सोने खरेदी
Reading Time: 3 minutes

दसरा- दिवाळी म्हटली की आपल्या मराठी बांधवांची सोने खरेदी करण्यासाठी धावपळ चालू होते. बरेच जण सोनाराकडे जाऊन सोन्याची नाणी किंवा सोन्याचे दागिने खरेदी करीत असतात. या सणासुदीला सोने खरेदीदार थोडे द्विधा मनस्थितीत दिसतायेत. कारण गेल्या ६-८ महिन्यात सोन्याचे भाव २०% पेक्षा जास्त दराने वाढले आहेत. नवीन सोने आता खरेदी करावे का की थोडे थांबून सोन्याचे भाव खाली येतात का पाहावे, असा विचार करताना सोने खरेदीचा निर्णय करणं अवघड जात आहे. 

सोने खरेदी करणारे दोन प्रकारचे लोक असतात- 

  1. ज्यांना आपल्या मुला/ मुलींच्या काही वर्षानंतर होणाऱ्या लग्नसराईसाठी सोने जमवायचे असते.
  2. काहींना सोने हा अतिशय सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय वाटतो म्हणून.

जेव्हा आपण सोन्याची नाणी किंवा दागिने घेतो किंवा विकतो, तेव्हा सोनाराकडून वजन किंवा किमतीमध्ये फसवणूक होण्याची शक्यता असते. तसेच, भेसळीचीही शक्यता असू शकते. काही वेळा आपण बाळगीत असलेल्या सोन्याच्या चोरीचीहि आपत्ती आपल्यावर ओढवू शकते. आपल्या सोन्यातील गुंतवणुकीत आपली अजिबात फसवणूक होऊ नये म्हणून आपल्यासाठी बाजारामध्ये काही पर्याय उपलब्ध आहेत. 

सुवर्ण गुंतवणुकीचे ‘डिजिटलायजेशन’

१. भारत सरकारची गोल्ड बॉण्ड योजना:-

  • भारतीय नागरिक, एचयुएफ (HUF), शैक्षणिक आणि धार्मिक ट्रस्ट या योजनेमध्ये भाग घेऊ शकतात.
  • कमीत कमी १ ग्राम सोने इतका एक बॉण्ड असतो, भारतीय नागरिक वर्षाला ४ कि.ग्रॅम पर्यंतचे बॉण्ड घेऊ शकतात. तसेच, एचयुएफ (HUF) व ट्रस्ट वर्षाला २० कि.ग्रॅमचे बॉण्ड घेऊ शकतात.  
  • बॉण्डचा कालावधी हा ८ वर्षाचा असतो मात्र ५ वर्षानंतर बॉण्ड वरील व्याज मिळण्याच्या तारखेला तुम्ही हे बॉण्ड विकू शकता. 
  • गोल्ड बॉण्ड आपल्याला, सरकारी बँक / ठराविक पोस्ट कार्यालये/ स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची कार्यालये किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज इत्यादी ठिकाणी खरेदी करता येतात. 
  • गोल्ड बॉण्डचे सर्टिफिकेट असते  किंवा आपण ते डिमॅट अकाउंट मध्येही सांभाळू शकतो. गोल्ड बॉण्ड जर दुय्यम बाजारातून घेतले, तर गुंतवणूकदाराला वर उल्लेखिलेल्या गोल्ड बॉण्ड खरेदी मर्यादेचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. 
  • गोल्ड बॉण्डचे खरेदीदार जर जोडीदार (जॉईंट) असतील, तर गोल्ड बॉण्डची मर्यादा प्रथम धारकाला लागू होते.
  • गोल्ड बॉण्डची किंमत ही ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या सरासरी किमतीवर ठरवली जाते. प्रत्येक महिन्याच्या काही ठराविक दिवशी ४-५ दिवस ही योजना गुंतवणूकदारांना खुली असते. योजना ज्या आठवड्यामध्ये खुली होते त्याच्या आदल्या आठवड्यातील लागोपाठच्या ३ व्यवसाय दिवसाच्या सोन्याची सरासरी किंमत ( इंडिया बुलिओन अँड ज्वेलर्स असोसिएशन ने जाहीर केलेली) ही त्या गोल्ड बॉण्डची किंमत असते. 
  • गोल्ड बॉण्ड जर रोखीने खरेदी करायचे असतील, तर कमाल रु. २०,००० रक्कमचे बॉण्ड घेऊ शकतो, डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी जर हे बॉण्ड नेट बँकिंगने खरेदी करायचे असतील, तर सरकारतर्फे प्रत्येक ग्रॅम सोन्यामागे रु. ५० ची सवलत दिली जाते.
  • GS Act, 2006 भारत सरकारचा समभाग, या अंतर्गत गोल्ड बॉण्ड चे वितरण केले जाते. गुंतवणूकदारांना धारण प्रमाणपत्र वितरित केले जाते. गुंतवणूकदार त्याला डिमॅटमध्येही रूपांतरित करू शकतो. 
  • गुंतवणूकदाराला जेव्हा हे बॉण्ड विकायचे असतात तेव्हा सुद्धा किंमत निर्धारित करण्याकरिता वर उल्लेखिलेली ३ दिवसाच्या सरासरी किमतीची पद्धत अवलंबली जाते.
  • गुंतवणूकदाराला गोल्ड बॉण्ड वर व्याजही दिले जाते. वार्षिक २.५% दराने दर सहामाहीला व्याज दिले जाते. गुंतवणूकदाराला जर कर्ज घ्यायचे झाल्यास, गोल्ड बॉण्ड तारण म्हणून ठेवता येते. रिजर्व बँकेची सोने तारण कर्ज संबंधित नियमावली यासाठी लागू होते.
  • गोल्ड बॉण्ड खरेदीपूर्वी गुंतवणूकदाराला KYC साठी लागणारी कागदपत्रे तसेच त्याचा PAN नंबर अत्यावश्यक असतो.
  • गोल्ड बॉण्डवर मिळणारे व्याज हे आयकर कायदा १९६१ ( ४३/१९६१) च्या तरतुदीनुसार करपात्र असते. मात्र गोल्ड बॉण्ड किमान ५ वर्षानंतर बँकेला विकतेवेळी त्यावर कोणत्याही प्रकारचा कर लागत नाही. बॉण्ड जर ५ वर्षांपूर्वी दुय्यम बाजारात दुसऱ्या गुंतवणूक दाराला विकायचे असल्यास होणाऱ्या भांडवली लाभावर कर भरावा लागतो.

