Bernard Arnault
Reading Time: 3 minutes

Bernard Arnault

बर्नार्ड अरनौल्ट (Bernard Arnault) ऑगस्ट २०२१ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार हे सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचं नाव आहे. अमेझॉनचे संचालक जेफ बेझोस यांना मागे टाकून नुकताच बर्नार्ड अरनौल्ट यांनी हा पहिल्या क्रमांकाचा मान मिळवला आहे. बर्नार्ड अरनौल्ट हे फ्रांसचे रहिवासी आहेत. अमेरिकेचे इलॉन मस्क हे सध्या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहेत. ७२ वर्षीय बर्नार्ड अरनौल्ट यांनी जगातील श्रीमंत होण्यासाठी इतरांपेक्षा काय वेगळं केलं? काय आहेत त्यांच्या यशाचा मार्ग? जाणून घेऊयात. 

हे नक्की वाचा: मासिक पगार रु. ८,००० ते अब्जावधींची संपत्ती -झिरोधाची यशोगाथा ! 

बर्नार्ड अरनौल्ट (Bernard Arnault) शैक्षणिक पार्श्वभूमी:

 • बर्नार्ड अरनौल्ट यांचा जन्म उत्तर फ्रांसमधील रुबैक्स या शहरात ५ मार्च १९४९ रोजी  झाला.
 • शालेय शिक्षण त्यांनी रुबैक्स आणि लिली या शहरातून केलं. इंजिनियरिंगचं शिक्षण त्यांनी १९७१ मध्ये ‘इकोल पॉलिटेक्निक’ या पॅरिस मधील संस्थेतून केलं. 
 • सिव्हिल इंजिनियर झाल्यावर त्यांनी आपल्या कामाची सुरुवात ‘फेरेट सॅव्हीनेल’या त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या कंपनीपासून केली. 
 • वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी प्रेसिडेंट पदाचा पदभार सांभाळला. 
 • १९८४ पर्यंत त्यांनी आपल्या कौटुंबिक व्यवसायात लक्ष दिलं. एका आर्थिक अडचणीतून जाणाऱ्या ‘बुसैक’ या टेक्सटाईल कंपनीला विकत घेण्याचं ठरवलं. बर्नार्ड अरनौल्ट यांनी त्यानंतर ‘लुईस व्हिटन’ या कंपनीत आर्थिक गुंतवणूक केली आणि त्याचे सर्वात मोठे भागधारक होण्याचा मान मिळवला. 
 • अवघ्या दोन वर्षांच्या काळात त्यांनी ‘लुईस व्हिटन’ या कंपनीच्या चेअरमन आणि सीईओ पदाचा पदभार सांभाळला. 
 • १९८८ पासून बर्नार्ड अरनौल्ट यांनी फॅशन इंडस्ट्रीमधील सिलिन, बेलुटी आणि केंझो हे प्रमुख ब्रँड विकत घेतले.
 • १९९४ मध्ये अत्तर बनवणारी ‘गुव्हरलेन’ ही कंपनी  बर्नार्ड अरनौल्ट यांनी विकत घेतली. 
 • १९९६ मध्ये ‘मार्क जेकब्स’ हे ब्रँड बर्नार्ड अरनौल्ट यांनी विकत घेतलं. 
 • १९९७ मध्ये बर्नार्ड अरनौल्ट यांनी आपलं लक्ष सौंदर्य प्रसाधन क्षेत्राकडे वळवलं. ‘थॉमस पिंक’, ‘एमिली’, ‘फ्रेंडी’ सारखे प्रतिष्ठित ब्रँड बर्नार्ड अरनौल्ट यांनी विकत घेतले आणि फॅशन इंडस्ट्रीवर असलेली आपली पकड त्यांनी अजूनच घट्ट केली. 
 • आपलं कार्यक्षेत्र फ्रांसपुरतं मर्यादित न ठेवता बर्नार्ड अरनौल्ट यांनी अमेरिकेत आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. 
 • न्यूयॉर्क मधील सर्वात जास्त वाहतूक असलेल्या ‘५७ स्ट्रीट’ इथे त्यांनी आपले बुटीक त्यांनी सुरू केली. 

