Reading Time: 2 minutes
 • चौदा फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या गाडीवर एक क्रूर हल्ला झाला त्यात सीआरपीएफ जवान शहीद झालेत.
 • या आर्मी, पॅरामिलिटरी सैन्यावर कायमस्वरूपी मृत्यूची टांगती तलवार, बरसती गोळी असते. तरीही जवान त्यात भरती होतात. तरीही भारतीय सैन्य बेखाँफ होऊन सिमेवर तैनात होतं. कशासाठी करतात ते सारं! फक्त नोकरीसाठी, भत्त्यांसाठी? 
 • मृत्यूनंतर कसली नोकरी आणि सुविधा! मृत्यूपेक्षा सगळ्यात मोठी भीती कसली! सुदृढ जीवनाहुन मोठा आशीर्वाद कसला! जिवंत असणे हा मोठा ईश्वराचा, निसर्गाचा आशीर्वाद आहे. पण या साऱ्या आशीर्वादांना बाजूला सारून जवान सैन्यात भरती होऊन सीमेवर जातो. काश्मीरमध्ये तैनात होतो. त्याला माहिती असतं मृत्यू  आपली मगरमिठी कधीही आवळू शकेल!
 • ज्याच्यामुळे आपण रात्री निश्चिंतपणे झोपू शकतो. त्यांच्यासाठी कृतज्ञ भाव हवाच. ज्या आर्मीमुळे, पॅरामिलिटरी फोर्सेसमुळे, संरक्षक संस्थांममुळे आपण देशाच्या अंतर्भागात निर्भयतेने राहतो, खातो, पितो, मजा करतो त्या संरक्षक फोर्सेसकरिता मनात धन्यवाद देण्याचा भाव असावाच. मग आपल्यासाठी जे जवान स्वतः  सीमेवर जागतात, लढतात, त्यांच्यासाठी आपण काहीही करू नये?
 • साधा गरीब  माणूससुदधा माझ्या मृत्यूनंतर माझ्या कुटुंबाचं काय होईल, या विचाराने कुटुंबाची आर्थिक जुळवाजुळव करून ठेवतो. मग जे सैनिक आपल्यासाठी स्वतःच्या कुटुंबाला सोडून देशसेवा पर्यायाने आपल्याच सेवेसाठी जातो. त्याच्यासाठी काहीतरी भरीव करण्याची जबाबदारी आपलीच नाही का! आपलं आयुष्य वाचवण्यासाठी सैन्य सीमेवर उभं आहे. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आपण कृतज्ञता भावातुन काही आर्थिक मदत करणे हे सामान्य नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे.
 1. नॅशनल डिफेन्स फ़ंड फॉर वेल्फेअर ऑफ आर्मड फोर्सेस :  हा एक संपूर्णपणे स्वेच्छेने चालणारा फ़ंड आहे. ज्या व्यक्तींना आर्मी फोर्सेस, पॅरॅमिलिटरी फोर्सेसला मदत करावीशी वाटते त्यांनी  एनडीएफद्वारे करावी.  स्वेच्छा मदत NDF च्या वेबसाईटवर, स्टेट बँक ऑफ इंडिया पोर्टल्स, पीएम इंडिया पोर्टल्स यांच्याद्वारे करता येते. वेबसाईट : https://ndf.gov.in
 2.  द आर्मी वेल्फेअर फंड बॅटल कॅज्युअलटिज : युद्धात किंवा ड्युटीवर असताना, हल्ल्यात जखमी झाले असता आर्मी जवानांना मदत म्हणून या फंडद्वारे मदत करता येते. In the favour of “Army welfare fund battle casualties”  या नावाने डिमांड ड्रॅफ्ट दिल्लीला पाठवता येतो. तसेच पुढील खात्यात सरळ पैसे भरता येतात
  • “Army welfare fund battle casualties” account with
  • Syndicate bank
  • Account number, 90552010165915
  • IFSC : SYNB0009055
 3. भारत के वीर  (Bharat ke Veer) : युद्धात शाहिद झालेल्या आर्मी , सीआरपीएफच्या जवानांच्या कुटुंबाला आर्थिक मदत या फंडद्वारे करता येते. भारत के वीर/ ब्रेवहार्टस ऑफ इंडिया हे सिनेअभिनेता अक्षय कुमार याने अग्रेसर होऊन सुरवात केलेलं काम आहे. ज्याला गृह खात्याने पाठिंबा दिलाय. “भारत के वीर”चं ऍप ही उपलब्ध आहे.  वेबसाईट : https://bharatkeveer.gov.in
 4.  दि आर्मी सेन्ट्रल वेल्फेअर फंड  : DONATE TO THE ARMY CENTRAL WELFARE FUND : या नावाच्या या फंडद्वारे देखील आर्थिक आर्मी जवानांना मदत करता येते. डिमांड ड्रॅफ्ट in favour of  “ARMY CETRAL WELFARE FUND”  payable at New Delhi, या नावाने डिमांड ड्रॅफ्ट पाठवता येऊ शकतो. पुढील खात्यात सरळ पैसे भरता येतात.
  • ARMY CETRAL WELFARE FUND
  • Corporation Bank
  • Account number – 020500101007721
  • IFSC- CORP0000205
 5. Contribution to Paraplegic Rehabilitation centre in Pune सैन्यातील जवानांना पाठीचा कणा संबंधित दुखापत झाल्यास येथे त्यांची पुढील काळजी आणि पुनर्वसन केलं जातं. paraplegic rehabilitation centre, Kirkee येथे सरळ डिमांड ड्रॅफ्ट किंवा रोख रकम पाठवता येते.
  • Paraplegic Rehabilitation centre, Kirkee
  • Account with Punjab National bank
  • Account number- 0278000100174484
  • IFSC – PUNB0027800

डोनेशन करके देखो अच्छा लगता है!  किमान एक मोठं सामाजिक, भावनिक, आयुष्यासंबंधित ऋण कमी केल्याचं समाधान नक्की मिळेल.

चित्र सौजन्य : https://goo.gl/12SPZL

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

 

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

मुले आणि अर्थसाक्षरता

Reading Time: 3 minutes माझ्या माहितीत असलेल्या एका व्यक्तीचे अलीकडेच निधन झाले. त्यांचा मुलगा एका नामवंत…

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.