Reading Time: 2 minutes

आयपीओ विषयी महत्वाचे : 

बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात आला आहे. ४ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत ९०% पेक्षा जास्त आयपीओ सबस्क्राईब करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांनी जवळपास १.८५ कोटी इक्विटी शेअर्स खरेदी केले आहेत. 

बिकाजी इंटरनॅशनल कंपनी आयपीओ मधून ८८१.२२ कोटी रुपये जमा करण्याचा विचार करत आहे. अँकर बुक कंपनीकडून त्यांना आयपीओच्या आधीच २६२ कोटी रुपये मिळाले आहेत. आयपीओ मधील शेअर्सची किंमत २८५ ते ३०० रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे. 

कंपनीचा इतिहास 

 • बिकाजी इंटरनॅशनल कंपनीची स्थापना सन ११९५ ला झाली होती. बिकाजीची भुजिया म्हणजेच शेव जगभरात आवडीने खाल्ली जाते. 
 • कंपनीचे बिकाजी हे नाव बिकानेरचे संस्थापक बिकाराव आणि आणि जी यावरून घेतले आहे. 
 • बिकाजी फुड्सची ओळख अस्सल भारतीय चवीचे पदार्थ म्हणून जगभरात झाली आहे. 
 • वर्ष २०२२ मध्ये कंपनीला १६२२ कोटींचा व्यवसाय झाला असून २०२१ च्या तुलनेत व्यवसायात २२% वाढ झाली आहे. 
 • वर्ष २०२१ मध्ये कंपनीने १३२१ कोटी रुपयांचा महसूल व्यवसायातून कमावला होता. 

 

नक्की वाचा : आयपीओमध्ये गुंतवणुकीपूर्वी या गोष्टींकडे लक्ष द्या 

 

बिकाजी इंटरनॅशनल फूड्स कंपनीच्या आयपीओ बद्दलच्या १० गोष्टी समजून घेऊयात. 

१. आयपीओची तारीख – 

 • बिकाजी इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सची विक्री ३ नोव्हेंबर पासून सुरु झाली असून ७ नोव्हेंबरला विक्री बंद करण्यात येणार आहे. 

२. आयपीओमधील शेअर्सची किंमत –

 • आयपीओ मधील शेअर्सची किंमत २८५ ते ३०० रुपयांपर्यंत असणार आहे. 

३. आयपीओ मधून कंपनी करणार निधीची उभारणी –

 • बिकाजी फूड्स कंपनी ८८१.२२ कोटी रुपयांचा निधी आयपीओमधून उभारण्याचा प्रयत्न करत आहे. 
 • या आयपीओतून २.९३ कोटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे. 
 • बिकाजी फूड्स इंटरनॅशनल कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी २.५ लाख शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना आयपीओमधील शेअर्सची खरेदी १५ रुपये कमी किंमतीने करता येणार आहे. 

४. कंपनीचे उद्दिष्टय –

 • बिकाजी फूड्स कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट निधी उभारणे हे आहे. 
 • आयपीओमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना लिस्टिंग झाल्यावर शेअर्सची विक्री करून पैसे काढून घेता येतात. 

५. लॉटचा आकार 

 • गुंतवणूकदार कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त ५० च्या पटीत असणाऱ्या शेअर्स साठी अर्ज देऊ शकतो. 
 • छोटे गुंतवणूकदार १५,००० रुपये गुंतवणूक करू शकतात. ते कमाल १३ लॉटसाठी १.९५ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात. 

६. कंपनी प्रोफाइल 

 • बिकाजी इंटरनॅशनल फूड कंपनीची ३०० उत्पादने आहेत. जून २०२२ पर्यंत कंपनीने २३ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये काम केले आहे. 
 • भारतीय मिठाई आणि स्नॅक्स प्रकारात मोठी होणारी बिकाजी इंटरनॅशनल फूड्स ही तिसरी कंपनी आहे. राजस्थान, आसाम आणि बिहार राज्यांमध्ये कंपनीचे मोठे मार्केट आहे. 
 • जून २०२३ पर्यंत कंपनीने २१ देशांमध्ये उत्पादनांची विक्री केली असून त्याचे ३.२ टक्के कंपनीच्या महसुलात योगदान राहिलेले आहे. 
 • कंपनीचे प्रमुख स्पर्धक म्हणून हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल, बिकानेरवाला, प्रताप स्नॅक्स, बालाजी वेफर्स, आयटीसी आणि पेप्सिको या कंपन्यांचा समावेश होतो. 

७. आर्थिक कामगिरी 

 • कंपनीच्या महसुलात २०२० पासून २०२२ पर्यंत २२.४४ टक्के वार्षिक चक्रवाढ दराने प्रगती नोंदवली आहे. वर्ष २०२२ मध्ये कंपनीने १६१०.९६ कोटी रुपयांचा नफा कमवला आहे. 
 • कंपनीचा जास्तीत जास्त महसूल हा भुजिया आणि नमकीन मधून आला आहे. या दोन विभागातून आलेला महसूल ७०% आहे. 
 • पॅकेज मिठाईचा समावेश होतो १३ टक्के महसुलात वाटा आहे. 

 

नक्की वाचा : आयपीओ म्हणजे काय? 

 

 

८. प्रवर्तक आणि व्यवस्थापन 

 • शिव अग्रवाल, शिव रतन अग्रवाल आणि दीपक अग्रवाल यांच्याकडे कंपनीतला ७६.५० टक्के हिस्सा आहे. 
 • गंगाबिशन अग्रवाल (हल्दीरामच्या ब्रँडचे संस्थापक) यांचे नातू शिव अग्रवाल अध्यक्ष आणि  संचालक आहेत. दीपक अग्रवाल हे व्यवस्थापकीय संचालक आहेत. 

९. लिस्टिंगची तारीख 

 • बिकाजी इंटरनॅशनल फूड्स कंपनी ११ नोव्हेंबर रोजी आयपीओचे अंतिम वाटप करेल. ११ नोव्हेंबर पर्यंत ज्यांना आयपीओ मिळाला नाही त्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातील. आयपीओचे १४ नोव्हेंबर पर्यंत डिमॅट खात्यात हस्तांतरण करण्यात येईल. 
 • बिकाजी फूड्स कंपनी १६ नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये पदार्पण करणार आहे. 

१०. ग्रे मार्केट प्रीमियम 

 • ग्रे मार्केट हे प्री आयपीओच्या शेअर्स साठी एक अनधिकृत व्यासपीठ आहे. गुंतवणूकदार हा आयपीओ स्टॉकच्या सूचिबद्ध किंमतीच्या माहितीसाठी  ग्रे मार्केटचा अभ्यास करत असतो. 
 • बिकाजी फूड्स इंटरनॅशनलच्या शेअरचा प्राईस ब्रॅण्डच्या तुलनेमध्ये २५ टक्के प्रीमियमने व्यवहार झाला आहे. 
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…