Radhakishan Damani: जगातील शीर्ष १०० धनकुबेरांमध्ये डिमार्टच्या राधाकिशन दमानींचा समावेश ! 

Reading Time: 3 minutes‘राधाकिशन दमानी’ यांनी नेहमीच कायद्यातील बारकाव्यांचा काटेकोरपणे अभ्यास आणि त्यावर त्वरित आंमल केला आहे. ‘सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ च्या नवीन नियमानुसार ‘राधाकिशन दमानी’ यांनी आपल्या कुटुंबाचा शेअर्स मधील वाटा हा ८२% वरून  ७५% वरून आणून ठेवला आहे. नियम पाळणे आणि आपल्या गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त नफा कमावून देणे हाच उद्देश दमानी सरांनी डि मार्ट सुरू केल्यापासून डोळ्यासमोर ठेवला आहे. 

Ready possession Home: बांधकाम सुरू असलेलं घर घ्यावं की तयार असलेलं ‘रेडी पझेशन’ घर घ्यावं? 

Reading Time: 3 minutesकोणत्याही व्यक्तीसाठी ‘स्वतःचं घर’ हे फक्त एक वास्तू नसून ते एक स्वप्न असतं. नवीन घर घेतांना आणि विशेषतः पहिलं घर घेतांना प्रत्येक जण हा खूप सतर्क असतो. मध्यमवर्गीय मराठी माणसाला तर अशावेळेस बांधकाम सुरू असलेलं घर घ्यावं की तयार असलेलं ‘रेडी पझेशन’ घर घ्यावं? वापरलेलं ‘रिसेल’ घर घ्यावं? असे बेसिक प्रश्न पडत असतात. योग्य उत्तरं फार कमी लोकांकडे असतात. इतका मोठा निर्णय घेताना होणाऱ्या संभाव्य चुका टाळण्यासाठी आम्ही या विषयाबद्दल माहिती देत आहोत. 

DEA Fund : डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड

Reading Time: 4 minutesरिझर्व बँकेने बँकांकडे अधिक काळ मागणी न करता शिल्लक असलेली रक्कम डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडात (DEA Fund) जमा करण्यास सांगितले असून त्यात 31 मार्च 2021 रोजी ₹ 39225 कोटी रुपये जमा होते. यात दरवर्षी सातत्याने कोट्यवधी रुपयांची वाढ ही चिंताजनक आहे. आपला ग्राहक ओळखा (KYC) आणि डिपॉझिटर्सच्या वारसांची मागणी मान्य करून त्याकडे रक्कम वर्ग (transmission) करण्याच्या कार्यपद्धतीत सर्व बँकांत समानता नाही.

Vijay Sharma: कर्जबाजारी व्यवसायाला १० वर्षात यशोशिखरावर नेणाऱ्या विजय शर्मा यांची यशोगाथा

Reading Time: 2 minutes“सुट्टे नाहीयेत ? सर, Paytm करा ना…”हे वाक्य नित्याचेच झाले आहे. विजय शर्मा (Vijay Sharma) यांच्या पेटीएम कंपनीच्या यशाची घोडदौड ‘फोन पे’, ‘गुगल पे’ सारखे तगडे प्रतिस्पर्धी असतानाही चालूच आहे. सध्या अनेक डिजिटल वॉलेट आपल्या सेवेत उपलब्ध झाले आहेत. आज घराबाहेर पडतांना तुम्ही वॉलेट घेतलं नाही तरी चालतं, फक्त मोबाईल सोबत ठेवा. तुमच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारात अडथळा येणार नाही. मोबाईलद्वारे पैसे देता येणं म्हणजेच ‘Pay through mobile’ ही संकल्पना भारतात पेटीएमने रुजवली आहे हे मात्र निर्विवाद सत्य आहे. 

Ghadi Detergent: घडी डिटर्जंट कंपनीचा थक्क करणारा प्रवास

Reading Time: 4 minutes“पहले इस्तमाल करे, फिर विश्वास करे” प्रत्येक वस्तू आणि सेवांना लागू पडणारी ही ‘घडी’ डिटर्जंटची  (Ghadi Detergent) टॅगलाईन सर्वांच्या परिचित आहे. कानपूरच्या मुरलीधर ग्यानचंदानी आणि बिमलकुमार ग्यानचंदानी यांनी १९८७ मध्ये प्रस्थापित निरमा, सर्फ, व्हील यांच्यासमोर ‘घडी’ हे आणखी एक कपडे धुण्याची पावडर व साबण हे उत्पादन बाजारात आणलं. ग्यानचंदानी कुटुंबाला कित्येक व्यवसायिकांनी संभाव्य धोक्याची जाणीव करून दिली होती. पण, ग्यानचंदानी बंधूंनी ‘कपडे धुण्यासाठी वापरता येईल अशा पावडरचा मागणी विरुद्ध पुरवठा हा पूर्ण अभ्यास करूनच ‘घडी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला.

