debit card vs credit card
Reading Time: 4 minutes

Credit Card vs Debit Card

आजच्या भागात आपण आपल्या नेहमीच्या वापरात येणाऱ्या डेबिट कार्ड आणि क्रेडिट यामध्ये नेमका फरक काय आहे (Credit Card vs Debit Card) याबद्दल माहिती घेऊया.

डिजिटल पेमेंट व ऑनलाइन खरेदीच्या आजच्या काळात, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. कार्डने पैसे देण्याच्या या काळात आज प्रत्येकाच्या खिश्यामध्ये कार्ड असते. जेणेकरून, जिथे गरज भासेल तिथे सहज पैसै देता येतील.

कार्डच्या या वापरामुळे खुप जास्त पैसै सोबत बाळगण्याची देखील भिती नाही आणि अर्थातच कार्ड वापरायला देखील सोपे असल्याने प्रत्येक जण त्याचा वापर करतो. परंतू तुम्हाला क्रेडिट आणि डेबिट कार्डमधील फरक माहितीये का ? अनेक वेळा आपण या दोन्ही कार्डांना एकसारखे समजण्याची चूक करत असतो. मात्र या दोन्ही कार्डांमध्ये खूप फरक आहे.  चला तर मग समजून घेऊया की, या दोन्ही कार्डांमध्ये काय फरक आहे. 

हे नक्की वाचा: क्रेडिट कार्ड योग्य पध्दतीने कसे वापरावे?

डेबिट कार्ड –

  • डेबिट कार्ड हे बँकेमार्फत ग्राहकांना व्यवहार करण्यासाठी देण्यात येत असते. आजकाल ग्राहकाने बॅंकेत खाते उघडताच, त्याला डेबिट कार्ड देण्यात येते. ज्याला एटीएम कार्ड असे देखील म्हणतात. याद्वारे ग्राहक बँकेतील लांबलचक रांगेमध्ये उभे न राहता, सहजपणे एटीएममधील पैसे काढू शकतो.
  • कार्डचा वापर करून तुम्ही जेवढ्याही रूपयांचा व्यवहार कराल, ते पैसे तुमच्या चालू खाते अथवा बचत खात्यामधून वजा होतात आणि ज्या व्यक्तीशी तुम्ही व्यवहार केला आहे, त्याच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होतात.
  • डेबिट कार्डद्वारे तुम्ही जेवढे पैसे तुमच्या खात्यामध्ये आहेत तेवढ्याच रक्कमेचा व्यवहार करू शकता. जर तुमच्या खात्यामध्ये पैसै नसतील तर डेबिट कार्डचा काहीही उपयोग होणार नाही.
  • डेबिट कार्ड हे तुमच्या खात्याशी सलग्न (लिंक) असते.  डेबिट कार्डबरोबरच त्याच्या वापरासाठी बँकेद्वारे सुरक्षित चार आकडी पासवर्ड देखील तुम्हाला दिला जातो. व्यवहार करताना त्या चार आकडी पिनचा वापर करून तुम्ही व्यवहार पुर्ण करू शकता.

डेबिट कार्डचे फायदे –

  • जास्त रोख रक्कम जवळ बाळगणे गरजेचे नाही : कार्डचा वापर होण्याआधी घराबाहेर पडताना नेहमी खिश्यामध्ये रोख रक्कम जवळ बाळगावी लागत असे. ती रोख रक्कम चोरीला जाण्याची, हरवण्याची भिती देखील सतत मनामध्ये राहत असे. मात्र डेबिट कार्डमुळे ही चिंता दूर झाली आहे. डेबिट कार्डचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे कार्ड तुमच्या जवळ असल्याने, जास्त रोख रक्कम जवळ बाळगणे गरजेचे नाही.
  • रोख रक्कम एटीएम मधून काढू शकता: डेबिट कार्ड हे एक प्रकारे तुमच्या बरोबर असलेले तुमचे बँक खातेच असते, ज्याचा वापर करून तुम्ही कधीही एटीएममधून रोख रक्कम काढू शकतात.
  • डेबिट कार्डचा वापर करून 24X7 कधीही व्यवहार पुर्ण करू शकता.

इतर लेख:  काय आहे बचतीचा आधुनिक फॉर्म्युला?

क्रेडिट कार्ड –

  • या कार्डाचा वापर देखील डेबिट कार्डप्रमाणे डिजिटल व्यवहार पूर्ण करण्यासाठी केला जातो. मात्र डेबिट कार्डसाठी ज्याप्रमाणे बॅंकेत खाते असण्याची गरज असते. तसे बँक खाते क्रेडिट कार्डसाठी असण्याची गरज नाही.
  • बँकेत खाते न उघडताही तुम्ही क्रेडिट कार्ड मिळवू शकता. अनेक फायनान्स कंपन्यादेखील क्रेडिट कार्ड प्रदान करतात. क्रेडिट कार्ड घेताना, यामध्ये तुमची रक्कम परत करण्याची क्षमता लक्षात घेऊन, क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करण्याची मर्यादा निश्चित करण्यात येते. ही मर्यादा 10-20 हजारांपासून लाखोंपर्यंत असू शकते.
  • क्रेडिट कार्डद्वारे महिन्याभरात आपण केलेले सर्व व्यवहारांचे देय हे बँकेने सुचित केलेल्या तारखेपर्यंत भरणे गरजेचे असते. या कार्डवर व्याज देखील आकारण्यात येत असतो. निश्चित तारखेपर्यंत पैसे न भरल्यास बँकतर्फे दंड आकारला जातो. हा व्याज व दंड हेच क्रेडिट कार्ड प्रदान करणाऱ्या कंपन्याचे नफा मिळविण्याचे प्रमुख साधन आहे.

