Reading Time: 3 minutes

एव्हाना बरेच लोक गुंतवणुकीसाठी सिप म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन या लोकप्रिय पर्यायाची निवड करताना दिसून येतात. शेअरमार्केटच्या चढ-उतारामुळे कंपनीच्या  शेअर्सच्या किमती देखील वर-खाली होत असतात. अनेक जण याचा फायदा करून घेताना दिसतात आणि एनएव्ही कमी असताना एसआयपीमधील गुंतवणूक वाढवतात. यामुळे कमी किमतीत जास्त यूनिट मिळतात. एसआयपीमुळे गुंतवणूकदारांची गुंतवणूक करण्याची पद्धत आणि विचारसरणी यामध्ये अमुलाग्र बदल घडून आला आहे. 

एसआयपी गुंतवणूकदाराला आर्थिक शिस्त, चिकाटी, परतावा मिळण्यासाठीचा संयम शिकवते. दीर्घकाळासाठी केलेली एसआयपीमधील गुंतवणूक, गुंतवणूकदाराला चांगला परतावा मिळण्यासाठी फायदेशीर ठरते. थोडक्यात, पद्धतशीरपणे आणि नियमितपणे केलेली पैशाची बचत गुंतवणूकदाराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदतच करते. 

मात्र एसआयपी करताना बऱ्याच लोकांकडून नकळत काही गोष्टी अशा घडतात की ज्या टाळणे आवश्यक आहे. काय आहेत नेमक्या या गोष्टी, ज्या तुम्ही टाळल्या तर तुमचे नुकसान कमी होऊ शकते, ते आजच्या लेखामधून समजून घेऊया. 

1. एसआयपी करण्याचे उद्दिष्ट ठरलेले नसते  : 

  • बऱ्याच वेळा एसआयपी सुरू करताना गुंतवणूकदाराचे गुंतवणुकी मागचे उद्दिष्ट स्पष्ट नसते. छोट्या कालावधीसाठी आणि  दीर्घ कालावधीसाठी एसआयपी सुरू करण्याचे काहीतरी कारण असले म्हणजे त्या दिशेने गुंतवणुकीची रक्कम आणि कालावधी हे दोन्ही निश्चित करता येते.
  • कमी कालावधीसाठी गुंतवणूक करत असाल आणि त्यामागचे कारण कदाचित मुलांच्या उच्च शिक्षणाकरिता कॉलेजेसची फीस भरणे असेल, जी आजकाल लाखांच्या घरात असते किंवा घर खरेदीच्या दृष्टिकोनातून डाऊन पेमेंटसाठी पैसे जमवणे असेल किंवा स्वप्नातली एखादी कार घेण्याचे उद्दिष्ट असेल. 
  • यासाठी तुमची दरमहा गुंतवणूकही जास्त असणे गरजेचे आहे,तेव्हाच कमी कालावधीमध्ये जास्त पैशाची बचत करून त्यावर परतावा मिळवणे  शक्य होईल. 
  • जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करत असाल तर कालावधी आणि पैशाचे गणित दोन्हीचा ताळमेळ घालणे गरजेचे आहे. लग्न आणि निवृत्ती नंतरचे आयुष्य यासाठी एसआयपी करत असाल तर मुलीच्या जन्मापासून  एसआयपी करणे हे उत्तम उदाहरण असू शकते. 
  • तसेच निवृत्तीच्या जवळ आल्यानंतर निवृत्तीनंतर काय होईल याचा विचार करून पैसे जमवण्यापेक्षा नोकरीत असतानाच काही हिस्सा निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी एसआयपीच्या माध्यमातून गुंतवला तर  हा परतावा आर्थिक दृष्ट्या खंबीर होण्यासाठी नक्कीच चांगल्या प्रकारे मदत करू शकतो . 
  • या सर्व गोष्टींचा विचार करून एसआयपीचे उद्दिष्ट हे गुंतवणुकीसाठी महत्त्वाची पायरी असू शकते आणि याचा विचार न करताच बरेच जण गुंतवणूक करत असतात तेव्हा ही गोष्ट नक्कीच टाळली  पाहिजे. 

2. एकाच प्रकारच्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे टाळले पाहिजे:

  • अनेकदा गुंतवणूक करताना गुंतवणूकदार काही ऐकीव गोष्टींवरून शेअर घेत असतात तसेच म्युच्युअल फंडही निवडत असतात. अमुक एका तज्ञाने अमुक एका लार्ज कॅपमधे गुंतवणूक करा असे सांगितल्यावर एकाच प्रकारच्या फंडमध्ये गुंतवणूक केली जाते. किंवा अमुक एका जणांनी स्मॉल कॅप फंड चांगले परतावा देतात असे म्हटल्यानंतर फक्त स्मॉल कॅप मध्येच गुंतवणूक केली जाते.
  • मात्र एसआयपी करताना तुम्ही एकाच प्रकारच्या म्युच्युअल फंड मध्ये पैसे न टाकता  वेगवेगळ्या दोन ते तीन म्युच्युअल फंडांची निवड केली तर मिळणारा परतावा देखील तुलनेने अधिक असू शकतो. 
  • शेअर बाजारातील सेक्टर रोटेशनचा फायदा वेगवेगळ्या स्तरातील आणि क्षेत्रातील कंपन्यांना कमी अधिक होत असतो. या गोष्टीचा विचार केला तर एकाच प्रकारच्या विशिष्ट म्युच्युअल फंडमधे केलेली गुंतवणूक टाळली पाहिजे. 

