Reading Time: 2 minutes

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ११

नमस्कार! ‘म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात’ या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत, “म्युच्युअल फंडाची एसआयपी” बद्दल. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग १

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग २

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात-  भाग ३

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ४

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ५

  • एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan). 

  • नियमित कालावधीनंतर (साधारण दर महिन्याला) ठरावीक रक्कम म्युच्युअल फंडांत गुंतवण्यासाठी राबवण्यात येणारी प्रक्रिया म्हणजे ‘एसआयपी’ आपल्या गुंतवणुकीला शिस्त लावण्यासाठी आणि शेअर बाजारातील जोखीम कमी करण्यासाठी म्युच्युअल फंडांनी उपलब्ध केलेली सुविधा आहे. 
  • ओपन एंडेड इक्विटी फंडामध्ये केव्हाही एसआयपी सुरू करता येते. एसआयपी साठी म्युच्युअल फंड वितरकाकडे जाऊन केवायसी (KYC) कागदपत्र व म्युच्युअल फंडाचा गुंतवणूक अर्ज, ‘एसआयपी’चा रेजिस्ट्रेशन अर्ज आणि बँकेला द्यावयाच्या सूचनांचा, NACH फॉर्म भरावा लागतो. 
  • ‘एसआयपी’चा अर्ज भरल्यापासून एसआयपी सुरू होईपर्यंत साधारण ३० दिवसांचा कालावधी जातो. 
  • या काळात बँक तुमची एसआयपी रजिस्टर करते व दरमहा सुरू करते. म्युच्युअल फंडाचे काही वितरक ऑनलाईन सेवा पुरवितात तेव्हा सर्व अर्ज ऑनलाईन भरून बँकेला द्यावयाची सूचना म्हणजेच URN नंबर नेट बँकिंग (Net Banking) मध्ये बिलर (BILL Pay) ऑप्शन मध्ये अपडेट करावे लागते. 
  • प्रत्येक एसआयपी गुंतवणुकीच्या उद्दिष्टाला जोडून घ्यावी, असा सल्ला म्युच्युअल फंड वितरक गुंतवणूकदारांना नेहमी देतात, जेणेकरून ते उद्दिष्ट साध्य होईपर्यंत ती ‘एसआयपी’ सुरू ठेवता येईल. आपली भांडवल वृद्धी चांगली व्हावी यासाठी कमीत कमी १० ते १५ वर्ष ‘एसआयपी’ करणे आवश्यक आहे. 
  • त्यापूढे जेवढी वर्ष तुम्ही वाढवू शकाल तेवढा चक्रवाढ वाढीचा फायदा जास्त मिळतो. 
  • आपल्या ‘एसआयपी’ला एखादं आर्थिक उद्दिष्ट जोडल्यास उदा. मुलांचे/मूलींचे शिक्षण, लग्न, घर खरेदी, निवृत्ती इ. एसआयपी जर इक्विटी फंडात असेल, तर चक्रवाढ वाढीचा (Power of Compounding) परिणाम दिसायला कमीत कमी १० वर्षे लागतात. 
  • एसआयपी सुरु करणं म्हणजे एक बीज रोवण्यासारख आहे. रोज रोज बघून त्याची वाढ कमी किंवा जास्त होणार नसते. ते ‘एसआयपी’चं झाड नैसर्गिकपणे वाढण्यास तेवढा कालावधी देणं आवश्यक असतं. 
  • आपण आपली ‘एसआयपी’ची रक्कम दर वर्षी वाढवू शकतो, त्यासाठी फक्त सुरुवातीलाच तशा सूचना देऊ शकतो. त्याला “स्टेप अप” (STEP UP) एसआयपी म्हणतात. 
  • समजा जर आपण ५००० रुपयाची ‘एसआयपी’ चालू केली आहे आणि स्टेप अप ‘एसआयपी’ १०% दर वर्षी अशा सूचना दिल्या, तर एक वर्षानंतर आपली एसआयपीची रक्कम वाढून ती ५५०० होईल. 
  • दरवर्षी आपले उत्पन्न वाढत असते त्या प्रमाणे शिस्तबद्ध गुंतवणुकीसाठी आपण एसआयपीची रक्कम ही वाढवली पाहिजे. 
  • ‘एसआयपी’ सुरू असलेल्या योजनामध्ये तुम्ही एकगठ्ठा रक्कमही गुंतवू शकता. त्यामुळे एसआयपीत कोणत्याही प्रकारे बाधा येत नाही. ती विनाअडथळा सुरू राहते.

प्रत्येक घरात एक तरी इक्विटी फंडातील एसआयपी असलीच पाहिजे. 

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखिमेचा अधीन असते. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ६

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ७

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ८

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग ९

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात-  भाग १०

म्युच्युअल फंड सही है l

धन्यवाद!

–निलेश तावडे 

9324543832 

[email protected]

(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्षे कार्यरत होते. सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत. त्यांना सम्पर्क करण्यासाठी तसेच, ९३२४५४३८३२ या क्रमांकावर व्हाट्स अँप करा. तसेच त्यांचे माहितीपर व्हिडीओ पाहण्यासाठी त्यांच्या YouTube Channel ला सबस्क्राईब करा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक चालू करण्यासाठी त्यांच्या www.nileshtawde.com या वेबसाईटला भेट द्या. आपल्या विभागात आपल्या मित्रपरिवाराकरिता म्युच्युअल फंड संबंधित मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करा आणि अर्थसाक्षर अभियानामध्ये सामील व्हा.)

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…