठिकाणी फिरायला जातात. या प्रकारे आठवड्याला एकशेपन्नास किलोमीटर, महिन्याला ६०० किलोमीटर आणि पूर्ण वर्षभरात ७२०० किलोमीटर त्यांचा प्रवास होतो.
 • यावर संदीप, अमित आणि केशव या यांनी काही तरी उपाय करण्याचं ठरवलं. तिघांनाही पंधरा हजार वेगळे दर महिन्याच्या येण्या जाण्याच्या खर्चाकरिता वेगळे काढून ठेवायचं ठरवलं. ठरवलेल्या पंधरा हजारांमध्येच महिन्याचा संपूर्ण प्रवास खर्च करायचा त्यांनी निर्णय घेतला.
 • संदीपला मात्र स्वतःची कार असावी अशी इच्छा होऊ लागली. त्यामुळे ऑफिसला जाताना किंवा नातेवाईकांमध्ये आपलं इम्प्रेशन पडेल त्याला वाटू लागलं. काही दिवसांनंतर संदीपने अभ्यास करून, रिसर्च करून  सहा लाखांची एक पेट्रोल कार विकत घेण्याचं ठरवलं.
 • संदीपने कार लोनसाठी बँकेकडे अर्ज केल्यावर, त्याला झिरो डाऊन पेमेंटवर चांगली ऑफर मिळाली. कर्जावरील मासिक हप्ते रक्कम कमी करण्यासाठी त्याने सात वर्षांच्या कालावधीची निवड केली.
 • कार लोनवर संदीपला दहा टक्के व्याज द्यावं लागणार होतं. या प्रकारे त्याचा महिन्याला दहा हजार मासिक हप्ता जाऊ लागला.
 • आठवड्याभरात संदीपकडे त्याच्या स्वतःच्या मालकीची कार आली. कार विकत असताना सेल्समनने त्या कारबद्दल खूप कौतुक केलं होतं, एक लिटरवर पंचवीस किलोमीटर तर कधी तीस किलोमिटर  पर्यंत ही कार मायलेज देईल. पण त्याने एक गोष्ट संदीपला सांगितलं नव्हतं की हे आकडे आदर्श परिस्थितीतील रोडवरील आहेत. पण भारतामध्ये रस्त्यांची आदर्श सोडा उलट रस्त्यांची अवस्था बिकट आहे. ट्राफिक जॅम्स, मध्येच अंगावरती येणारे स्पीड ब्रेकर्स, अरुंद रस्ते, कारचं एअर कंडिशनर कायम सुरू असणे या सर्व बाबींमुळे संदीपच्या गाडीचा ॲव्हरेज १५ किमी/ लिटर वर आला.
 • पेट्रोल दर आपण ९० रुपये लीटरप्रमाणे धरूया. म्हणजे दर १ किमीला संदीपला ६ रुपये मोजावे लागत होते. पण याशिवाय संदीपला वर्षातून दोनदा कार सर्व्हिसिंग करावं लागत होतं. ३५०० प्रत्येक सर्व्हिसिंगला असे वर्षाला ७००० रुपये लागले.
 • याशिवाय दरवर्षी इंस्युअरन्सचं नूतनीकरण करायला त्याला ७२०० रुपये लागले.
 • वर्षाला ७२०० किमी संदीप कारने प्रवास करतो हे आपण आधी बघितलंय.
 • याप्रकारे ६ रुपये प्रत्येक किमीला, १ रुपया सर्व्हिसिंग प्रत्येक किमीला,  १ रुपया विमा  प्रत्येक किमीला. टायर बॅटरीचा खर्च १ रुपया प्रत्येक किमीला. याप्रकारे एकूण ९ रुपये प्रत्येक किमीला संदीपला लागले. याचा अर्थ संदीप जेव्हा जेव्हा कार घेऊन ऑफिसला जाईल, तेव्हा 30 किमीचा प्रवासानुसार त्याला त्या दिवशी २७० रुपये खर्च येईल.
 • आधी बघितल्याप्रमाणे संदीप महिन्याला ६०० किमीचा प्रवास करतो.  यामुळे ९ × ६०० याप्रकारे ५४०० रुपये खर्च, राउंड फिगरनुसार ५००० खर्च पकडूया.
 • याशिवाय संदीप कारचं मासिक भाडं १०,००० दर महिन्याला भरतोय. म्हणजे एकूण १५, ००० रुपये संदीप दर महिन्याला ऑफीस आणि इतर ठिकाणी येण्याजाण्यासाठी खर्च करतोय. संदीपने १५००० रक्कम मासिक प्रवासासाठी आधी काढली होती, या दोन्ही सारख्याच आहेत. म्हणजे स्वतःची कार होऊनही त्याचा खर्च सारखाच होतोय.

तिकडे अमित आणि केशव काय करताहेत हे आपण पुढील भागात बघूया.

अर्थसाक्षरद्वारे प्रकाशित होणाऱ्या पुस्तक प्रकाशनाच्या कामात आम्हाला आपलं मोलाचं सहकार्य आवश्यक आहे.  यासाठी फक्त खालील लिंकला क्लिक करून त्यावरील फॉर्म भरून आम्हाला लेखांच्या निवडीसाठी मदत करा.

                  लिंक : http://bit.ly/Question_Form

(अधिक माहितीसाठी आम्हाला info@arthasakshar.com वर संपर्क करा.)

घर पहावे बांधून, का भाड्याने घेऊन? पहिली बाजू,

घर पहावे बांधून, का भाड्याने घेऊन? दुसरी बाजू ,

गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न (FAQ) व त्याची उत्तरे,

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]