Dream Car
https://bit.ly/32Xk5PE
Reading Time: 2 minutes

Dream Car

‘आपली स्वतःची एक गाडी (Dream Car) असावी’ असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. आजच्या लेखात आपण समजून घेऊ की कशा प्रकारे म्युच्युअल फंड गुंतवणूक आपली ‘ड्रीम कार’ घेण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरू शकेल. 

हे नक्की वाचा: कार घेताय? थांबा… आधी हे वाचा

 • समजा आपल्याला ५ लाख रुपयांची गाडी विकत घ्यायची आहे, तर त्यासाठी सर्वात पहिला पर्याय म्हणजे कार लोन!
 • जर तुम्ही ४ वर्षांसाठीचे ९% व्याजदराने ‘कार लोन’ घेतलं, तर त्यासाठी दर महिन्याला तुम्हाला रु. १२,४४३ रुपये भरावे लागतील म्हणजेच ४ वर्षांपर्यंत तुम्ही साधारण रु. ५.९७ लाख भरावे लागतील. 
 • याचा अर्थ गाडीच्या खऱ्या किमतीपेक्षा तुम्ही साधारणत: १ लाख रुपये जास्त भरावी लागेल.
 • दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही आजपर्यंत केलेली गुंतवणूक यासाठी खर्च करणे. यामुळे तुम्हाला तुमच्या भविष्य नियोजनाची सुरुवात पुन्हा नव्याने करावी लागणार.
 • आपले कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, म्युच्युअल फंड गुंतवणूक!
 • यामध्ये जर तुम्ही नियोजनबद्ध गुंतवणूक केली, तर, कदाचित तुम्हाला काही वर्ष थांबावे लागेल, परंतु तुमच्या या संयमित निर्णयामुळे तुमचे कर्जाच्या व्याजावरील पैसेही वाचतील आणि आत्तापर्यंतची गुंतवणूकही खर्च करावी लागणार नाही.

कार खरेदीचा निर्णय? 

Dream Car: ड्रीम कार खरेदीसाठी म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे ३ पर्याय:

१. इक्विटी म्युच्युअल फंड्स:

 • यामध्ये एक वर्षानंतर ५ लाख रुपये मिळण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला साधारण रु. ३८५०० रुपये गुंतवावे  लागतील. 
 • परंतु ही गोष्ट लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे की इक्विटी म्युच्युअल फंड्समधील परताव्यामध्ये कमी कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात तफावत येत असते. 

२. डेट म्युच्युअल फंड्स:

 • इक्विटी म्युच्युअल फंड्सपेक्षा हा पर्याय सुरक्षित असल्याने गुंतवणूकीवरील परतावा तुलनात्मकदृष्ट्या कमी असतो. 
 • तुम्हाला वर्षाच्या शेवटी ५ लाख रुपये मिळण्यासाठी (दरमहा रु. 40,000) दरमहा थोडी जास्त रक्कम द्यावी लागेल.

. हायब्रीड फंड:

 • इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंडांचे मिश्रण असलेल्या हायब्रीड फंडांतर्गत एका वर्षात ५ लाख रुपये मिळण्यासाठी मासिक देय रक्कम सुमारे रु. ३९,००० गुंतवावे लागतील.

SIP- म्युच्युअल फंड युनिट एसआयपी करतांना

महत्वाचे मुद्दे 

 • आपण शिस्तबद्ध गुंतवणूकदार असल्यास आपल्याला जास्त काळ थांबण्याची गरज नाही.
 • उदाहरणार्थ, रू. ५ लाखांची कार घेण्यासाठी आपल्याला इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना फक्त रु. ६५०० दरमहा चार वर्षांसाठी गुंतवावे लागतील. याउलट, बचत खात्यात केवळ आपले पैसे जमा केल्यास त्यास बराच काळ लागेल.
 • यासोबतच  मुदत ठेव (FD) गुंतवणुकीचा व्याजदर  हा  ५% ते ११% च्या दरम्यान आहे त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणे लवकर परतावा मिळण्याच्या दृष्टीने फायदेशीर असणार नाही.
 • याशिवाय आणखी एक मार्ग म्हणजे, सोन्यामध्ये गुंतवणूक करणे. परंतु आपल्याला माहित आहेच की सोन्याचे दर सतत वर-खाली होत असल्याने हा खूप जोखमीचा पर्याय ठरू शकतो.
 • त्यामुळे आपल्याला व्यवस्थित नियोजन करून योग्य त्या म्युच्युअल फंडामध्येच गुंतवणूक करून आपली स्वप्नातली गाडी घेणे सर्वच दृष्टीने फायद्याचे ठरू शकेल.
 • म्युच्युअल फंडस् मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे म्हणजे यामध्ये विविध प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या गरजेनुसार आणि गुंतवणुकीच्या कालावधीनुसार तुम्ही विविध मार्गांचा अवलंब करून जास्तीत जास्त पैसे कमावु शकता.
 • दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करायची असल्यास यामध्ये चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळवून देण्याची क्षमता आहे. याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही एसआयपी (SIP), म्हणजेच दर महिन्याला एक ठराविक रक्कम ठरवून शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करू शकता. 

म्युच्युअल फंड सहज सोप्या शब्दात – भाग २० (अंतिम भाग)

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून तुम्ही तुमचे नियमित बचतीचे ध्येयही साध्य करू शकता. यासोबतच इक्विटी-बेस्ड फंडस् मध्ये गुंतवणूक केल्यास बाजारपेठेतील हालचालींवर आधारित गुंतवणूकीचे अचूक निर्णय घेणाऱ्या प्रशिक्षित आणि अनुभवी व्यावसायिकांद्वारे ही योजना व्यवस्थापित केल्या जातात, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते.

कार लोन रिपेमेंट केल्यावर या गोष्टी विसरू नका !

शेवटी हे नक्की की, तुम्हाला तुमची ड्रीम कार घ्यायची असेल तर, त्यासाठी लवकरात लवकर म्युच्युअल फंड गुंतवणुकीला सुरुवात करणे कधीही फायदेशीरच ठरणार आहे ..!!!

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Benefits of Mutual Fund Investment in Marathi, Dream car Purchase – important tips in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…