राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutesराष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) ही PARDA यांनी प्रवर्तित केलेली अत्यल्प व्यवस्थापन फी असलेली पेन्शन योजना आहे. जरआपण त्याचे सदस्य असलात (?) तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता एका चुटकीसरशी आपणास आपल्या खात्यासंबंधीची माहिती मिळू शकते. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी (NSDL) यांनी नुकतेच एक नवीन अँप तयार केले आहे. गुगल प्ले स्टोअर आणि अँप स्टोअरवर ते उपलब्ध आहे. या अँपच्या साहाय्याने खातेदारांस आपल्या खात्यासंबंधी सर्व अद्ययावत माहिती एन.पी.एस चे रेकॉर्ड किपर NSDL CRA च्या संकेतस्थळाचा लॉग इन आय डी व पासवर्ड वापरून मिळू शकते. हे अँप गुंतवणुकांदाराना हाताळायला सोपे (users friendly) असून अँड्रॉईड सिस्टीम असलेल्या सर्व मोबाईलमध्ये चालते.

Compound Interest: चक्रवाढ व्याजाची जादू

Reading Time: 3 minutesअनेकदा गुंतवणुकीचे साधे सोपे पण जास्त फायदा मिळवून देणारे पर्याय आपल्या समोर असतात पण निव्वळ पुरेशा माहितीअभावी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची माहिती करून घेतल्यास जास्त फायदा होऊ शकतो.

Types of Life Insurance: जीवनविमा योजनेचे विविध प्रकार

Reading Time: 3 minutesभारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा विमा व्यवसाय हा खाजगी क्षेत्राकडे होता. त्याचे राष्ट्रीयकरण करण्यात येऊन तो भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे एकवटला. नंतर खाजगी क्षेत्राला परवानगी देण्यात आली आणि एक वर्तुळ पूर्ण झाले. यापूर्वी ‘आयुर्विम्याला पर्याय नाही’ असे भारतीय आयुर्विमा महामंडाळाचे घोषवाक्य होते. अधिकाधिक लोकांनी स्वतःहून जीवनविमा घेऊन आपल्या आयुष्याच्या अशाश्वततेवर मात मिळवल्याचे समाधान मिळवावे, असा त्यामागील हेतू होता. लोकांची क्रयशक्ती एवढी कमी होती की आपल्या आयुष्याचा जोखमीकरिता काही रक्कम खर्च करावी, हे त्यांच्या गळी उतरवणे खूप कठीण होते. अनेक योजनांना बचतीची जोड देऊन विमा देण्यात एल आय सी (LIC) ला यश मिळाले.

धनत्रयोदशी आणि भारतीय अर्थव्यवस्था

Reading Time: 2 minutesआज सोनियाचा दिनु…….!!! आज धनत्रयोदशी! सर्वांच्या आवडत्या सणाला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आयुर्वेदामध्ये आजच्या दिवसाचं विशेष महत्व आहे. आज आयुर्वेदाची देवता धन्वंतरीचं पूजन केले जाते. तर धर्मशास्त्रानुसार आजच्या दिवशी सुवर्ण म्हणजेच सोन्याची खरेदी करणे शुभ समजले जाते. माणसाच्या आयुष्यात आरोग्याची किमंत सुवर्णमूल्यापेक्षा जास्त आहे. आजच्या दिवसाचं महत्व लक्षात घेता, आजच्या दिवशी धर्मशास्त्र आणि वैद्यकशास्त्र यांचे सूर परस्परांशी जुळून आले आहेत . पण या सुवर्ण खरेदीचे सूर अर्थशास्त्राशी जुळतात का? हा मुद्दाही तेवढाच महत्वाचा आणि विचार करण्याजोगा आहे.

सुख के सब साथी, दुख में न कोई…..

Reading Time: 3 minutes५ दिवसांच्या दीपावलीच्या सणाला धनत्रयोदशीपासून प्रारंभ होत असतो. आज धन्वंतरीचे पूजन केले जाते. धन्वंतरीला आयुर्वेदाची देवता म्हणजेच आरोग्याची देवता मानले जाते. तिच्या पूजनापाठीमागचा शुद्ध हेतू हा असतो की, संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी प्रत्येकास सद्बुद्धी व सर्व सुखांचा उपभोग घेण्यासाठी निरामय आरोग्य मिळू दे. तेव्हा या ५ दिवसांत पुढील ५ संकल्प करू या.

