https://bit.ly/3pdNyNS
Reading Time: 2 minutes

मुहूर्त ट्रेडिंग

मुहूर्त ट्रेडिंग हे विशेष प्रतिकात्मक व्यापारी सत्र असून ते दिवाळीत स्टॉक एक्सचेंजमध्ये आयोजित केले जाते. बीएसई आणि एनएसई ‘शुभ मुहूर्त’ किंवा शुभ वेळेनुसार, एक तास व्यापारी सत्र आयोजित करतात. या सत्रादरम्यान व्यापार केल्याने गुंतवणुकदारांची वर्षभर भरभराट होईल व त्यांच्याकडे समृद्धी नांदते, असे म्हटले जाते. याकडे पाहण्याची आणखी काही कारणे आहेत. मुहूर्त ट्रेडिंमध्ये प्रामुख्याने खरेदीच्या ऑर्डर असतात. त्यामुळे बाजारात वेग येतो आणि बाजार सकारात्मक बिंदूवर बंद होतो. 

भारतीय गुंतवणुकदारांसाठी दिवाळी का विशेष आहे?

  • दिवाळी हा सण म्हणजे अंधारावर प्रकाशाचे, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावरील ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतीक आहे.
  • दिवाळीच्या आध्यात्मिक महत्त्वासोबतच, पारंपरिक हिंदू लेखा वर्षाची सुरुवात करतात, त्याला ‘संवत’ असे म्हणतात. संपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मी आणि प्रारंभाची देवता गणेश यांचीही दिवाळीला पूजा केली जाते. 
  • भारतीय लोक लेखा पुस्तके आणि त्यांच्याआर्थिक मालमत्तेची पूजा करतात.
  • व्यवसाय आणि दुकानांमध्ये जुनी लेखा पुस्तके बंद केली जातात. सकारात्मक मानसिकतेने नव्या लेखावर्षाची सुरुवात नव्या हिशोब वहिने केली जाते.
  • ग्राहकांच्या व्यापारी सत्रापूर्वी, गुंतवणूकदार आणि स्टॉक ब्रोकर्स लक्ष्मी आणि गणेशाचे आशीर्वाद घेण्यासाठी ‘चोपडा पूजन’ करतात. मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान सर्वत्र सकारात्मक मंगलमय वातावरणात गुंतवणूक करण्याचे चांगले कारण आपल्या मिळते.

मुहूर्त ट्रेडिंगची वेळ, तिचे महत्त्व आणि तुम्ही गुंतवणूक का करावी?:

  • दिवाळीच्या दिवशी स्टॉक मार्केट बंद असले तरी, मुहूर्त ट्रेडिंग सेशन्स जवळपास एक तासासाठी सुरू राहते.
  • मुहूर्त ट्रेडिंगची वेळ दरवर्षी बदलत राहते. त्या दिवसातील शुभ समजल्या जाणा-या वेळेनुसार, ही वेळ ठरवली जाते.
  • व्यापारी समुदाय जवळपास निम्म्या शतकापेक्षा जास्त काळापासून ही परंपरा पाळत आहेत.
  • १९५७ पासून बीएसई हे विशेष ट्रेडिंग सेशनचे आयोजन करत आहे. त्यानंतर १९९२ पासून एनएसईद्वारे याचे आयोजन होत आहे.
  • या वर्षी स्टॉक एक्सचेंज १४ नोव्हेंबर रोजी शनिवारी संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ दरम्यान याचे आयोजन करणार आहे.
  • मुहूर्त ट्रेडिंग सेशनदरम्यान, गुंतवणूकदार आणि ब्रोकर्स मूल्य-आधारीत स्टॉक्स खरेदी करतात, जे दीर्घकाळासाठी चांगले असतात.
  • या विशिष्ट मुहूर्तावेळी ग्रहांची दशा अशा प्रकारे असते, ज्याद्वारे गुंतवणूकदाराचे पुढील संपूर्ण संवतातील भविष्य उज्ज्वल राहते, अशी मान्यता आहे.
  • अनेक गुंतवणूकदार म्हणतात की, या वेळी घेतलेले स्टॉक्स त्यांच्यासाठी लकी ठरतात. ते शेअर्स खरेदी करतात आणि पुढील पिढीकडेही त्याचा वारसा देतात. काहीतरी नवीन सुरू करण्यासाठीदेखील दिवाळी हा आदर्श दिवस मानला जातो.
  • या विशेष ट्रेडिंग सेशनमध्येच बरेच लोक शेअर बाजारातील गुंतवणुकीची सुरुवात करतात.
  • या घडामोडींमुळे, मुहूर्त ट्रेडिंग सेशनमध्ये बाजार उसळलेला दिसून येतो. गुंतवणुकदारांच्या भावना सकारात्मक असतात, कारण बहुतांश क्षेत्रात खरेदी होते. 
  • या दिवशी स्टॉकच्या किंमती स्थिर राहतात कारण बहुतांश गुंतवणूकदार विक्रीपेक्षा खरेदी करण्याला पसंती देतात. मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान गुंतवणूकदार मौल्यवान गुंतवणूक करताना दिसून येतात.

हा दिवस शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी, मोठ्या खरेदीसाठी, टोकन गुंतवणूक किंवा पहिल्यांदा खरेदीसाठी एक योग्य दिवस आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता अधिक मौल्यवान स्टॉक्स खरेदी करणे महत्त्वाचे आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक भावनांना गुंतवणूकदारांच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत स्थान आहे. मात्र शेअर बाजारातील यशाकडे हात पुढे करण्यापूर्वी योग्य आर्थिक विश्लेषण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

– श्री प्रभाकर तिवारी  

सीएमओ 

एंजल ब्रोकिंग लिमिटेड

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…