महत्वाचा लेख: कर्जबाजारी व्यवसायाला १० वर्षात यशोशिखरावर नेणाऱ्या विजय शर्मा यांची यशोगाथा

व्यावसायिक ते जगातील सर्वात श्रीमंत हा प्रवास: 

 • १९९९ मध्ये ‘गुसी’ या फॅशन ब्रँड विकत घेणे हा बर्नार्ड अरनौल्ट यांच्या प्रवासातील मोठं पाऊल मानलं जातं. 
 • २१ व्या शतकातील वाढलेला इंटरनेटचा वापर बघून बर्नार्ड अरनौल्ट यांनी एमपी३ डॉट कॉम, ई-बे, युरोप@वेब आणि नेटफलिक्स या कंपन्यांमध्ये मोठी आर्थिक गुंतवणूक केली. 
 • २००६ मध्ये बर्नार्ड अरनौल्ट यांनी ‘चेव्हल ब्लॅंक स्की’ हे रिसॉर्ट बांधलं. ही हॉटेल चैन त्यांनी फ्रांस, वेस्ट इंडिज, मालदीव, ट्रोपेझ या ठिकाणी त्यांनी आपल्या हॉटेलच्या शाखा सुरू केल्या.
 • २०१७ मध्ये बर्नार्ड अरनौल्ट यांनी ‘ख्रिस्तीन डियोर’ हा फॅशन ब्रँड विकत घेतला आणि त्यामुळे ते युरोपातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ लागले. 
 • २०१८ मध्ये ‘बेलमोन्ड हॉटेल’ ही चैन विकत घेऊन त्यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याकडे अजून एक पाऊल उचललं. ४६ हॉटेल्स असलेल्या या चैन सोबतच रेल्वे सेवा, जहाज सेवा विकत घेण्याचा सुद्धा करार करण्यात आला आणि बर्नार्ड अरनौल्ट यांची संपत्ती २०२१ पर्यंत सर्वाधिक झाली. 

आपल्या यशाचे ३ रहस्य बर्नार्ड अरनौल्ट हे नेहमीच सांगत असतात: 

१. व्यवसायासाठी लागणारी दूरदृष्टी: 

 • १९९१ मध्ये बर्नार्ड अरनौल्ट हे चीनला गेले होते. चीनला जाण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. 
 • बीजिंग शहरात त्या काळात काहीच प्रगती झालेली नव्हती. बस, ट्रेन, कार अशी कोणत्याच सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी उपलब्ध नव्हत्या. लोक जास्त करून सायकलचा वापर करायचे. 
 • अशा परिस्थितीत बर्नार्ड अरनौल्टने बीजिंग मध्ये ‘लुईस व्हिटन’ नावाचं पहिलं वस्त्रदालन सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज हे चीनमधील प्रथम क्रमांकाचं वस्त्रदालन आहे. 

२. ऑफिसमध्येच राहू नका: 

 • बर्नार्ड अरनौल्ट यांच्या कामाच्या सवयीपैकी एक ही आहे की, आजही त्यांच्या कंपनीला ‘स्टार्टअप’ प्रमाणे बघतात. 
 • ऑफिसमध्ये न बसता ते रोज त्यांच्या ग्राहकांना, डिझायनर लोकांना भेटत असतात. विविध देशात असलेल्या त्यांच्या स्टोअरला ते अचानक भेट देत असतात. 
 • स्टोअर मॅनेजरने कधीच त्याच्या जागेवर बसून राहू नये आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावेत अशी त्यांची इच्छा असते. 

३. संयमी रहाणे: 

 • बर्नार्ड अरनौल्ट हे आपल्या व्यवसाय प्रवासातून लोकांना सांगतात की, “एखादा व्यवसाय चालत नसेल तर तो बंद करण्याची घाई करू नका. 
 • व्यवसाय समजून घेण्यासाठी स्वतःला वेळ द्या. कोणताही ब्रँड हा लोकमान्य होण्यासाठी काही वर्ष द्यावे लागतात.”
 • बर्नार्ड अरनौल्ट यांनी या तीन व्यवसाय तत्वांवर आपला व्यवसाय उभा केला आणि आज त्यांना ‘होली फादर ऑफ फॅशन’ या नावाने ओळखलं जातं. 
 • ७० कंपन्यांचा कारभार यशस्वीपणे सांभाळणाऱ्या बर्नार्ड अरनौल्ट यांनी एप्रिल २०१९ मध्ये पॅरिस मधील एका ८५० वर्ष जुन्या चर्चची डागडुजी करून त्याचं लोकार्पण केलं. 

विशेष लेख: इन्फोसिसची यशोगाथा  – कोण बनला करोडपती…?

बर्नार्ड अरनौल्ट यांच्यावर खूप वेगवेगळ्या क्षेत्रात लक्ष घालण्यामुळे खूप टीका सुद्धा व्हायची. पण, त्यांनी प्रत्येक वेळी तेच केलं जे त्यांना आर्थिक दृष्ट्या योग्य वाटलं, म्हणूनच ते आज श्रीमंतीच्या शिखरावर आहेत. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Bernard Arnault in Marathi, Bernard Arnault Marathi Mahiti, Bernard Arnault Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…