सुवर्ण गुंतवणुकीचे ‘डिजिटलायजेशन’

Reading Time: 3 minutes“सोना कितना सोना है”.  डिजिटल भारतामध्ये सोने खरेदीनेही आधुनिक रूप धारण केले आहे. सोनं जवळ बाळगण्याचा धोका पत्करण्यापेक्षा सोन्याची ‘डिजिटल’ खरेदी नेहमीच लाभदायक ठरते .या दिवाळीला कपडे, गॅजेट्स, इत्यादीच्या ‘ऑनलाईन शॉपिंग’ सोबत सोन्याची खरेदी ही  ‘डिजिटल’ करता येणं सहज शक्य आहे. या आधुनिक पद्धती नक्की कुठल्या आहेत? त्याचे फायदे/ तोटे काय आहेत?

सुवर्ण गुंतवणुकीची धनत्रयोदशी

Reading Time: 3 minutesआपल्या देशात सण समारंभांना फार महत्व आहे. सण म्हटले की खरेदी आलीच. एरवी गर्दीचा कंटाळा करणारे लोक सणाच्या खरेदीसाठी मात्र ‘शॉपिंगच्या’ पिशव्या सांभाळत, गर्दीतून अनेक दुकाने पालथी घालत, उन्हातून तासन् तास फिरत असतात. कपडे, गॅझेट्स, अप्लायन्सेस ही सारी खरेदी तर असतेच पण सर्वात महत्वाची असते ती सोने खरेदी. सणांना व लग्नकार्यात भेट देण्यासाठी अथवा शुभमुहूर्त म्हणून सोने खरेदी केली जाते. भारत देश हा जगातील सर्वात जास्त सोनं आयात करणारा देश आहे. एकूण जगभरातील सोनं आयातीच्या एक तृतीयांश सोनं एकटा भारत देश आयात करतो.  पर्यायाने भारतातील भारतीयांच्या सोनं खरेदीच्या या वेडाचा परिणाम नकळतपणे देशाच्या अर्थव्यवस्थेवर पर्यायाने देशाच्या GDP वर होत आहे.

म्युच्युअल फंड योजनेसबंधी माहिती

Reading Time: 2 minutesम्युच्युअल फंडाच्या किंवा त्यांच्या विशिष्ट योजनेच्या जाहिराती आपण पाहिल्या असतीलच. यातील प्रत्येक जाहिरातीचा शेवट हा सदर योजना जोखमेच्या अधीन असून आपण त्याची सर्व माहिती गुंतवणूक करण्यापूर्वी करून घेणे आवश्यक आहे. Mutual fund investment are subject to market risk,  read all scheme related documents carefully before make investments.  या संबंधीची माहिती नेमकी कोणती असते? ते आपल्याला माहीत असणे जरुरीचे आहे.

एन आर आय आणि पी पी एफ खाते

Reading Time: 2 minutesअलिककडेच पी पी एफ मुदतपूर्तीनंतरचे पर्याय या विषयाच्या संदर्भात प्रसारित केलेल्या लेखास अनुसरून काही व्यक्तींनी एन आर आय व्यक्तींच्या या खात्यासंबंधीच्या शंका उपस्थित केल्या. त्याच्या शंकांचे निरसन या लेखाद्वारे करीत आहे. पी पी एफ ही करमुक्त उत्पन्न देणारी, सरकारची हमी असणारी तसेच करसवलतींचा लाभ देणारी सर्वात जुनी योजना आहे. सध्याच्या नियमांनुसार ही योजना फक्त  भारतीय नागरिकांसाठी आहे. त्यामुळेच अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारलेली परंतू मूळ भारतीय असलेल्या व्यक्तीस हे खाते उघडता येत नाही.

प्रधानमंत्री वय वंदन योजना (PMVVY)

Reading Time: 3 minutesसेवानिवृत्त झालेल्या किंवा वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ व्यक्तीपूढे नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. अर्थात यातील काही पर्याय सर्वसाधारण नागरिकांनाही उपलब्ध आहेत. याच अनुषंगाने जेष्ठ नागरिकांना काही अंशी नियमितपणे उत्पन्न मिळून सामाजिक सुरक्षितता लाभावी या हेतूने प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY) सुरू करण्यात आली आहे. ही एक सिंगल प्रीमियम निवृत्तीवेतन योजना असून यापूर्वी असलेल्या वरीष्ठ पेन्शन बिमा योजनेची ही सुधारित आवृत्ती आहे.