Arthasakshar BSE मुंबई शेअर बाजार
https://bit.ly/3edSonu
Reading Time: 3 minutes

 मुंबई शेअर बाजार – 146 वा वर्धापनदिन 

मुंबई शेअर बाजार (Bombay Stock Exchange) हा आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार असून तो जगभरात BSE या नावाने प्रसिद्ध आहे. 9 जुलै 1875 साली याची स्थापना झाली म्हणजेच 145 वर्ष जुना असा हा समभाग बाजार आहे. 

 मुंबई शेअर बाजार – स्थापना 

  • प्रेमचंद रॉयचंद या 19 व्या शतकातील उद्योजकांने प्रथम कपडाउद्योग नंतर सोने उद्योगात नाव कमवून या बाजाराचे महत्व जाणले आणि नेटिव्ह शेअर अँड शेअर ब्रोकर असोसियेशन ही संस्था स्थापन केली. 
  • ही संस्था पुढे मुंबई शेअर बाजार म्हणून नावारूपास आली. 
  • यापूर्वी सध्याच्या टाऊन हॉल समोरील वडाच्या झाडाखाली 22 दलालांनी आशा प्रकारची व्यवस्था असण्याची गरज आहे का यासंबंधी विचार केला होता. 
  • यावर अनेक चर्चा विचार विनिमय होऊन नियम आणि आचारसंहिता यास अंतिम रूप देण्यात आले. 
  • सन 1874 चे आसपास वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर होवून सध्याच्या दलाल स्ट्रीट येथे व्यवहार करायचे ठरवले आणि त्यानंतरच ही संस्था 1875 ला अस्तित्वात येवून व्यवहार सुरू झाले. 
  • सन 1875 ते 1957 या कालावधीत येथे होणारे सर्व व्यवहार फक्त एकमेकांवरील  विश्वासावर होत होते.
  • या कालावधीमध्ये अस्तित्वात असलेले नियम आणि संकेत हे पुढे स्थापना झालेल्या 23 समभाग बाजारानी जसेच्या तसे स्वीकारले. 
  • 31 ऑगस्ट 1957 रोजी भारत सरकारने या बाजारास ‘सिक्युरिटीज कॉन्ट्रक्ट ऍक्ट 1956’ अन्वये मान्यता दिली. 
  • अशा तऱ्हेने भारतातील पहिला मान्यताप्राप्त शेअर बाजार अस्तित्वात आला.

भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय शेअर बाजार – इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज (India INX) 

मुंबई शेअर बाजार – विस्तार 

  • लोकांनी रुचि दाखवल्याने, बाजारातील उलाढाल प्रत्यक्ष कागदपत्रांचे सहाय्याने होत असल्याने, उलाढाल वाढू लागल्याने, देवघेवीसाठी जागा अपुरी पडू लागली. 
  •  त्यानंतर सन 1980 मध्ये सध्याच्या फिरोज जिजिभोय टॉवर मधून व्यवहारास सुरुवात झाली. 
  • सन 1986 मधे बाजाराची दिशा दर्शविणारा बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) या निर्देशांकाची (lndex) निर्मिती करण्यात आली. 
  • बाजारातील महत्वाच्या 30 समभागांच्या बाजारभावाशी सेन्सेक्स (Sensex) निगडीत आहे आणि त्यास जागतिक मान्यता आहे. 
  • या मधील काळात झालेल्या आर्थिक सुधारणा, उघडकीस आलेले आर्थिक गैरव्यवहार, सरकारी दडपण, उपलब्ध पर्यायी व्यवस्था, त्यामुळे सक्षम यंत्रणा निर्माण होण्याची झालेली गरज, तसेच परिस्थितीच्या रेट्यामुळे स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी वेळोवेळी काळानुरुप बदल करावे लागले. 
  • या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे समभाग, रोखे याशिवाय म्यूचुअल फंड, ईटीएफ, इडेक्स, गोल्ड बॉन्ड यांची खरेदी विक्री व्यतिरिक्त लहान कंपन्यांना SME चे माध्यमातून व्यवहार परवानगी, पुर्वीची बदला पद्धत रद्द करून वायद्याचे फ्यूचर ऑप्शन, व्याजदर अदलाबदल, भविष्यातील दर यांचे व्यवहार येथे सुरू झाले.

