Easy Trip planners IPO: प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीची सुवर्णसंधी

Reading Time: 2 minutes

Easy Trip planners IPO

आठ मार्च रोजी ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सी इझी ट्रिप प्लॅनर्स कंपनीचा आयपीओ (Easy Trip Planners IPO) विक्रीसाठी उपलब्ध होईल. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी ५१० कोटी रूपये जमवणार असून यासाठी कंपनीची प्रति शेअर किंमत 186-187 रूपये निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओची विक्री  १० मार्च रोजी बंद होईल. 

Easy Trip Planners: कंपनीची माहिती

 • इझी ट्रिप प्लॅनर्स या कंपनीची स्थापना 4 जून 2008 रोजी झाली आहे. कंपनीच्या  2018 ते 2020 मधील आर्थिक व्यवहार व नफ्याचा  विचार करता ही ट्रॅव्हल इंडस्ट्री मधील दुसरी नामवंत कंपनी आहे.
 • ग्राहकांना संपूर्ण ट्रिप व्यवस्थापन करून देणे हा कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे. यामध्ये विमानाची तिकिटे, रेल्वे तिकिटे, बसची तिकिटे, टॅक्सी सेवा, प्रवासी विमा, व्हिसा प्रोसेसिंग आणि इतर कामांसाठी व्हॅल्यू अ‍ॅड सर्व्हिसेसचा समावेश आहे.
 • 31 डिसेंबर, 2020 पर्यंत, इझी ट्रिप प्लॅनर्सने आपल्या ग्राहकांना 400 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमान सेवा, भारतातील 1,096,400 हून अधिक हॉटेल आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये, जवळजवळ सर्व रेल्वे स्टेशन, तसेच बसची तिकिटे आणि टॅक्सी भाड्याने उपलब्ध करुन दिली आहे.
 • इझी ट्रिप प्लॅनर वेबसाइट व मोबाइल अ‍ॅपद्वारे (Android आणि iOS) ऑनलाइन प्रवासी सेवांची सुविधा प्रदान करते. कंपनी बी2बी (व्यवसाय ते व्यवसाय) बी2बी2सी (व्यवसाय ते व्यवसाय ते ग्राहक), बी2सी (व्यवसाय ते ग्राहक) आणि बी2ई (व्यवसाय ते उद्यम) अशा सर्व प्रकारच्या सुविधा ग्राहकांना देते.

हे नक्की वाचा: IPO: आयपीओ गुंतवणूक करताना विचारात घ्या या महत्वाच्या गोष्टी

Easy Trip Planners:  इझी ट्रिप प्लॅनर्स आयपीओ 

 • कंपनीच्या आयपीओमध्ये 10% रिटेल गुंतवणूकदारांसाठी, 15% बिगर संस्थात्मक खरेदीदारांसाठी आणि 75% पात्र संस्था खरेदीदारांसाठी राखीव आहेत. 
 • EaseMyTrip बीएसई आणि एनएसई दोन्ही वर सूचीबद्ध केले जाईल.
 • कंपनीची प्रति शेअर किंमत 186-187 रूपये तर, लॉट साईज 80 इतका निश्चित करण्यत  आली आहे. म्हणजेच ग्राहकांना किमान 80 शेअर्स खरेदी करणं आवश्यक आहे. 
 • हा आयपीओ 8  ते 10 मार्चदरम्यान शेअर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. 
 • या आयपीओसाठी अ‍ॅक्सिस कॅपिटल आणि जेएम फायनान्शियल बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून काम करत आहेत.

Easy Trip Planners: कंपनीची आर्थिक स्थिती (Company Financials)

 • क्रिसिलच्या अहवालानुसार, कंपनीच्या स्थापनेपासूनच कंपनीने सातत्याने नफा मिळवला असून इतर ट्रॅव्हल एजन्सींच्या तुलनेत इझी ट्रिप प्लॅनर्सकडे देशातील सर्वात जास्त ट्रॅव्हल एजंट्स आहेत.
कंपनीची आर्थिक स्थिती (Company Financials)
वर्ष /कालावधी – रु.
31-12-20 31-03-20 31-03-19 31-03-18
एकूण मालमत्ता 3,569.66 2,823.37 2,430.88 1,802.89
एकूण महसूल 815.72 1,797.24 1,511.11 1,135.74
कर आकारणीनंतर नफा 311.09 346.48 239.93 0.3
 • मार्च 2020 पर्यंत, कंपनीकडे देशातील जवळजवळ सर्व प्रमुख शहरांमधील नोंदणीकृत ट्रॅव्हल एजंट्सची संख्या होती 55,981. डिसेंबरमध्ये ही संख्या वाढून 59,274 झाली आहे. 
 • लॉकडाऊनच्या या काळातही कंपनीने आपली योग्यता सिद्ध केली असून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत 50 कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. 
Easy Trip Planners आयपीओ
आयपीओ विक्री (issue) 08/03/2021
आयपीओ क्लोजिंग 10/03/2021
आयपीओ अलॉटमेंट 16/03/ 2021
रिफंड प्रक्रिया 17/03/2021
डिमॅट अकाउंटमध्ये शेअर्स जमा 18/03/2021
आयपीओ लिस्टिंग 19/03/2021

(लेखात माहिती दिलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची, अर्थसाक्षर कंपनीची वा प्रवर्तकांच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. सदर कंपनीशी अर्थसाक्षर.कॉमचा कुठलाही संबंध नसून आम्ही कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. कंपनीचे विश्लेषण हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा नेहेमीच्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.)

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Easy Trip Planners IPO Marathi Mahiti, Easy Trip Planners IPO in Marathi, Easy Trip Planners IPO Marathi

One thought on “Easy Trip planners IPO: प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीची सुवर्णसंधी

Leave a Reply

Your email address will not be published.