सुवर्ण गुंतवणुकीची धनत्रयोदशी

२. म्युच्युअल फंडाचे गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड: –

  • यासाठी गुंतवणूकदाराला त्याचे डिमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे.
  • गोल्ड ईटीएफ (ETF) मध्ये खर्च खूप कमी असल्याने गुंतवणूकदाराला जास्त फायदा होतो. म्युच्युअल फंड साधारण १% इतका खर्च आकारतात. त्या व्यतिरिक्त गुंतवणूकदारांचा शेयर ब्रोकर जी दलाली आकारत असेल ती द्यावी लागते. गोल्ड ईटीएफची खरेदी विक्री ही कंपनीच्या समभागाप्रमाणे शेयर बाजारावर करता येते. 
  • गोल्ड ईटीएफ शेयर बाजारावर विकल्या नंतर होणाऱ्या भांडवली लाभावर कर भरावा लागतो. ३ वर्ष पर्यंत त्याला शॉर्ट टर्म भांडवली लाभ म्हणतात व त्याला गुंतवणूकदाराच्या एकूण मिळकतीमध्ये समाविष्ट करून त्याला त्यावर कर भरावा लागतो. ३ वर्षानंतरच्या विक्रीवर होणार भांडवली लाभ हा लॉन्ग टर्म भांडवली लाभ मानला जातो व त्यावर लागणारा कर हा कमी असतो.

सोन्याच्या प्रचंड साठ्यातील पैसा फिरेल कसा ?,

वर माहिती दिलेले दोन्ही पर्याय हे गुंतवणूकदारांसाठी जास्त फायद्याचे आणि सोयीस्कर आहेत. ना सोन्याच्या चोरीची भीती ना सोनाराकडून होणाऱ्या फसवणुकीची भीती. आपल्याला आपल्या मुलांच्या लग्नात जेव्हा दागिने बनवायचे असतील त्यावेळी आपली गुंतवणूक मोडून आपल्या मुलांच्या पसंतीचे दागिने बनवू शकतो.

सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी या उपयुक्त पर्यायांचा जरूर विचार करावा.

दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !! 

धन्यवाद!

– निलेश तावडे

9324543832

[email protected]

(लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्ष कार्यरत होते सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत.)

(म्युच्युअल फंड गुणवणूक ही बाजारातील उतार चढावाच्या अधीन असते. योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)

For suggestions queries – Contact us: [email protected] 

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Gold Investment Marathi Mahiti, Gold investment in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…