3. शेअर मार्केटमधे येणाऱ्या मंदीला घाबरून एसआयपी थांबवणे किंवा पैसे काढून घेणे हे टाळले पाहिजे.

  • शेअर मार्केटमधे येणारे चढ-उतार हे काही विशिष्ट परिस्थिती उद्भवल्यामुळे होत असतात, जसे की भूराजकीय ताणतणाव, राजकीय घडामोडी, युद्धजन्य परिस्थिती किंवा कंपन्यांच्या मॅनेजमेंट कडून येणाऱ्या काही बातम्यांमुळे शेअर मार्केटने दिलेला प्रतिसाद असो !
  • या घटनांमुळे काही काळासाठी शेअर मार्केटमधे मंदी येऊन शेअर्सचे भाव घसरतात आणि याचाच परिणाम म्युच्युअल फंडाच्या एनएव्हीवर पण होत असतो. मात्र या परिस्थितीला न घाबरता टिकून राहणे आवश्यक असते, याउलट ही एक गुंतवणुकीची संधी असू शकते असा विचार करून शेअर मार्केटच्या जाणकार व्यक्तीकडून गुंतवणुकीसाठी सल्ला घ्यावा.
  • यामुळे यातून आता बाजार सावरणारच नाही असा विचार करून एसआयपी थांबवणे किंवा आहे त्या परिस्थिती शेअर्स किंवा म्युच्युअल फंडचे युनिट्स विकून सर्व पैसे काढून घेणे असे केल्यामुळे गुंतवणूकदाराचेच नुकसान होऊ शकते.  तेव्हा अशा परिस्थितीत नक्कीच योग्य तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊनच आर्थिक निर्णय घ्यावा.

4. गुंतवणूक करताना गुंतवणुकीमधली जोखीम लक्षात घेऊन योग्य फंडची निवड करावी. 

  • शेअर बाजारातील गुंतवणूक किंवा म्युच्युअल फंडमधली गुंतवणूक यामध्ये जोखीम असते हे सर्वच जाहिरातींमध्ये तसेच वेळोवेळी एनएससी तर्फे देखील सांगितले जाते.
  • गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराने ही जोखीम लक्षात घेऊन गुंतवणूक करावी. तसेच क्षमतेपेक्षा जास्त रकमेची एसआयपी सुरू करू नये.
  • एसआयपीच्या संदर्भात सर्व नियम आणि अटी यांचा अभ्यास करून  गुंतवणूक करावी.
  • म्युच्युअल फंडाचे एन्ट्री आणि एक्झिट यांचे काही नियम ठरलेले असतात, आपण किती कालावधीनंतर पैसे काढू शकतो ? नियमाच्या आधी पैसे काढल्यास किती रक्कम वजा होते?  यात आपले किती नुकसान होत आहे?  याचे गणित गुंतवणुकीच्या आधीच समजावून घ्या. 
  • आपल्या उद्दिष्ट प्रमाणे योग्य फंड कुठला असू शकतो याची जाणकार आणि तज्ञ व्यक्तीकडून माहिती घेऊन मगच योग्य फंडची निवड करावी.
  • या सगळया मुद्द्यावरून नक्कीच तुम्हाला मदत होऊ शकते आणि कदाचित भविष्यात येणारी समस्या आणि त्यामुळे होणारे नुकसान देखील टाळता येऊ शकते.

 

# म्युच्युअल फंड #भूराजकीय ताणतणाव #राजकीय घडामोडी
#एसआयपी #म्युच्युअल फंड एन्ट्री आणि एक्झिट

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…

करोडपती कसे व्हावे?

Reading Time: 4 minutes माझ्या लहानपणी म्हणजे 50 वर्षांपूर्वी दहा हजार ही खूप मोठी रक्कम होती…

Education – नामांकन : गरज की आवश्यकता ?

Reading Time: 3 minutes तुम्ही निवडलेली एखादी व्यक्ती जी तुमच्या पश्चात तुमच्या मालमत्तेची उत्तर अधिकारी असेल.…

डिजिटल रुपया म्हणजे काय ? घ्या समजून

Reading Time: 2 minutes डिजिटल रुपया म्हणजे काय आणि त्याचा व्यवहारात उपयोग कसा होईल याची उत्सुकता…