Reading Time: 3 minutes

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ८

नमस्कार, म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’  या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “गुंतवणूक आधारित म्युच्युअल फंड प्रकारबद्दल”

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग २

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात-  भाग ३

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ४

  • म्युच्युअल फंडामध्ये प्रामुख्याने तीन प्रकार असतात, डेट (Debt), इक्विटी (Equity) आणि हायब्रीड (Hybrid). 

    • डेट फंड हे प्रामुख्याने कर्जरोखे आणि बॉण्ड्स मध्ये गुंतवणूक करतात. 
    • इक्विटी फंड प्रामुख्याने शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करतात. 
    • हायब्रीड फंड हे डेटआणि इक्विटी चे मिश्रण असते. 
  • म्युच्युअल  फंडाच्या सर्व योजना या तीन मुख्य प्रकाराशी संबंधित असतात. डेट फंडाचे निरनिराळे प्रकार असतात, जे कर्जरोख्यांच्या मुदत कालावधीवर (portfolio duration) अवलंबून असतात. 
  • लिक्विड फंडामध्ये ९० दिवसांपेक्षा कमी कालावधीचे कर्जरोखे असतात. 
  • अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडामध्ये साधारण ६ ते १८ महिन्याच्या कालावधीचे कर्जरोखे असतात. 
  • शॉर्ट टर्म फंडामध्ये १२ ते ३६ महिन्याच्या कालावधीचे कर्जरोखे असतात. 
  • मिड टर्म फंडामध्ये साधारण २४ ते ६० महिन्याच्या कालावधीचे कर्जरोखे असतात. 
  • इनकम फंड किंवा बॉण्ड फंडामध्ये साधारण दीर्घ मुदतीचे कर्जरोखे असतात.
  • सर्व फंड हे बाजारातील व्याज दरामध्ये होणाऱ्या चढ उताराशी संबंधित असतात.
  • कर्जरोख्यांच्या बाजारामध्ये होणाऱ्या बदलाचा प्रभाव हा ह्या फंडावर पडत असतो. आधी सांगितल्याप्रमाणे कर्जरोख्यांचा कालावधी जेवढा जास्त, तेवढा बाजारामधील बदलाचा प्रभाव जास्त. 
  • काहीवेळा  कर्जरोख्यांच्या पतमानांकनाशी निगडित फंड असतात, जसे “GSEC  फंड”. हे राज्य किंवा केंद्र सरकारच्या सिक्युरिटीज (Govt Securities) ज्या आरबीआय इशू करते, त्यात गुंतवणूक करतात. ह्या फंडामध्ये सरकारच्या आश्वासनामुळे उधारीची जोखीम नसते. 
  • काही फंड हे कमी पत मानांकन असलेल्या परंतु अभ्यासपूर्वक निवडलेल्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करतात, त्या फंडांना “क्रेडिट रिस्क फंड” म्हणतात.
  • डेट कॅटेगरी मध्ये अजून काही फंड असतात जसे  “एफएमपी” हे फंड ठराविक मुदतीचे असतात. ३-५ वर्ष मुदतीचे. 
  • इक्विटी फंडाचे निरनिराळ्या योजना असतात. त्यांची वर्गवारी शेअर बाजारामधील कंपन्यांच्या एकूण मालमत्ता मूल्यावर ठरते. 
  • लार्ज कॅप फंड हे शेअर बाजारातील फक्त मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. 
  • मल्टि कॅप योजना ह्या सर्व प्रकारच्या बाजारमूल्य असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. 
  • मिड कॅप फंड हे मध्यम आकाराच्या कंपन्यात गुंतवणूक करतात. तर स्मॉल कॅप फंड अगदी छ्योट्या शेअर मध्ये गुंतवणूक करतात. 
  • बॉंबे स्टॉक एक्स्चेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) यामध्ये निरनिराळे इंडेक्स (Index) असतात. म्युच्युअल फंडाच्या काही योजना त्या इंडेक्सशी निगडित असतात, ज्यांना इंडेक्स फंड म्हणतात. 
  • काही योजना शेअर बाजारातील विशिष्ट सेक्टरशी किंवा विशिष्ट थीमशी निगडित असतात त्याला सेक्टरल फंड किंवा थेमॅटिक फंड म्हणतात. उदाहरणार्थ फार्मा सेक्टर/ आयटी सेक्टर / इन्फ्रास्ट्रक्चर थिम . 
  • या व्यतिरिक्त काही म्युच्युअल फंड विशिष्ट उद्देश असलेल्या योजना राबवितात, जसे लहान मुलांशी संबंधित किंवा निवृत्ती वेतनाशी निगडित. 
  • काही म्युच्युअल फंड ठराविक मुदतीचे इक्विटी फंड (closed  ended) उपलब्ध करीत असतात. 
  • हायब्रीड फंड म्हणजेच कर्जरोखे आणि कंपन्यांचे शेयर्स यांचे मिश्रण असलेल्या योजना. जेव्हा त्यातील कर्जरोख्याच्या भाग जास्त असतो ते हायब्रीड फंड कमी जोखिमेचे असतात, तर जेंव्हा इक्विटी समभाग जास्त असतो, ते हायब्रीड फंड अधिक जोखिमेचे असतात. 
  • इक्विटी सेविंग फंड, एमआयपी (MIP) तसेच, बॅलन्स आणि बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड हे हायब्रीड योजनांच्या वर्गवारी मध्ये येतात. ज्यांना इक्विटी फंड हे जास्त जोखीमवाले वाटतात, त्यांना हायब्रीड फंड हा चांगला पर्याय ठरू शकतो. 
  • म्युच्युअल फंडाच्या नीर निराळ्या योजना सर्व सामान्य गुंतवणूकदारांना सोप्या पद्धतीने समजाव्यात म्हणून सेबीने आता एक चांगले पाऊल उचललेले आहे. एप्रिल २०१८ पासून सर्व म्युच्युअल फंडाच्या मर्यादित योजना आहेत जेणेकरून सर्वसामान्य गुंतवणूकदारांना त्या सहज समजू शकतील. 

चला तर, आजच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करूया. 

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ५

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ६

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ७

म्युच्युअल फंड सही है l

धन्यवाद!

– निलेश तावडे 

9324543832 

[email protected]

(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्षे कार्यरत होते. सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत. त्यांना सम्पर्क करण्यासाठी तसेच, ९३२४५४३८३२ या क्रमांकावर व्हाट्स अँप करा. तसेच त्यांचे माहितीपर व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांच्या YouTube Channel ला सबस्क्राईब करा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चालू करण्यासाठी त्यांच्या www.nileshtawde.com या वेबसाईटला भेट द्या. आपल्या विभागात आपल्या मित्रपरिवाराकरिता म्युच्युअल फंड संबंधित मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करा आणि अर्थसाक्षर अभियानामध्ये सामील व्हा.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…