शेअरबाजारातील प्राणी

  • यामध्ये वेळोवेळी नवनवीन कल्पक व्यवहारांची भर पडत आहे. 
  • एक खाजगी संस्था ते व्यावसायिक कंपनी असे त्याचे परिवर्तन झाले आहे .
  • येथील सर्व व्यवस्थापन व्यवसायिक संकेताचे पालन करून केले जाते. 
  • गुंतवणुकदाराना त्यांचे व्यवहार जगाच्या कानाकोपऱ्यातून संगणकाचे माध्यमातून करता येत आहेत. 6 मायक्रोसेकंद इतक्या कमी वेळात ते पूर्ण होतात. हा कालावधी जागतिक बाजारातील सर्वात जलद असा विक्रमी कालावधी आहे. 
  • निक्षेपिकेमुळे (dipostary) सर्व कागदी प्रमाणपत्र नाहीशी होवून मालकी हस्तांतरण सुलभ आणि जलद झाले आहे. CDSL या BSE च्या उपकंपनीद्वारे डिपोसिटरी सेवा पुरवण्यात येते. 

BSE – शेअर बाजारसाठी बीएसई ॲप

  • आज आपण कॅशलेस व्यवहाराबद्धल बोलतो, पण कागदी प्रणालीतून कागद विरहित पद्दतीत टप्याटप्याने कोणताही गोंधळ न होता 50 दिवसात हे बदल BSE मधे करण्यात आले. 
  • बँकिंग प्रणालीतील बदलामुळे पैशांची देवाण घेवाण त्वरित होवू शकते. यामुळे बाजारातील दैनिक उलाढाल प्रचंड वाढली आहे. 
  • नोंदणीकृत कंपन्यांचे बाबतीत हा बाजार प्रथम स्थानावर तर दैनंदिन उलाढालीचे बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 
  • जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे. 
  • सध्या रोज 2800हून अधिक कंपन्याचे 15 लाखांपेक्षा जास्त सौदे होत असून, दैनिक उलाढाल 20000 कोटी पेक्षा जास्त आहे. 
  • BSE हा बाजार धोका व्यवस्थापन, समाशोधन, व्यवहारपूर्ती, बाजराशी संबधित आकडेवारी, गुंतवणुक साक्षरता याबाबत सरस असून, या गोष्टी संबंधी जागतिक पातळीवर दखल घेण्यात येवून वेळोवेळी त्यास सन्मानित करण्यात आले आहे.
  • सध्याच्या शेअरबाजार संचालक मंडळात मुख्य कार्यकारी अधिकारीसह एकूण 10 संचालक असून त्यातील 5 हे लोकांचे तर 4 भागधारकांचे प्रतिनिधीत्व करतात. 
  • “ऑफर फॉर सेल” या माध्यमातून 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले समभाग 806 रुपयांनी विकून 3 फेब्रुवारी 2017 पासून भागबाजारात नोंदणी झालेला भारतातील पहिला आणि एकमेव भागबाजार  आहे. 

भारतीय स्टॉक एक्सचेंज- काय फरक आहे बीएसई आणि एनएसई मध्ये?

इंडिया इंटरनेशनल एक्सचेंज (India INS) या भारतातील पहिल्या आंतरराट्रीय भागबाजारची स्थापना करून 9 जानेवारी 2017 पासून सुरुवात करण्यात बीएसई (BSE) चे महत्वाचे योगदान आहे. यामुळे जागतिक गुंतवणूकदार, अनिवासी भारतीय यांना त्यांच्या सोईप्रमाणे जगभरातून कुठूनही आठवड्यातील सहा दिवस रोज 22 तासाचे कालावधीत गुंतवणूक करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. अशा या वैशिठ्यपूर्ण बाजाराला त्याच्या  146 व्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

उदय पिंगळे

 Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.