म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ११
Reading Time: 2 minutesएसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan). नियमित कालावधीनंतर (साधारण दर महिन्याला) ठरावीक रक्कम म्युच्युअल फंडांत गुंतवण्यासाठी राबवण्यात येणारी प्रक्रिया म्हणजे ‘एसआयपी’ आपल्या गुंतवणुकीला शिस्त लावण्यासाठी आणि शेअर बाजारातील जोखीम कमी करण्यासाठी म्युच्युअल फंडांनी उपलब्ध केलेली सुविधा आहे.