Reading Time: 2 minutes

नमस्कार! म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत,“म्युच्युअल फंडाचे निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV)” या विषयाची.

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग २

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात-  भाग ३

  • गुंतवणूकदारांसाठी एनएव्ही (NAV) ही टर्म खूप महत्वाची आहे. एनएव्ही  म्हणजे निव्वळ मालमत्ता मूल्य.  

  • जेव्हा नवीन फंड चालू होतो, तेव्हा त्याचे दर्शनी मूल्य रु. १० असते. नवीन योजनेचे पैसे गोळा करण्यासाठी सेबीने ठराविक कालमर्यादा दिली आहे , त्या काळात एनएफओ कालावधी (NFO Period) जे लोक गुंतवणूक करतात, त्यांना गुंतवणुकीतील रकमेला १० ने भागिले असता, जो अंक येतो तेव्हढे युनिट्स मिळतात. 

  • उदाहरणार्थ जर गुंतवणूकदाराने रु १,००,०००  ‘एनएफओ’च्या काळात गुंतविले, तर त्याला १०,००० युनिट्स मिळतात. 

  • परंतु, जेव्हा गुंतवणूकदार एखाद्या चालू असलेल्या योजनेमध्ये (Open Ended Fund) गुंतवणूक करतो, तेव्हा त्याला त्या दिवसाच्या ‘एनएव्ही’प्रमाणे युनिट्स मिळतात. 

  • उदाहरणार्थ जर ‘एनएव्ही’ रु ४० असेल आणि त्याने रु १,००,००० रुपये गुंतविले, तर त्याला २५०० युनिट्स मिळतील. नंतर जेव्हा फंड मॅनेजर, जमवलेल्या फंडची गुंतवणूक कर्जरोखे किंवा समभाग बाजारामध्ये करतो, तेव्हा साहजिकच त्या गुंतवणुकीवर बाजारातील चढ- उताराचा प्रभाव पडतो. 

  • त्याचप्रमाणे निधी व्यवस्थापक कंपनी फंड चालवण्याचा जो खर्च आहे, तो सुद्धा रोज वार्षिक आधारावर योजनेमधून शुल्क रूपाने काढला जातो. 

  • बाजार जेव्हा चांगला असतो तेव्हा ‘एनएव्ही’ वाढत जाते व जेव्हा बाजार चांगला नसतो तेव्हा ‘एनएव्ही’ची वाढ होत नाही. 

  • आपण सर्वजण जाणतोच की बाजारामध्ये चढ -उतार होत असतात. त्यामुळे ‘एनएव्ही’ वर खाली होत असते.  पण, आपण जेव्हा दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करतो, तेंव्हा या चढ उताराचा परिणाम दूर होतो. म्हणून जेव्हा आपण दीर्घ मुदतीच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक करतो, तेव्हा ‘एनएव्ही’ दर दिवशी न बघता दर २ किंवा ३ महिन्यांनी त्याचा आढावा घेतला पाहिजे. 

  • आपल्याला मिळालेले जे युनिट्स आहेत त्याचा ‘एनएव्ही’शी गुणाकार केला की आपल्याला आपल्या गुंतवणुकीचे बाजारमूल्य कळते.

म्युच्युअल फंडचा पारदर्शक कारभार आपला विश्वास वाढवतो. 

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)

म्युच्युअल फंड सही है l

धन्यवाद!

– निलेश तावडे 

9324543832 

[email protected]

(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्षे कार्यरत होते. सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत. त्यांना सम्पर्क करण्यासाठी तसेच, ९३२४५४३८३२ या क्रमांकावर व्हाट्स अँप करा. तसेच त्यांचे माहितीपर व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांच्या YouTube Channel ला सबस्क्राईब करा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चालू करण्यासाठी त्यांच्या www.nileshtawde.com या वेबसाईटला  भेट द्या. आपल्या विभागात आपल्या मित्रपरिवाराकरिता म्युच्युअल फंड संबंधित मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करा आणि अर्थसाक्षर अभियानामध्ये सामील व्हा.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer: https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…