Financial Crisis: आर्थिक संकटात मदतीला येणाऱ्या या ६ गोष्टींचा विचार नक्की करा

Reading Time: 3 minutesकोरोना महामारी असो व अतिवृष्टीमुळे आलेला पूर संकटं सांगून येत नाहीत. पण या संकटाच्या काळात सर्वात जास्त चिंता असते ती आर्थिक परिस्थितीची. आपण आणि आपले कुटुंब प्राप्त परिस्थितीतही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असल्यास डोक्यावरचा भार काहीसा हलका होतो. सुयोग्य आर्थिक व्यवस्थापन तुम्हाला आर्थिक संकटांमधून बाहेर काढण्यास उपयुक्त ठरतं. आजच्या लेखात आर्थिक व्यवस्थापनाच्या काही महत्त्वाच्या आर्थिक पैलूंची माहिती घेऊया. 

CBDC: सेन्ट्रल बँक डिजिटल करन्सीच्या निर्मितीसंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी

Reading Time: 3 minutesक्रेप्टोकरन्सी संबंधात सरकारने यापूर्वी धरसोड वृत्ती दाखवली असून आता याबाबत निश्चित काय धोरण असेल ते समजण्यास मार्ग नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, सरकार क्रेप्टो करन्सीजवर बंदी आणणार नाही, परंतू त्याचे नियमन करणारा कायदा आणेल असे या वर्षाच्या सुरुवातीला म्हटले आहे. सर्वात अलीकडे यासंदर्भातील वक्तव्य भारतीय रिजर्व बँकेचे उप गव्हर्नर टी रबीशंकर यांच्याकडून 22 जुले 2021 रोजी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले आहे.

DICGC: बँक बुडाल्यास बँकेच्या ठेवीदारांना 90 दिवसांत पैसे परत -या बातमीमागील सत्य आणि तथ्य

Reading Time: 2 minutesतोट्यात चाललेल्या बँका ही सरकार आणि रिझर्व बँक याच्यापुढील मोठी डोकेदुखी आहे. यावर नियंत्रण ठेवणारी रिझर्व बँक आपली जबाबदारी पार पाडण्यास कुठेतरी निश्चितच कमी पडते. यात सरकारी बँकांना राजकीय  कारणाने का होईना मदत करायला कोणतेही सरकार कायम तयार असते. त्यामुळे या बँका सक्षम होण्याऐवजी कायमच्या अपंग झाल्या आहेत. आता अशा बँकांच्या अनुत्पादित मालमत्ता वेगळ्या बँकेकडे हस्तांतर करण्याची बॅड बँक नावाची नवीनच योजना आहे. अशी मलमपट्टी किती दिवस केली जाईल माहिती नाही. 

Shiv Nadar: शिव नाडार यांच्या यशाचा थक्क करणारा प्रवास

Reading Time: 3 minutesशिव नाडार (Shiv Nadar) हे नाव गेल्या काही दिवसात चर्चेत येण्याचं मुख्य कारण म्हणजे नाडार यांनी दिलेला एमडी पदाचा राजीनामा.  काही दिवसांपूर्वीच त्यांना भारतातील तिसरे श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आलं. भारतात मागच्या काही वर्षात झालेली ‘आयटी क्रांती’ ही खरोखरच कौतुकास्पद आहे. यामध्ये ग्राहकांना माफक दरात लॅपटॉप पुरवण्यात ‘हिंदुस्थान कम्प्युटर लिमिटेड (HCL)’ या भारतीय कंपनीचा सिंहाचा वाटा आहे. 

Life Insurance FAQ: जीवनविमा खरेदी करताना पडणारे ६ मूलभूत प्रश्न 

Reading Time: 3 minutesजीवनविमा खरेदी करताना पडणारे ६ मूलभूत प्रश्नांबद्दल (Life Insurance FAQ) माहिती घेणार आहोत. जीवनविमा – “जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी…”