Arthasakshar Its all about AT1 Bond Marathi
https://bit.ly/2BgnNYZ
Reading Time: 2 minutes

ए टी १ बॉण्ड

येस बँकेचे पुनरुज्जीवन करताना ए टी १ बॉण्ड (AT1 Bond) पूर्णपणे रद्द करण्यात आले. त्यामुळे अशा प्रकारची गुंतवणूक करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना मोठा धक्का बसला आहे. हे बॉण्ड सुरक्षित आहेत अशी फसवणूक करून बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरनी अनेकांना घ्यायला लावले, तर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ते शेअर्सहून वेगळे व त्यापेक्षा कमी धोकादायक असल्याच्या समजुतीने खरेदी होते. या सर्व व्यवहारात गुंतवणूकदारांचे ८६०० कोटीहून अधिक नुकसान झाले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

बुडणाऱ्या बँकांपासून गुंतवणूकदारांनी घ्यायचा बोध…

 • सन २००८ मधील आर्थिक संकटानंतर बँकिंग प्रणाली अधिक सशक्त करण्यासाठी सन २०१० मध्ये सदस्य देशांसाठी ही मार्गदर्शन प्रणाली सुचवण्यात आली. ही नियमावली ऐच्छिक आहे. 
 • बेसल हे स्वीझरलँड मधील शहर असून Bureau of International Settlement (BIS) चे मुख्यालय तेथे आहे. 
 • रिझर्व बँक ऑफ इंडियाची भारतीय बँकांसाठी असलेली नियमावली काही बाबतीत बेसल नियमांपेक्षा अधिक कडक असल्याने आपणास या आर्थिक संकटाचा परिणाम जाणवला नाही. 
 • आपण यापूर्वीही बेसल १, २ चा स्वीकार केला होता यातील बेसल १ मध्ये भांडवल पर्याप्तता प्रमाण किती असावे यावर जास्त भर दिला होता, तर बेसल २ मध्ये भांडवल जोखीम, बाजार जोखीम, व्यवस्थापन जोखीम यावर लक्ष देऊन ती अधिक पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला होता. 
 • सन २०१५ मध्ये टप्याटप्याने ग्रामीण प्रादेशिक बँका सोडून सर्व व्यावसायिक बँकांना ही प्रणाली मार्च २०१९ पर्यंत लागू करण्याचे ठरवले. यात भांडवल, लाभ, निधी, तरलता या मुद्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येऊन बँकिंग प्रणाली अधिक सशक्त करण्याचे सुचवले आहे.

माझे पैसे कोणत्या बँकेत कसे ठेऊ किती ठेऊ? …

 • आपल्याकडील अर्थव्यवस्थेत ग्रामीण बँका वगळता, सरकारी बँकांची हिस्सेदारी ८३% तर परदेशी बँकांची हिस्सेदारी ६% सहकारी बँका ३% आणि बाकीची हिस्सेदारी खाजगी बँकांची आहे. यातील सर्वात मोठा हिस्सा असणाऱ्या सर्वच सरकारी बँकांना आणि काही प्रमाणात खाजगी बँकांना अनुत्पादक मालमतेची (NPA) मोठी समस्या आहे. यावर मात करण्यासाठी टियर १ आणि टियर २ प्रकारच्या भांडवलाची विभागणी करण्यात आली. यातील टियर १ मध्ये भागधारकांची मालमत्ता म्हणजे भांडवल आणि गंगाजळी तर टियर २ मध्ये पुनर्मुल्यांकीत मालमत्ता, कर्जे अशी विभागणी करण्यात आली. 
 • टियर १ प्रकारात भांडवल वृद्धीसाठी ए टी १ बॉण्ड (AT1 Bond) निर्माण करण्यात आले त्याची गणना समभागात केली गेली.
 • जरी याच्या नावात बॉण्ड असले तरी ते कर्जरोखे नाहीत तर एक प्रकारचे शेअर्स आहेत. त्यावर देण्यात येणारा लाभांश निश्चित असा असला तरी दिलाच पाहिजे असे बंधन नाही. 
 • ज्याप्रमाणे रोख्याना मुदतपूर्ती असते तशी यास नाही मात्र मान्यताप्राप्त बाजारात त्याची खरेदी विक्री करता येते. 
 • जर बँकेस वाटले तर ५ वर्षांनी या ए टी १ बॉण्ड ची (AT1 Bond) पुनर्खरेदी करता येईल पण असे करण्याचे बंधन त्यांच्यावर नाही. 
 • वेगवेगळ्या बँकांचे जवळपास ९० हजार कोटी रुपयांच्या आसपास बॉण्ड वितरित केले आहेत.

बँक व्यवहारांसाठी २७ महत्वाच्या टिप्स…

अलीकडील अनुभवावरून बँक संकटात आली, तर हे बॉण्ड एका फटक्यात रद्द करता येत असल्याने आता त्याची खरेदी विक्री करणे अवघड असल्याने त्यांचे भवितव्य अंधारमय आहे. कोणत्याही दृष्टीने हे बॉण्ड आता सुरक्षित राहिले नाहीत. त्याचप्रमाणे असे नवीन बॉण्ड बाजारात आणता येणे कठीण असल्याने भांडवल उभारणीचा सोपा मार्ग जरी कागदोपत्री अस्तित्वात असला तरी प्रत्यक्षात बंद झाल्यातच जमा आहे.

उदय पिंगळे

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search- AT1 Bond mhanje kay?, AT1 Bond in Marathi
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…