Gold v/s Diamond: हिरे की सोने?
हिरे विरुद्ध सोने (Gold v/s Diamond) यांची गुंतवणुकीच्या दृष्टीने तुलना करायची म्हटलं तर विविध गोष्टी विचारात घ्यावं लागतील. ‘स्मार्ट गुंतवणूकदार’ सोने व हिरे फक्त दागिने करण्यासाठीच वापरत नाहीत तर, या दोन्ही धातूंकडे ‘गुंतवणूक’ म्हणून बघतात. सोन्याचे दागिने परिधान करणे आपल्या इथे भूषणावह समजलं जातं, तर अंगठीतला चकाकणारा हिरा आपोआपच लक्ष वेधून घेतो. थोडक्यात काय तर अशा धातूंच प्रत्येकाला नेहमीच आकर्षण असतं. पण यांचा विचार एक गुंतवणूकीचा पर्याय म्हणूनही करून पहा. सोने किंवा हिरे यामधील कुठली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते याबाबत आपण या लेखात जाणून घेऊ.
सोन्याच्या प्रचंड साठ्यातील पैसा फिरेल कसा ?
Gold v/s Diamond: हिरे की सोने?
हिरा (Diamond)
- भारतात मुख्यत: चांदी किंवा सोन्याच्या दागिन्यांची शोभा वाढवण्यासाठी हिरे खरेदी करतात. मात्र रिटेल गुंतवणूकदार हिऱ्याकडे गुंतवणूकीचे साधन म्हणून पाहतात.
- हिऱ्याच्या भावात जास्त चढउतार नसतात व याचे भाव सातत्याने वाढत असतात हे त्यामागचे महत्वाचे कारण आहे.
- हिऱ्यांची किंमत जागतिक अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते.
- हिरे खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जागितक बाजारात ज्यावेळी आर्थिक स्थिरता असेल त्यावेळी हिरे खरेदी करणे फायद्याचे आहे. कारण हाच काळ हिऱ्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य असतो.
- हिऱ्यांची खरेदी करताना त्याची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.
- हिऱ्यांच्या बाजारभावाविषयी जागरूक असणे गरजेचे आहे. त्यासाठी या क्षेत्रातील उद्योजकांचा सल्ला घेणे घेणे कधीही उत्तम
- जर तुम्ही हिऱ्यांची खरेदी गुंतवणूकीसाठी करत असाल, तर रिसेल किमतीचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
- तुमच्याकडे काही दुर्मिळ हिरे असतील, तर ते विकण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करावा लागतो. वेगवेगळे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म किंवा लिलावाद्वारे हे हिरे विकावे लागतात.
- हिऱ्यांवर कुठलाही हॉलमार्क नसतो म्हणून सोन्याप्रमाणे हिऱ्यांची खरेदी डोळे झाकून करता येत नाही.
- हिरा जरी आकर्षित करत असला तरी त्याच्या खरेपणाची पडताळणी करणे आवश्यक असते.
- हिरा मुळातच सर्वात आकर्षक धातू आहे. यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी हिरा खरेदी करताना किमतीत घासाघीस म्हणजेच करायला जमायला हवी
सोनं खरेदी करताय? थांबा, आधी हे वाचा
हिरे: गुंतवणूकीसाठी आवश्यक ४ महत्त्वाचे घटक
हिऱ्यांमध्ये गुंतवणूक करताना ४ “सी” महत्त्वाचे आहेत ते म्हणजे
- क्लॅरिटी (Clarity) – हिऱ्यावर काही तडे किंवा क्रॅक्स तर नाहीत ना हे खरेदी करण्यापूर्वी तपासणे आवश्यक असते.
- कलर (Colour) – हिऱ्याचा रंग अत्यंत महत्त्वाचा असतो. रंगहीन हिऱ्यांना जास्त किंमत असते. म्हणून हिऱ्यांच्या रंगाविषयी माहिती असणे गरजेचे आहे.
- कट (Cut) – ‘कट’ हा हिऱ्यांविषयीचा महत्त्वाचा पैलू आहे. हिऱ्यांचा प्रतिबिंब गुणधर्म किंवा आकार हा ‘कट’ वर अवलंबून असतो. हिऱ्यावर पडणारा प्रकाश कसा परावर्तित होऊ शकतो हे कट वर अवलंबून असते. ‘चांगला कट असणारा हिरा’ हीच या रत्नाची खरी पारख आहे.
