Reading Time: 2 minutes

भारत सरकारने ११ लाखांपेक्षा अधिक पॅन कार्ड निष्कीय्र केले आहेत. विविध कारणांमुळे आपले पॅन कार्ड निष्क्रिय झाले असण्याची शक्यता आहे.

पॅन कार्ड रद्द होण्याची कारणे-

  1. एका व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा अधिक पॅन कार्ड असल्यास,

  2. चुकीची अथवा नकली कागदपत्रे जमा करून नकली पॅन कार्ड मिळवले असल्यास,

  3. सरकारी आदेशानुसार दिलेल्या मुदतीत आपल्या पॅन कार्डला आधार कार्ड संलग्न न केल्यास.

कोणत्याही कारणाने पॅन कार्ड रद्द झाल्यास आपल्या आयकर ई-खात्यात लॉग-इन करण्यास, ई-रिटर्न दाखल करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या इन्कम टॅक्सच्या ऑनलाईन खात्यात लॉग-इन करू शकत नसाल, तर तुमचे पॅन कार्ड रद्द झालेले असू शकते. अशा वेळी आपले पॅन कार्ड सक्रीय आहे की नाही हे तपासणे उपयुक्त ठरते.

आपले पॅन कार्ड सक्रीय आहे कि नाही हे तपासण्यासाठी कुठेही लॉग-इन करण्याची आवश्यकता नाही. पुढील साध्या सरळ टप्प्यांनी आपण आपल्या पॅन कार्डची सक्रीयता तपासू शकता. 

 

  1. आयकर खात्याच्या ई-फायलिंग पोर्टलवर (https://www.incometaxindiaefiling.gov.in/home) ला भेट द्या.

  2. या मुखपृष्ठावर डाव्या बाजूला Know Your Pan असा पर्याय निवडा.


  3. Know Your Pan हा पर्याय निवडल्यावर दिसणाऱ्या पृष्ठावर आपल्याला आपली वैयक्तिक माहिती प्रविष्ट करावी  लागेल.

  4. विचारलेली माहिती प्रविष्ट केल्यानंतर  ‘submit’ हा पर्याय निवडा. 

  5. माहिती सबमिट केल्यानंतर आपल्या नोंदणीकृत caबाईल नंबरवर आपल्याला वन टाईम पासवर्ड (ओटीपी) पाठवण्यात येईल.

  6. तो ओटीपी दिलेल्या रकान्यात प्रविष्ट करा आणि ‘Validate’ हा पर्याय निवडा.

     

  7. यानंतर आपल्या पॅन कार्डशी संबंधित सर्व माहिती आपल्याला दिसू लागेल.

  8. जर आपल्या वैयक्तिक माहितीशी संलग्न अनेक पॅन कार्ड असतील तर तशी सूचना आपल्याला दर्शवली जाईल. 

  9. आपला पॅन कार्ड क्रमांक, संपूर्ण नाव, राष्ट्रीयत्व आणि पॅन कार्ड स्थिती दर्शवलेली असेल. त्यात आपले पॅन कार्ड ‘active’ आहे कि ‘deactive’ हे लक्षात येईल.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.