नरेंद्र मोदी- मोदींचा विजय आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे १२ मूलमंत्र

Reading Time: 3 minutes लोकसभा निवडणूकींचा निकाल लागला आणि श्री नरेंद्र मोदी यांनी अद्भुत यश कमावत पुन्हा एकदा पंतप्रधान पद मिळवलं. हा विजय फक्त लोकसभेपुरता मर्यादित नाही. हा विजय प्रत्येकाला स्पर्श करून जाणारा आहे. प्रत्येकजण यातून खूप काही शिकू शकतो. व्यापाऱ्याला, एका इंटरप्रिन्युअरला खूप काही यातून शिकता येण्यासारखं आहे.

नरेंद्र मोदींना मिळालेले बहुमत हा बहुजनांचा मूक शहाणपणा?

Reading Time: 6 minutes भेदभावमुक्त व्यवस्थेने हा महाकाय देश बांधला गेला पाहिजे, अशा व्यवस्थेकडे जाण्याचे मार्ग अर्थक्रांतीने चार प्रस्तावाच्या रूपाने दाखविले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या दिशेने देशाला नेत आहेत आणि बहुजन समाजाकडे ते समजून घेण्याचा शहाणपणा आहे, म्हणून या निवडणुकीत त्यांना मोठे बहुमत मिळाले आहे. देशात असे हे प्रथमच घडते आहे.

आर्थिक नियोजनाचे मूलमंत्र

Reading Time: 3 minutes विमा ही गुंतवणूक नव्हे. खरेतर शालेय जीवनापासून अर्थसाक्षरतेचे धडे गिरवले जाणे आवश्यक आहे. आता कुठे नववी व दहावीत म्युच्युअल फंडाबद्दल पाठ समाविष्ट केला गेलाय. पोस्टल  व बँक आर. डी., पारंपरिक विमा, मुदत ठेवी, सोन्यातील गुंतवणूक महागाईला पार करू शकत नाही. बँकेत सात टक्के परतावा घेऊन सात टक्यांच्या महागाईला आपण सामोरे कसे जाणार?

डिजिटल पेमेंट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes “वॉलेट मनी, डिजिटल व्यवहार का करायचे?” असा प्रश्न अनेक लोक विचारतात. कल्पना करा, रस्त्यावर एके ठिकाणी वडापावची गाडी लागलेली असते. त्याचा तुफान धंदा होतो. दिवसाला दोन हजार रुपयांचा गल्ला जमतो. हे सर्व रोखीचे व्यवहार असतात. म्हणजे महिन्याला ५० हजार रुपये उत्पन्न असलेला मनुष्य ही रक्कम कुठेही बँकेत दाखवत नाही. म्हणजे त्यावर एक रुपया देखील कर सरकारकडे जमा होत नाही.

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

सरकारच्या स्वस्त वैयक्तिक विमा योजना

Reading Time: 4 minutes वित्तीय नियोजनाची सुरुवात शुद्ध विम्यानेच झाली पाहिजे. कमवित्या व्यक्तीच्या मृत्यू पश्चात त्याचे कुटूंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचा सर्वात स्वस्त मार्ग म्हणजे शुद्ध विमा खरेदी करणे.शुद्ध विम्याच्या कालावधीत विमा धारकाचा मृत्यू झाल्यास विमा संरक्षणाइतकी (Sum Insured) रक्कम विमा पॉलीसीत नामनिर्देशन असलेल्या वारसास (Nominee) देय असते. विमा पॉलीसीची मुदत संपल्यानंतर विमा धारक हयात राहिल्यास विमा कवच बंद होते. परिणामी कुठलीही रक्कम देय राहत नाही. शुद्ध विमा ही गुंतवणूक नसून एक खर्च आहे. विमा पॉलीसीची मुदत संपल्यावर कुठलाही दावा करता येत नाही, या कारणामुळे विमा खरेदी इच्छुक या प्रकारचा विमा खरेदी करण्यास उत्सुक नसतात.

आरटीजीएस, एनईएफटी आणि आयएमपीएस सुविधांमधील फरक

Reading Time: 4 minutes एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर), आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) आणि आयएमपीएस (इमिजिएट पेमेंट सर्व्हिस) म्हणजे तात्पुरती भरणा सेवा या तीन महत्वाच्या सेवा बँकांद्वारे पुरवल्या जातात. या तीन सेवांबद्दल व त्याच्या वापराबद्दल योग्य माहिती नसल्यामुळे पैसे हस्तांतरित करताना अनेक अडचणी येतात. एनईएफटी आणि आरटीजीएसद्वारे  पैसे हस्तांतरित करण्याची प्रमाणित वेळ असते. पण आयएमपीएसने पैसे हस्तांतरित करायचे असतील, तर त्याला वेळेची मर्यादा नसते.

कॅशलेस आरोग्य विमा पॉलिसीचे फायदे

Reading Time: 3 minutes बरेचदा अकस्मिक वैद्यकीय वैद्यकीय इमर्जन्सीमध्ये पैश्यांची गरज पडते. अनोळखी शहरात ओळखीचे लोक नसताना आर्थिकदृष्ट्या अडचणी येऊ शकतात. अशावेळी आरोग्य विमा खरेदी करताना कॅशलेस आरोग्य विमाचा पर्याय निवडावा. यांमध्ये आपल्याला वैद्यकीय उपचारांचे पैसे भरावे लागत नाहीत. आपल्यातर्फे आपली आरोग्य वीमा कंपनी हॉस्पिटलच्या बिलाचे पैसे देते.  आपण फक्त योग्य ती कागदपत्रेसादर करणे आवश्यक आहे.

घर पहावे बांधून, का भाड्याने घेऊन? – दुसरी बाजू

Reading Time: 3 minutes मागील भागात आपण पाहिलं प्रसिद्ध जुळे भाऊ सुरेश आणि रमेश यांचे रस्ते व विचार भाड्याच्या घरात राहायचं की स्वतःच्या; यावरून वेगळे झाले. सुरेशने भाड्याच्या घरात राहून वाचलेले पैसे दुसरीकडे गुंतवण्याचं ठरवलं, तो आपल्या मार्गाने गेला. तर रमेशची कथा मात्र वेगळी होती. रमेशने स्वतःचं घर विकत घेण्याची हिंमत करण्याचं ठरवलं. त्याने गृह कर्ज घेतलं.रमेशने सर्व अभ्यास करून घराचं मासिक भाडं आयुष्यभर देत राहिल्यावर जितका खर्च येईल साधारण तेवढाच किंवा  त्याहून कमी खर्च स्वतःचं घर विकत घेण्यात येईल. सुरवातीला जरी भाड्याच्या घराचं मासिक भाडं इएमआयहुन कमी वाटतं पण येत्या वर्षांत ते भाडं वाढेल. त्यामुळे त्याने गृहकर्जाचा किंवा घरामध्ये रक्कम गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता.

घर पहावे बांधून, का भाड्याने घेऊन? – पहिली बाजू

Reading Time: 3 minutes जर्मनी, इंग्लंड, अमेरिकेत भाड्याच्या घराचं भाडं हे गृहकर्जावरील व्याजापेक्षा जास्त असतं. त्यामुळे या देशांत भाडयाने राहणं परवडत नाही. परंतु भारतात अशी परिस्थिती नाही. भारतात भाड्याच्या घरात राहताना द्यावं लागणारं भाडं गृह कर्जावर भरावं लागणाऱ्या व्याजापेक्षा कमी आहे.