क्रेडिट कार्डचे फायदे –

  • बँक खात्यामध्ये पैसे नसले तरीसुद्धा व्यवहार करू शकता : क्रेडिट कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे नसले तरीही, तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून व्यवहार पुर्ण करता येतो.
  • महागडी वस्तू हफ्त्याद्वारे खरेदी करता येते : सर्व सामान्य व्यक्तीला महागडी वस्तू एकदम रोख रक्कम भरून घेता येणे शक्य नसते. अशा वेळेस ती व्यक्ती हफ्त्याद्वारे ती वस्तू खरेदी करत असते. क्रेडिट कार्डचा वापर करून देखील महागडी वस्तू हफ्त्याद्वारे खरेदी करता येते. क्रेडिट कार्डमुळे प्रत्येक हफ्ता सहजपणे दिला जातो. त्यामुळे वस्तू विकत घेतांना आपल्या खात्यामध्ये पैसे नसले तरी काहीही चिंता करण्याची गरज नाही.
  • आणीबाणीला मदत : अत्यंत निकडीच्या प्रसंगी क्रेडिट कार्डचा वापर करून कॅश देखील काढता येते. मात्र यावर अधिक प्रमाणात व्याजाची आकारणी केली जाते.

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डमधील समानता –

  • दोन्ही कार्ड बऱ्याच अंशी एकसारखी आहेत. या दोन्ही कार्डांचा वापर डिजिटल व्यवहारासाठी केला जातो. या दोन्ही  कार्डांद्वारे आज डिजिटल व्यवहार करणे सोपे झाले आहे.
  • या दोन्ही कार्डांची सेवा कोणत्या ना कोणत्या बॅंकेद्वारेच उपलब्ध केली जाते.
  • दोन्ही कार्ड दिसायला एकसारखेच असतात. आकार, रंग एकसारखेच असते.
  • दोन्ही कार्डांची वापरण्याची पध्दत देखील एकसारखीच आहे.

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डमधील फरक –

  • डेबिट कार्डद्वारे तुम्ही स्वतःच्या बँक खात्यातीलच पैश्यांचा वापर करून व्यवहार करता. मात्र क्रेडिट कार्डद्वारे बँकेकडून पैसे उधार घेतले जात असतात.
  • डेबिट कार्डद्वारे काढण्यात आलेल्या पैश्यांवर व्याज द्यावे लागत नाही. मात्र क्रे़डिट कार्डद्वारे काढण्यात आलेल्या पैश्यांवर व्याज भरावे लागते.
  • डेबिट कार्डवर बॅंकेद्वारे लावण्यात येणारा वार्षिक सर्विस चार्ज हा क्रेडिट कार्डच्या तुलनेत अत्यंत कमी असतो.
  • डेबिट कार्ड हे फक्त भारतातील व्यवहारा पुरते मर्यादीत आहे. मात्र क्रेडिट कार्डचा वापर बहुतांश देशात एकसारखा आहे. त्यामुळे परदेशी प्रवास करताना क्रेडिट कार्डचा उपयोग करतात.
  • डेबिट कार्डवरील ऑनलाइन व्यवहाराची मर्यादा ही तुमच्या बॅंक खात्यातील रक्कम निश्चित करते तर क्रेडिट कार्डवरील मर्यादा मात्र बँक निश्चित करत असते.

कोणत्या कार्डचा उपयोग कधी कराल ?

  • डेबिट कार्डचा वापर हा भारतापुरताच मर्यादित असल्याने परदेशी प्रवास करताना त्याचा वापर होत नाही. अशावेळेस परदेशात क्रेडिट कार्डचा वापर करावा.
  • दैनदिन व्यवहारात डेबिट कार्डचा वापर करणे अनेक वेळा फायदेशीर ठरत असते.
  • अनेक वेळा आपल्याला मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची सवय असते अशावेळेस ऐपत नसताना दिखाव्यासाठी खर्च करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केल्याने कर्जात बुडण्याची शक्यता असते.
  • काही वेळेस कार एजन्सी व हाॅटेलमध्ये क्रेडिट कार्डचा वापर करण्याचा आग्रह धरतात. जेणेकरून, काही नुकसान झाले तर क्रेडिट कार्डमधून भरपाई करू शकतात. अशा वेळेस तेथे क्रेडिट कार्डचा वापर करता येतो.

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड या दोघांचे फायदे – तोटे आहेत. आपल्या खऱ्या गरजा आणि लोकांना “इम्प्रेस करायचे” म्हणून कृत्रिमरीत्या तयार होणाऱ्या गरजा यांचा विचार करून योग्य कार्डाचा वापर करावा.  

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Credit Card vs Debit Card Marathi Mahiti, Credit Card vs Debit Card in Marathi, Credit Card vs Debit Card Marathi,  Debit Card vs Credit Card Marathi Mahiti,  Debit Card vs Credit Card in Marathi , debit Card Marathi, debit Card in Marathi, debit Card Marathi Mahiti

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.