स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताय? लक्षात ठेवा या ५ गोष्टी

http://bit.ly/2URefes
1 1,083

Get real time updates directly on you device, subscribe now.

Print Friendly, PDF & Email

स्टॉक मार्केट म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो भरघोस परतावा किंवा प्रचंड नुकसान. अनेकदा पूर्वग्रहदूषित नजरेने आपण स्टॉक किंवा शेअर्स खरेदीकडे बघत असतो. परंतु, तुमच्याकडे स्टॉक निवडण्याचे योग्य कौशल्य आणि सतत देखरेख करण्यासाठी वेळ असेल, तर तुम्ही स्टॉकमार्केट म्हणजे शेअर बाजारात गुंतवणुकीचा विचार करू शकता.  

म्युच्युअल फंडाच्या तुलनेत शेअर बाजारात गुंतवणूक करणे कठीण आहे. थोडक्यात हे काम तसे जोखमीचे आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना तुमचा स्टॉक पोर्टफोलिओ असणे गरजेचे आहे, शिवाय इतर स्टॉक बाबत योग्य माहिती असायला हवी. 

‘शेअर बाजारात पैसे गुंतवले म्हणजे बुडाले’ असा जुना समाज आहे कारण ही गुंतवणूक एक धाडसी निर्णय आहे असे अनेकांना वाटते. त्यामुळे या गुंतवणुकीचा फायदा घेण्यासाठी काही चुका जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजे. 

भारतीय स्टॉक एक्सचेंज- काय फरक आहे बीएसई आणि एनएसई मध्ये?

१.शेअर बाजाराची माहिती घ्या  –

 • समजा तुमच्या संघाचा क्रिकेटचा सामना होणार आहे त्याची पूर्व तयारी म्हणून तुम्ही कुठलाही सराव केला नाही, तर अर्थातच तुमच्या जिंकण्याची शक्यता खूप कमी असेल. इथेही तसंच आहे. जर शेअर बाजाराविषयी मूलभूत आणि पायाभूत ज्ञान नसेल, तर यामध्ये केलेली गुंतवणूक यशस्वी होऊ शकणार नाही. 
 • शेअर बाजार हा नशिबाचा वैगरे खेळ नाही, यासाठी तुमचा अभ्यास असणे गरजेचे आहे. अपेक्षित परतावा मिळण्यासाठी अभ्यास करून गुंतवणूक करा, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. 

२. निरर्थक आणि विनामूल्य सल्ल्यांकडे दुर्लक्ष करा –

 • टीव्ही किंवा इंटरनेट च्या माध्यमातून शेअर बाजाराविषयी अनेक विनामूल्य सल्ले किंवा टिप्स देण्यात येतात. या टीप्स अल्प मुदतीसाठी उपयोगी ठरू शकतात मात्र वैयक्तिक गुंतवणूकदारांना याचा फायदा होईलच असे नाही. 
 • भरमसाठ टिप्स आणि सल्ले ऐकून आपला संभ्रम होऊ शकतो.यामुळे कदाचित एखाद्या निर्णयामुळे आपले आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकते.

गुंतवणूक विशेष – शेअर बाजारात गुंतवणूक करताना लक्षात ठेवा या ४ महत्वाच्या गोष्टी

३. स्टॉक निवडताना काळजी घ्या 

 • स्टॉक निवडताना आपण आपली आवडती कंपनी किंवा आपले नातेवाईक ,मित्रमंडळी यांचं ऐकून एकाच स्टॉक मध्ये गुंतवणूक करतो पण ते चुकीचे ठरू शकते. 
 • मुळात शेअर बाजारातील गुंतवणूक हे एक जोखमीचे काम आहे आणि एका विशिष्ट कंपनीबाबत अंदाज बांधण्यात अधिक जोखीम असते. त्यामुळे त्या कंपनीवर भविष्यात कोणती कारवाई झाली किंवा मार्केटमधील किंमत ढासळली, तर आर्थिक नुकसान होऊ शकते. 
 • नेहमी ५-६ कंपनीचे पोर्टफोलिओ असणे चांगले. काही कंपनीचे शेअर्स खाली-वर होऊन तुमचं होणारं नुकसान कमी होईल. 

४. दीर्घकालीन  गुंतवणूक :

 • जर तुम्ही मालमत्ता वर्गाचा विचार करत असाल, तर इक्व्हीटी ट्रेडिंग हा पर्याय अल्प काळासाठी नुकसानकारक ठरू शकतो. कारण देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या विविध बाबींचा परिणाम इक्व्हीटी ट्रेडिंग वर होत असतो. 
 • उदाहरणार्थ, समजा जानेवारी महिन्यात स्टॉक मार्केट ६%ने खाली आहे आणि त्याचवेळेस नवीन गुंतवणुक केल्यास त्याचा तोटा होऊ शकतो. 
 • आर्थिक उद्दिष्ट्ये लवकरात लवकर सध्या करण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदार मोठी गुंतवणूक करतात. मात्र हे टाळायला हवे. कमी रकमेची दीर्घकालीन गुंतवणूक करणे कधीही सोयीस्कर असते. 

शेअरबाजार: घर (कर्ज) पहावं ‘न’ फेडून… 

५. शेअर बाजारावर लक्ष –

 • सामान्यपणे तुम्ही एसआयपी द्वारे गुंतवणूक केली असेल, तर तुम्हांला तुमची रक्कम आणि त्यावरील नफा पाहता येतो. पण शेअर बाजारात गुंतवणूक करताना बाजारपेठेत कमी अधिक होणाऱ्या किमतींवर सतत लक्ष ठेवून त्यानुसार त्वरित अंदाज बंधू नका. कारण यामध्ये वेळ वाया जातो आणि काही वेळेला निराशा पदरी येते. 
 • २००५ ते २०१५ दरम्यान सुमारे ८२% फंड व्यवस्थापक शेअर्सचा निर्देशांक देण्यात अपयशी ठरले आहेत. 
 • शेअर बाजारात समृद्ध व्हायचे असल्यास वॉरन बफे यांनी सांगितल्याप्रमाणे दीर्घकाळ गुंतवणुकीचा पर्याय निवडावा व अपेक्षित परतावा मिळवावा. 

शेअर बाजार: ये रिस्क, रिस्क है रिस्क, रिस्क!

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताना विचारपूर्वक केल्यास गुंतवणूक केल्यास आणि   होणाऱ्या चुका टाळल्यास, आपली गुंतवणूक नक्कीच यशस्वी होऊ शकते व अपेक्षित किंवा त्यापेक्षा चांगला परतावा निश्चित मिळू शकतो. 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Get real time updates directly on you device, subscribe now.

1 Comment
 1. Sunil says

  अतिशय उत्तम माहिती ती पण साध्या सरळ भाषेत धन्यवाद.

Leave A Reply

Your email address will not be published.