मी घर का व कसे खरेदी करू?

Reading Time: 6 minutes ज्या व्यक्ती स्वतःचे घर शोधत आहेत, त्यांनी कोण काय म्हणतंय याचा विचार करण्याऐवजी जरा स्वतःचे डोकं वापरावं. तुमच्या गरजा जाणून घ्या, पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये घर हे कधीही सर्वात महाग उत्पादन असणार आहे. त्यामुळेच तुमचा खिसा पाहून तुमच्याकडे कोणते पर्याय आहेत याचा काळजीपूर्वक विचार करा आणि तुमची खात्री झाली की लवकरात लवकर खरेदी करा.  

[Video] लॉकडाऊन आणि रिअल इस्टेट व्यवसाय : भाग २

Reading Time: < 1 minute श्री. संजय देशपांडे लॉकडाऊन आणि रिअल इस्टेट व्यवसाय या विषयावर ग्राहकांशी संवाद साधणार आहेत.

लॉकडाऊनचे रिअल इस्टेटवर होणारे परिणाम

Reading Time: 8 minutes रिअल इस्टेट उद्योग हा अनाथासारखा आहे (कुणी “माय बाप” नाही) व याच्याशी संबंधित बहुतेक घटकांसाठी घरून काम करणे शक्य नाही; म्हणजे जोपर्यंत आपण व्हर्च्युअल घरे बांधून त्यात लोकांना व्हर्च्युअली राहायला सांगून त्याचे बिट-कॉईनमध्ये पैसे घेई पर्यंत तरी नक्कीच नाही! कोरोना विषाणू ज्या वेगानं पसरतोय त्याचं गांभीर्य मला समजतंय पण त्याचवेळी लॉकडाऊनमुळे गरीबांचा मानसिक व आर्थिक ताण वाढतोय (रिअल इस्टेट तसंच इतर सर्व उद्योगांमधल्या) या वस्तुस्थितीकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही, एवढाच मुद्दा मला मांडायचा आहे.

[Video] लॉकडाऊन आणि रिअल इस्टेट व्यवसाय

Reading Time: < 1 minute श्री. संजय देशपांडे लॉकडाऊन आणि रिअल इस्टेट व्यवसाय या विषयावर ग्राहकांशी संवाद साधणार आहेत.

घर घेण्याची योग्य वेळ कोणती ?

Reading Time: 5 minutes रिअल इस्टेटमधली सध्याची स्थिती खरोखरच गंमतीशीर आहे. तुम्ही जेव्हा एकटेच नवीन शहरात एका नव्या नोकरीत रुजू होता, तेव्हा तुम्ही घर बुक करताना अधिकच सावध असता, कारण घर हे एक अतिशय महाग उत्पादन आहे व अनेक लोक ते आयुष्यात एकदाच खरेदी करतात. 

बांधकाम व्यवसायाला,पॅकेजरूपी वेदनाशामक गोळी !

Reading Time: 6 minutes रिअल इस्टेट उद्योगासाठी (म्हणजे घर खरेदी करणाऱ्यांसाठी) २५,०००/- कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून आपल्या सरकारनं रिअल इस्टेट उद्योगातील लोकांचं आयुष्य थोडसं सुकर व्हावं अशी इच्छा नक्कीच व्यक्त केली आहे. आता बरेच जण म्हणतील की, कोणत्या लोकांचं? ज्या बांधकाम व्यावसायिकांनी वर्षानुवर्षे या व्यवसायातून बक्कळ पैसा कमावला, त्यांना मदत का करायची? असा प्रश्न विचारला जाईल. बांधकाम व्यावसायिकांकडे बक्कळ (म्हणजे ढिगानं) पैसा असतो हे एक मिथक आहे, ज्यावर सामान्य माणसाचा ठाम विश्वास आहे. 

काय आहे बांधकाम व्यवसायाच्या आर्थिक पॅकेजची वस्तुस्थिती?

Reading Time: 6 minutes आपल्याला आत्तापर्यंत पूरग्रस्तांसाठी वाटलेली अन्नाची पॅकेज, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सहाव्या वेतन आयोगाची किंवा सातव्या वेतन आयोगाची पॅकेज माहिती आहेत. आपल्याला संचालक मंडळाला मिळणाऱ्या समभाग किंवा भागभांडवलाचं पॅकेज माहिती असतं. अगदी अमेरिकेनी इतर देशांना दिलेल्या मदतीचं पॅकेजही माहिती असतं. त्याशिवाय, आपल्याला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं पॅकेज माहिती असतं, कर्जबाजारी झालेल्या कृषी व्यवसायामुळे त्यांच्या आत्महत्येच्या बातम्या दररोज येत असतात. पण रिअल इस्टेटसाठी (म्हणजे बांधकाम व्यावसायिकांसाठी, किमान मला तरी असं वाटतं) पॅकेज हे आपण कधीच ऐकलं नव्हतं, नाही का?

बांधकाम व्यवसायाचे भवितव्य

Reading Time: 8 minutes मी आता पंचवीस वर्षांहून अधिक काळ रिअल इस्टेटमध्ये वेगवेगळ्या भुमिकांमधून काम केलंय म्हणून काम केल्यामुळे या “रुग्णाविषयी” थोड्याफार गोष्टी जाणतो ज्यामुळे आपल्याला रोगाचं स्वरूप समजू शकेल. रोगाचं निदान झालं तरच आपल्याला योग्य उपचाराचा विचार करता येईल. इथे सगळ्यात पहिला व महत्वाचा नियम म्हणजे आपल्या “मायबाप” सरकारचा देशाविषयीचा (म्हणजे मतदारांविषयीचा) जो दृष्टिकोन आहे त्यानुसार देशातला कोणताही व्यवसाय चालवला जातो व रिअल इस्टेटही या नियमाला अपवाद नाही. तुम्ही म्हणाल त्यात काय मोठंसं, सगळयाच देशांना हे लागू होत नाही का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. 

जीसटी, बांधकाम व्यवसाय आणि घरांच्या किंमती

Reading Time: 6 minutes घरासारखं महाग उत्पादन खरेदी करताना व आपण जेव्हा परवडणाऱ्या घरांविषयी बोलतो तेव्हा प्रत्येक रुपया महत्वाचा असतो. अशावेळी जीएसटीचे लाखो रुपये वाचत असतील तर ग्राहक तयार घरच (बांधकाम पूर्ण झालेले) खरेदी करेल. असं करून आपण रिअल इस्टेट उद्योगाचा कणाच मोडत आहोत, कारण विकासकांना पैसा कुठून मिळेल? बँका जमीनी खरेदी करण्यासाठी कर्ज देणार नाहीत व ग्राहक जीएसटी वाचवण्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांकडे पाहणार नाहीत.

रिअल ईस्टेटचे नववर्ष ; आशादायी पण आव्हानात्मक! भाग ३

Reading Time: 3 minutes बांधकाम व्यवसायामध्ये आलेली मंदी, त्याचे परिणाम, कारणे, त्यांच्यासमोरील आव्हाने आणि एकूणच या व्यवसायाचे भवितव्य यांवर टाकलेला एक दृष्टिक्षेप –