Buy New Car : कार खरेदी करत आहात?
मग आधी या 6 महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या !
कार खरेदी करणे हा आयुष्यातील एक महत्वाचा आर्थिक निर्णय असतो. कार घेताना आपण एक चांगली गलेलठ्ठ रक्कम त्यासाठी खर्च करणार असतो मग ती स्वतःच्या खिशातील असो किंवा कर्ज घेतलेली.
बाजारात उपलब्ध असलेल्या नानाविध कार मॉडेल्स आणि बँका देत असलेल्या आकर्षक कर्जपुरवठा ऑफर्स यामुळे वरवर पाहता कार खरेदी सोपी आणि मोहक वाटते. पण खरंच “कार घेणे” हा आर्थिकदृष्ट्या स्मार्ट निर्णय तुम्ही घेत आहात का? तर मग पुढील ६ प्रश्नांची उत्तरे अगदी प्रामाणिकपणे देऊन तुमची कार खरेदी स्मार्ट आहे का याची खात्री करा.
१. तुमचा कारचा सरासरी वापर किती असणार आहे?
- आपल्या स्वतःच्या कारमधून आरामात बसून आपल्याला हवं तिथे हवं तेव्हा जायला कुणाला आवडणार नाही. आपल्या भारतात तर एखाद्याच्या दारासमोर कार असणे म्हणजे खूप प्रतिष्ठेचे मानले जाते. हे सगळं दिसायला आणि अनुभवायला खूप उत्कृष्ट असलं तरी, खरेदीचा निर्णय घेताना, अधिक व्यावहारिक असणे नेहमीच शहाणपणाचे आहे.
- स्वतःला एक साधा प्रश्न विचारा, तुम्ही तुमची कार सर्वात जास्त कुठे चालवणार आहात? जर त्याचे उत्तर कामासाठीच्या रोजच्या प्रवासासाठी असे असेल, तर तुम्हाला खरोखरच SUV सारख्या कारची गरज आहे का? म्हणून तुम्ही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, कारची किंमत, त्यावर होणाऱ्या मेन्टेनन्सचा खर्च, पार्किंगची उपलब्धता यासारख्या आव्हानांचा जरूर विचार करा.
- तुम्ही ऑटोमॅटिक की मॅन्युअली ट्रान्समिशन कार घेणं पसंत कराल?
- ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या कार देशात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कार जर तुम्ही स्वतः चालवत असाल, लांब प्रवास करत असाल आणि अनेकदा ट्रॅफिक जॅममध्ये अडकला तर उत्तम आहेत.
- असे असले तरीही, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरियंटची किंमत जास्त आहे आणि मायलेज कमी आहे. त्यामुळे निवड करण्यापूर्वी हे सर्व घटक विचारात घ्या.
हेही वाचा – Car Loan : नवीन कारसाठी लोन घेताय.. वाचा ‘या’ उपयुक्त टिप्स…
३. तुम्ही कारची दुरुस्ती, देखभाल आणि कार कर्ज या अधिकच्या आर्थिक भारासाठी तयार आहात का?
- तुम्ही इतर EMI भरत असाल, तर तुम्ही तुमच्या “टेक होम” (प्रत्यक्षात हातात मिळणारा पगार किंवा उत्पन्न) मिळकतीच्या 40% पेक्षा जास्त उत्पन्न EMIs साठी भरत नसल्याची खात्री करा.
- जेव्हा सर्व्हिसिंगच्या खर्चाचा विचार केला जातो तेव्हा कारच्या देखभालीचा सरासरी खर्च बाइकच्या देखभालीच्या तिप्पट असू शकतो. त्यात जर तुम्ही सध्या वाढत जात असलेले इंधन खर्च जोडल्यास, एक मोठी खर्चाची रक्कम तुमच्या महिन्याच्या खर्चात भर टाकू शकते. त्यामुळे तुम्ही या खर्चांसाठी तयार आहात याची खात्री करा.
४. सेकंड हँड कार घेणे तुम्हाला अधिक सोईचे ठरेल का?
- तुमच्यासाठी आणखी एक गोष्टीचा विचार करणं महत्त्वाच ठरेल की, भारतात आपण कारला एक मालमत्ता मानतो. कार ही खरं तर एक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी फार महागडी तर नाही याची खात्री करून घेण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न केला पाहिजे.
- सेकंड हँड कार विकत घेताना त्याची किंमत कमी असू शकते, परंतु वारंवार कराव्या लागणाऱ्या सर्व्हिसिंगच्या आवश्यकतांमुळे खर्चात अधिक वाढ होऊ शकते.
- सेकंड हँड कार खरेदी करताना तुम्ही कसून तपासणी केली असल्याची खात्री करा. तुमचा कारचा वापर पुष्कळ कमी असेल तर, सेकंड हँड कार घेणे तुम्हाला अधिक सोईचे ठरेल.
५. भविष्यात तुमचा कधी कार विकण्याचा विचार आहे?
- तुम्ही नवीन कार विकत घेत असाल, तर तुम्हाला ती कधीतरी बदलायची आहे का हे तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे. काही कार आणि ब्रँडचे पुनर्विक्रीचे मूल्य चांगले असते जे नंतर उपयोगी पडते.
- म्हणजेच तुम्ही तुमच्या कारची जितकी काळजी घ्याल, तितके चांगले मूल्य तुम्हाला विक्री करताना मिळेल. तसेच तुमच्या कारच्या कागदपत्रांचीही काळजी घ्या, कारण हरवलेल्या कागदपत्रांमुळे कार विक्रीच्या वेळी मोठा त्रास होऊ शकतो.
हेही वाचा – Dream Car: “ड्रीम कार” खरेदीसाठी म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी उपयुक्त ठरेल ?…
६. तुम्ही विम्यासह प्रत्येक खर्चाचा विचार करत आहात का?
- कार विमा आणि अतिरिक्त खर्च जसे की जर तुम्हाला कारमध्ये अजून काही फॅन्सी फीचर्स हवे असतील तर त्या वाढीव खर्चासाठीही तयार रहा. समजा मोटारसायकलसाठी प्रति वर्ष विमा प्रीमियम रुपये 1,500 ते 2,000 पेक्षा कमी असेल तर कारसाठी तोच विमा प्रीमियम रुपये 7,000 ते 10,000 इतका सहज असू शकतो.
- तुम्हाला आवडेल तशी तुम्ही तुमच्या कारला सजवू शकता, परंतु त्यातून होणाऱ्या फायनल किंवा आवर्ती खर्चासाठी तयार रहा.
तर अशाप्रकारे कार खरेदी करण्यापूर्वी तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत हे तुम्हाला कळले असेलच. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही कार घेण्याचा निर्णय घेतला असेल तर कार खरेदी करण्याच्या दृष्टीने पुढील दोन पाऊले तुम्ही नक्कीच उचलू शकाल –
१) तुम्ही तुमच्या भविष्यातील कार खरेदीसाठी आजपासूनच थोड्या प्रमाणात बचत आणि गुंतवणूक करू शकता.
२) तुमच्याकडे तुमची स्वतःची कार नसतांना , जेव्हा तुम्हाला कारची आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही कार भाड्याने किंवा सध्या उपलब्ध असलेल्या कॅब सर्व्हिसेस त्यांच्या ऍपच्या मदतीने वापरू शकता.
तुमचे कार खरेदीचे स्वप्न पूर्ण व्हावे ही शुभेच्छा !
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies