BSE – शेअर बाजारसाठी बीएसई ॲप

Reading Time: 2 minutesमुंबई शेअर बाजार (BSE) या आशियातील सर्वात जुन्या आणि जगात सर्वाधिक कंपन्यांचे व्यवहार होत असलेला शेअर बाजार असून बाजारातील घडामोडी गुंतवणूकदारांना समजाव्यात म्हणून BSE India या नावाचे अँप गुगल स्टोअरवर उपलब्ध आहे. नाविन्यपूर्ण अनुभव असे देणारे हे अँप असून मार्केट व्यवहाराशी संबंधित सर्वांनी ते आपल्याकडे ठेवणे जरुरीचे आहे.

श्री. उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याचे विश्लेषण

Reading Time: 4 minutesएक्झिट पोलच्या परिणामांतुन ‘लोक्स’ बाहेर पडतात न पडतात तोच श्री पटेल साहेबांचा ‘महाएक्झिट’. बाजारांत सक्रिय एका मित्राला नाही सहन झाला.. आणि त्याने पाठविलेल्या या दर्दभऱ्या पुरेपुर शायरीने आज माझ्या दिवसाची सुरवात झाली. मुंबई विद्यापिठाच्या बीकॉमच्या परिक्षेंत अर्थशास्त्र या विषयांत अनुत्तीर्ण झाल्यापासुन या विषयाकडे परत अर्थशास्त्राकडे फिरकायचे नाही असे ठरविले आहे.

सुकन्या समृद्धी योजना – भाग ३

Reading Time: 2 minutesसुकन्या समृद्धी योजनेचे सर्व फायदे समजले असतील तर आपल्या मुलीच्या पंखाना बळ देण्यासाठी महत्वाचं पाऊल म्हणजे, तिच्या दूरगामी भविष्याची सोय करून ठेवणं. यासाठी तुम्हाला सुकन्या समृद्धी योजना (SSY) हा उत्तम पर्याय आहे. या भागात सुकन्या समृद्धी खात्यासंदर्भात पडणारे महत्वाचे प्रश्न व उत्तरे जाणून घेऊया.  

गूगल पैसा कसं कमावतं? भाग २

Reading Time: 3 minutesगूगल गाय दूध तर खूप देते आणि स्वतःही हवा तेवढा चारा मिळवते. मोठा चारा घोटाळा गूगल गायीचा अजून तरी झालेला ऐकिवात नाही. गूगलने गेल्या काही वर्षांत पाचशे कंपनीज विकत घेतल्या त्याही हजारो लाखो डॉलर्स मध्ये. म्हणजे गूगल किती जबरदस्त महसूल कमावत असेल हे लक्षात येतं. पण कसं कमावतं हे ही मनोरंजक आणि महत्वाचं आहे.

नवीन वर्ष ग्राहक राजाचं … !! भाग ३

Reading Time: 3 minutes२००० सालच्या उत्तरार्धात रिअल इस्टेटचं चित्र बदलायला सुरूवात झाली, कारण सरकारला जाणवू लागलं की त्यांचे बहुसंख्य मतदार शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत व परवडणारी घरं ही त्यांची गरज आहे. त्यामुळेच सरकारनं आणखी घरं बांधली जावीत यासाठी धोरणं तयार करायला सुरूवात केली कारण घरांच्या किंमती कमी करण्यासाठी त्यांचा पुरवठा वाढवणं हा एकमेव उपाय होता. असं धोरण तयार करण्यात आलं की ज्यामध्ये अगदी २० एकर कृषी जमीनही निवासी क्षेत्रात रुपांतरित करता येईल. ही मर्यादा आधी अखंड १०० एकर क्षेत्र असलेल्या जमिनीसाठीच होती व जी बहुतेक बांधकाम व्यावसायिकांच्या आवाक्याबाहेरची होती.

पॅन कार्डचे बदलेले महत्वाचे नियम

Reading Time: 2 minutesदहा क्रमांक असलेलं  पॅन कार्ड हे एक किती महत्त्वाचं कार्ड आहे हे सांगायला नको. एका दिवसात बँकेद्वारे  पन्नास हजारावरील आर्थिक व्यवहार करताना धारकाजवळ पॅन कार्डची आवश्यक असते. या नियमांची प्रत्येकाला माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बदलण्यात आलेल्या नियमांपैकी चार नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत.

आयुष्यमान भारत योजना

Reading Time: 3 minutesआयुष्यमान भारत ही भारत सरकारची महत्वाकांक्षी आरोग्यविमा योजना असून, त्यामधून १०.३६ कोटी अल्प उत्पन्न असलेल्या गरीब कुटुंबांतील साधारणपणे ५० कोटी लोकांना ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्यविम्याचे संरक्षण दरवर्षी मिळेल. २३ सप्टेंबर २०१८ रोजी ही योजना सर्व भारतभर अमलात आली आहे. ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्यविमा योजना ठरली आहे.

गूगल पैसा कसं कमावतं? भाग १

Reading Time: 2 minutesगूगल आपल्याला ‘फ्री’ मध्ये इतकं सारं कसं काय देतं? किंवा का देतं? असे प्रश्न साहजिकच अनेकांना पडतात. अर्थात ते पडायलाच हवेत.आज ‘माय’ सोडल्यास कोणीही फ्रीमध्ये काहीही देत नाही. मग ही गूगलगाय मोफत गूगल दुग्ध कशी देत असावी? मग गूगल पैसा कसं कमावतं? हे प्रश्न अनेकांच्या मनात असतात. गूगल ही पाश्चिमात्य कंपनी. त्यामुळे “फ्री मील्स” देण्याचा संबंधच नाही. गूगल हवं तेव्हा हवं तितकं त्याच्या ‘सर्च इंजिन’द्वारे कुठे कुठे फिरवून आणतं, हवी ती माहिती देतं. गूगलच्या ‘जीमेल (Gmail) वरून वैयक्तिक तसेच व्यावहारिक मेल संवाद सुरूअसतात. मग ही सर्व ‘सेवा’ गूगल कशी ‘फ्री’ मध्ये त्याच्या ‘ग्राहकांना’ कशी देत असेल? आणि का देत असेल?

नवीन वर्ष ग्राहक राजाचं … !! भाग २

Reading Time: 2 minutesआपलं राज्य कृषीप्रधान राज्य असल्यामुळे अनेक वर्षं आपल्या सरकारनं ग्रामीण भागावर लक्षं केंद्रित केलं होतं व स्वाभाविकपणे बहुतेक महत्वाची धोरणं ग्रामीण विकासाला अनुकूल होती. यामुळे सरकारचं पुणे व नाशिकसारख्या शहरांच्या गरजांकडे दुर्लक्ष होत होतं. परिणामी घरे बांधण्यासाठी कमी जमीनी उपलब्ध होत्या तसंच बांधकाम प्रकल्पांच्या परवानग्यांची यंत्रणा अतिशय गुंतागुंतीची होती. पुण्यामध्येही साधारण ४० वर्षांपूर्वी म्हणजे ७० च्या दशकाच्या सुरूवातीला रिअल इस्टेट क्षेत्राची वाढ सुरू झाली. तेव्हा या क्षेत्रात कमी व्यावसायिक होते व यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे जमीनही कमी होती.

१ जानेवारी २०१९ पासून ATM कार्ड्स अवैध ठरणार का?

Reading Time: 2 minutesबँकेकडून देण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्डमध्ये आता एक महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे, तो म्हणजे जुन्या मॅग्नेटिक स्ट्रीपऐवजी EMV (युरोपे, मास्टरकार्ड आणि व्हिसा) कार्ड्स आता चलनात येतील. तसेच रिझर्व बँकेच्या आदेशानुसार जुनी मॅग्नेटिक स्ट्रीप असलेली  सर्व कार्ड्स १ जानेवारी २०१९ पासून ब्लॉक केली जातील. रिझर्व बँकेने २७ ऑगस्ट, २०१५ रोजी दिलेल्या आदेशानुसार दिनांक १ सप्टेंबर, २०१५ पासून बँकांनी EMV तंत्रज्ञान असणारे कार्ड जरी करणे बंधनकारक आहे.