Reading Time: 3 minutes

बँक व्यवहार करताना सर्वसाधारणपणे घ्यायची काळजी-

 1. क्रेडिट/ डेबिट कार्ड पिन लक्षात ठेवणे आवश्यक असून, तो कार्डवर अथवा कव्हरवर लिहून ठेवू नये.
 2. एटीएम (ATM) मशीनच्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू असल्यास बारकाईने पाहणे जरुरीचे आहे. अनेकदा कार्ड ठेवण्याच्या खाचेवर पिन नंबर रेकॉर्ड करू शकेल, अशी छोटी उपकरणे तेथे बसवली असण्याची शक्यता असते. नीट पाहिले असता ती समजतात.
 3. सायबर कॅफे/ रेल्वे स्टेशन, हॉटेल येथील वाय फाय यांचा वापर करू नये. यासाठी व्यक्तिगत नेट पॅक वापरावा. काही कारणाने अपवादात्मक परिस्थितीत असे नेटवर्क वापरावे लागले, तर पासवर्ड /पिन ताबडतोब बदलावा.

  बँकेच्या या नियमांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

 4. पासवर्ड/ पिन वेळोवेळी बदलणे ही चांगली सवय असून पासवर्ड कोणालाही ओळखण्यास कठीण परंतू आपल्याला लक्षात ठेवायला सोपा असा असावा.
 5. आपली गोपनीय माहिती जसे की पॅन, आधार, कार्ड नंबर, सीव्हीव्ही (CVV) मागणाऱ्या ई- मेल्सना उत्तर देऊ नये. असे ई -मेल कोणाकडून आले, त्यात आपल्याला काय संबोधले आहे यात एखादी लिंक आहे का, ते पाहावे. अशी लिंक ओपन करू नये. अशा प्रकारच्या ई -मेल बनावट असण्याची जास्त शक्यता असते. बँक कधीही अशी माहिती ई -मेलवर मागवत नाही.
 6. अपुरे रद्द झालेले व्यवहार निदर्शनास आल्यास आपल्या बँकेच्या ताबडतोब लक्षात आणून द्यावेत. कोणत्याही ‘एटीएम’मधून पैसे न मिळाल्यास ते एटीएम कोणत्या बँकेचे आहे, हे विचारात न घेता आपल्या बँकेकडे लेखी अथवा ई -मेलवर तक्रार करावी. लेखी तक्रारीची पोहोच घ्यावी ग्राहक सेवा केंद्राकडे तक्रार केल्यास तक्रार क्रमांक घ्यावा. हे पैसे ५ कामकाजाच्या दिवसात ग्राहकास परत मिळायला हवेत. रद्द झालेल्या आयएमपीएस आणियुपीआय व्यवहाराचे पैसे २४ तासात परत मिळाले पाहिजेत. यानंतर होणाऱ्या दिरंगाईसाठी रु. १०० प्रति दिवस एवढी नुकसान भरपाई द्यावी लागेल. हेच नियम ऑनलाइन व्यवहारांनाही लागू आहेत.
 7. स्थानिक किंवा सर्व शाखांत सममूल्यास देय चेक त्याच दिवशी किंवा उशिरात उशिरा कामकाजाच्या पुढील दिवशी खात्यात जमा होणे आवश्यक आहे.
 8. व्यवहार शुक्ल व्याजदर त्यातील बदल याची त्वरित माहिती ग्राहकांना मिळणे आवश्यक असून बँकेच्या दर्शनी भागात सर्वाना सहज दिसेल अशा ठिकाणी ती लावलेली असली पाहिजे. 
 9. क्रेडिट कार्ड मर्यादेत वापरून पूर्ण बिल भरणे आवश्यक तारखेपूर्वी भरावे अन्यथा भरमसाठ व्याजदराने रक्कम चुकवावी लागते (३६ ते४२%).