- कॅरट (carat)- हे धातूच्या वजनाचं एकक आहे. कॅरटमधील वजनानुसार हिऱ्याची किंमत कमी जास्त होते.
सुवर्ण गुंतवणुकीचे ‘डिजिटलायजेशन’
सोने – (Gold)
- सोने हा गुंतवणूकीचा सुरक्षित पर्याय आहे. प्राचीन काळापासून सोने या धातूकडे गुंतवणूकीचा उत्तम पर्याय म्हणून पाहिले जाते. सणासुदीला सोन्याची खरेदी गुंतवणूकीच्या हेतूसाठी केली जाते.
- सोन्याची फेरविक्री सहज होऊ शकते व चांगली किंमत येते.
- काही संशोधकांनी २२ कॅरेट सोन्याच्या खरेदीविषयी सकारात्मक मत मांडले आहेत. त्यांच्यामते २२ कॅरेट सोने सुद्धा तितकंच सुरक्षित व विश्वासार्ह आहे.
हिरे की सोने (Gold v/s Diamond)-
१. सुरक्षित पर्याय:
- हिऱ्यांची खरेदी ही संपूर्णपणे जागतिक बाजारावर अवलंबून असते. त्यामुळे किमतीच्या चढउताराबाबत फारसा अंदाज लावता येत नाही.
- या उलट आर्थिक घसरण झाली तरी सोने हा गुंतवणूकीचा सुरक्षित पर्याय असू शकतो.
२. फेरविक्री (Resale)
- हिऱ्यांची फेरविक्रीची किंमत खूप कमी असू शकते बहुधा ती सराफांच्या धोरणानुसार बदलते.
- सोन्याची फेरविक्री किंमत चांगली येते.
३. नगदी किंमत:
- वेळ प्रसंगी अडीअडचणीला सोने मोडून चांगली नगदी किंमत उभी करता येते.
- हिऱ्यांची फेरविक्री विशिष्ट बाजारातच होऊ शकते. त्यामुळे चटकन हिरे विकून पैशाची उभारणी करणे सहजी शक्य नसते.
Govt Bonds : सरकारी बॉन्ड्स म्हणजे दीर्घकालीन गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय !
४. विशिष्ट ज्ञान आणि पुनरावलोकन
- हिऱ्यांची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी विशिष्ट ज्ञान आणि माहिती तसेच पुनरावलोकन करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे.
- सोने खरेदीसाठी ‘हॉलमार्क’ची सुविधा उपलब्ध असल्याने जुजबी माहिती पुरेशी असते.
५. तारण
- सोने तारण ठेवून बँकाद्वारे कर्ज ही मिळवता येते.
- कोणतीही बँक किंवा फायनान्शिअल इन्स्टिट्यूशन हिरे तारणावर कर्ज देत नाही.
६. रोकड –
- सोने बाजारभावानुसार विकता येते व त्वरित रोख रक्कम मिळते. तसेच, सोन्याला नियमित मागणी असते.
- हिरा हा चांगला किंवा आयकॉनिक असेल तरच त्याची फेरविक्रीची किंमत चांगली येते.
भारतातील मान्यताप्राप्त शेअर बाजार आणि वस्तुबाजार
कुठल्याही प्रकारच्या गुंतवणूकीत दोन बाजू असतात. हिऱ्यांची गुंतवणूक आकर्षित करणारी असली तरी त्यामध्ये बऱ्याच उणीवा आहेत. थोडक्यात, वर दिलेल्या मुद्द्यांनुसार, हिरा खरेदी करताना त्याचा बाजारभाव, गुणधर्म,फेरविक्रीची प्रकिया, खरेपणाची पडताळणी या गोष्टींच खोलवर ज्ञान असेल तरच गुंतवणूकीसाठी हिऱ्यांचा विचार करावा. अन्यथा सोन्यासारखा सुरक्षित गुंतवणूकीला पर्याय नाही.
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Web Search: Which Is Good To Invest, Gold Or Diamond? Marathi Mahiti, Gold vs Diamond in Marathi, Diamond Investment Marathi Mahiti, Gold Investment Marathi , sone viruddha hira