  सावधान !! ऑनलाईन फ्रॉड कॉल…

 10. ड्रॉपबॉक्स सोय असलेल्या ठिकाणी ग्राहकाची मागणी असल्यास काउंटरवर चेक स्वीकारून पावती मिळणे हा ग्राहकांचा हक्क आहे.
 11. पुढील तारखेचे धनादेश दिले असल्यास, खात्यात त्या दिवशी पुरेशी शिल्लख असणे आवश्यक असून चेक न वटता परत गेल्यास दंड आकाराला जातो.
 12. विविध कारणे सांगून जसे की कार्ड बंद होणार आहे, आयकर परतावा मिळणार आहे, बक्षीस लागले आहे, कार्ड लिमिट वाढवायचे आहे अशी किंवा अन्य कोणतीही कारणे सांगून फोनवर कार्ड तपशील, ओटीपी मागणाऱ्यास तो देणे अत्यंत धोकादायक असून, अशी माहिती फोनवरून ग्राहकास कधीही विचारली जात नाही.
 13. ग्राहकाच्या परवानगीशिवाय मूल्यवर्धित सेवा देण्यास प्रतिबंध आहे.
 14. व्यवहार करताना पिन स्वतः टाकणे आवश्यक आहे.  खरेदी करताना आपला कार्ड तपशील कोणी लिहून घेत नाही ना त्यावर लक्ष ठेवावे. अनेकजण पिन विक्रेत्यास टाकायला सांगतात, असे करू नये.
 15. धनादेश देणाऱ्याने त्यावरील रक्कम अंकात व अक्षरात स्वहस्ते लिहिणे गरजेचे असून सही केलेले कोरे चेक कोणालाही देऊ नयेत.
 16. कार्ड स्टेटमेंट तपासून सर्व व्यवहार आपणच केले असल्याची खात्री करणे गरजेचे आहे.
 17. फोटो असलेले क्रेडिट /डेबिट कार्ड घेण्यास प्राधान्य द्यावे त्याच्या मागील भागातील चौकोनात सही करणे आवश्यक असून कार्डावरील सी वी वी खोडावा. कार्डसंबंधीत ग्राहक सेवा केंद्राचा संपर्क क्रमांक आपल्या फोनबुकमध्ये जतन करावा तसेच अन्य सर्व तपशील सुरक्षित ठिकाणी (मोबाईलमध्ये नव्हे) ठेवावा.

   बँक खाते आणि रोख रक्कम मर्यादा

 18. संपर्क क्रमांक बदलल्यास त्याची नोंद बँकेत लगेच करणे आवश्यक असून, अशी नोंद केल्यावर त्यावर  व्यवहार केल्याचे संदेश येतात की नाही ते तपासावे.
 19. कार्ड वापरायचे नसल्यास बँकेस परत देऊन त्याची पोहोच घेणे महत्वाचे असून फेकून द्यायचे असल्यास त्यावरील मॅग्नेटिक स्ट्रीप तोडून त्याचे बारीक तुकडे करावेत.
 20. कार्डाची पाठपोट कॉपी मेलवर अथवा व्हाट्स अप वरून पाठवणे धोकादायक आहे. एटीएम व्यवहार करताना अन्य त्रयस्थ व्यक्तींना प्रतिबंध असून, यात बँक कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांचाही समावेश होतो. पैसे काढण्यासाठी अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नये.
 21. बाहेर जाताना आवश्यक तेवढीच कार्डस बरोबर न्यावीत म्हणजे यदाकदाचित एखादे कार्ड गहाळ झाले तरी अन्य कार्ड सुरक्षित राहतील.
 22. कार्ड हरवल्यास ती वापरण्यास ताबडतोब वापरण्यास प्रतिबंधित (block) करणे आवश्यक आहे.
 23. व्यवहारासाठी सुरक्षित संकेतस्थळ वापरणे योग्य. https:/ ने सुरुवात होणारी निळ्या रंगाचे कुलूप असलेली सर्व संकेतस्थळे सुरक्षित आहेत. पैसे ensripted payment gatway च्या माध्यमातून पाठवावेत.

  आरटीजीएस, एनईएफटी आणि आयएमपीएस सुविधांमधील फरक

 24. जेथे ओटीपी मागितला जातो असे व्यवहार अधिक सुरक्षित असून शक्य असेल तर सर्व व्यवहार या माध्यमातून करावेत.
 25. जरूरीप्रमाणे कार्ड व्यवहाराचा विमा उतरवणे आवश्यक असून यामुळे कार्ड हरवल्यास त्याची नोंद करेपर्यंत आपण न केलेले व्यवहार, त्याचप्रमाणे तात्पुरती पैशाची गरज भागवली जाते. त्याचप्रमाणे आपल्या वतीने सर्व कार्ड मिळवण्याची सोय विमाकंपनीकडून केली जाते. ज्यांचे व्यवहार मोठया प्रमाणात आहेत त्यांनी या सोईचा फायदा घ्यावा.
 26. बँकिंग व्यवहार करीत असलेल्या मोबाइल, कंप्युटरकरिता योग्य अँटीव्हायरस असलेले अँपलिकेशन वापरणे जरुरीचे आहे.
 27. सेवेसंबधी तक्रार उद्भवल्यास, तिचे निवारण करणारी व्यवस्था यांची माहिती असणे आवश्यक असून यासंबंधीची तक्रार शाखापातळीवर सोडवावी यासाठी लेखी अर्ज देऊन त्याचा पाठपुरावा करावा एक महिन्यात त्यांनी काही निर्णय न दिल्यास किंवा त्यांचा निर्णय मान्य नसेल तर बँकिंग लोकपाल, रिजर्व बँक यांच्याकडे तक्रार करता येईल. अशा तक्रारी ग्राहक न्यायालयातही दाखल करता येतात याशिवाय नियमित कायदेशीर कारवाई करता येते. या सर्व तक्रारी ऑनलाइन माध्यमातूनही करता येणे शक्य असून त्याचा चिकाटीने पाठपुरावा करावा.

एटीएम मधून पैसे आलेच नाहीत, पण डेबिट झाल्याचा मेसेज आला तर काय कराल?

-उदय पिंगळे

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.