आरोग्य विमा
https://bit.ly/2UdZP6D
Reading Time: 3 minutes

आरोग्य विमा

आरोग्य विमा किती महत्वाचा आहे हे सध्याच्या कोव्हीड-१९ महामारीमध्ये चांगलेच लक्षात आले असेल. बाजारात विविध कंपन्यांचे वेगवेगळे प्लॅन्स उपलब्ध असताना आपल्यासाठी योग्य अशी आरोग्य विमा पॉलिसी कोणती? असा प्रश्न पॉलिसी घेताना प्रत्येकाच्याच मनात निर्माण होत असणार. अशावेळी गोंधळून जाऊ नका. आपल्या गरजेनुसार विमा पॉलिसीची निवड करा. पॉलिसी निवडताना कोणत्या मुद्द्यांचा विचार करायचा याबद्दलची माहिती आपण आजच्या भागात घेणार आहोत. 

ऑफिसमध्ये उद्या सेमिनार आहे ही नोटिस फिरत होती तसे सगळे एकमेकांसोबत चर्चा करायला लागले. “ब्राइट ड्रीम” ही सोनल आणि श्रीश यांची स्टार्टअप कंपनी होती. कर्मचार्‍यांना आनंदी ठेवले की ते जीव ओतून काम करतात हे सोनलला चांगले ठाऊक होते, तर त्यांच्या भविष्याची काळजी घेतली तर ते दीर्घकाळ आपली साथ देतील याची श्रीशला जाणीव होती.

सेमिनारची सकाळ उजाडली. स्टेजवर पाहुण्यांची ओळख करून दिली गेली. प्रमुख पाहुण्या अर्थात वक्त्या होत्या नेत्रा ताई, शहरातील विमा क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्व. त्यांनी बोलायला सुरुवात केली,

प्रत्येकाने आरोग्य विमा (हेल्थ इन्शुरंस) काढणे सध्याच्या काळाची गरज आहे. मात्र असे जरी असले तरी जर योग्य योजना निवडली गेली नाही, तर आपले पैसे जावूनही आपल्याला गरजेच्या वेळी विमा योजनेचा म्हणावा तसा फायदा मिळत नाही. तेव्हा आरोग्य विमा योजना निवडण्याआधी पुढील गोष्टी नक्की विचारात घ्याव्यात.

हे नक्की वाचा: आरोग्य विमा –  काही महत्वाच्या संज्ञा

आरोग्य विमा घेताना लक्षात ठेवा या ११ महत्वाच्या टिप्स

१. पूर्वीपासून असलेले आजार – 

 • तुम्हाला आधीपासूनच असलेल्या आजारांसाठी विमा कंपन्या 2-4 वर्षाच्या प्रतीक्षा कालावधी (Waiting period) ठेवतात. 
 • या कालावधीमध्ये आपल्याला पूर्वी असणार्‍या अथवा त्यामुळे उद्भवलेल्या आजारासाठी विमा कंपन्या कोणतीही भरपाई देत नाहीत. 
 • आपल्याला लक्षात आलेच असेल की विमा योजना निवडताना कमी प्रतीक्षा कालावधी आणि आधीच्या आजारांसाठी जास्त संरक्षण अशी निवडावी.

२. नेटवर्क रुग्णालये – 

 • विमा कंपनीची नोंदणीकृत रुग्णालये असतात जिथे आपणास बिल न भरता तसेच कॅश लेस सुविधेचा लाभ घेता येतो. 
 • अर्थात या रुगणलयांमधील बिले थेट विमा कंपन्यांकडे जातात जेणेकरून आपल्यावर आर्थिक ताण येत नाही. 
 • आपण विमा कंपनी निवडताना त्या कंपनीसोबत संलग्न आपल्या परिसरातील किती आणि कोणत्या प्रकारची रुग्णालये आहेत हे तपासावे. जेणेकरून आपत्कालीन परिस्थिती मध्ये आपल्याला रुग्णालयात लवकर पोहोचता येईल आणि तिथे आपल्या विमा कार्डचा उपयोग देखील होईल.

३. कुटुंबामधील किती व्यक्ती लाभ घेऊ शकतात – 

 • कधी कधी कमी प्रिमियम भरायच्या नादात आपण कुटुंबामधील सर्व व्यक्तींना त्यात कव्हर करून घेत नाही. 
 • मात्र लक्षात असू द्या जेवढा प्रिमियम कमी तेवढे त्याचे लाभ देखील कमी! त्यामुळे आपल्या कुटुंबामधील जास्तीत जास्त व्यक्ती/ सर्व व्यक्ति विमा योजनेमध्ये कव्हर होतील हे पाहूनच योजना निवडा.

४. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरचा खर्च –

 • विमा योजनेमध्ये विविध शुल्कांचा समावेश असतो. रक्त चाचणी, मूत्र चाचणी, एक्स-रे आदि चाचण्या या पूर्वरुग्णालय चाचण्यांमध्ये (pre- hospitalization) येतात. 
 • सामान्यतः यासाठीचा कालावधी हा रुग्णालयात भरती होण्यापूर्वी 30 दिवसांपासून ते डिस्चार्ज झाल्याच्या 60 दिवसांपर्यंत असतो. 
 • लक्षात असू द्यावे की, आपल्याला हा कालावधी जास्तीत जास्त कव्हर करणारी योजना आणि विमा कंपनी निवडायची आहे.

हे नक्की वाचा: नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन 

५. को – पेमेंट क्लॉज – 

 • को-पेमेंट म्हणजेच तुम्ही तुमच्या उपचारतील काही भाग स्वतः देता आणि उर्वरित रक्कम विमा कंपनी देते. 
 • यामध्ये आपल्या उपचार पद्धतीच्या आधारावर ठराविक रक्कम ठरवली गेलेली असते.
 • जेव्हा कोणाला आधीपासूनच आजार असतात अथवा जे नागरिक उतारवयात आरोग्य विमा काढतात, त्यांच्यासाठी प्रतीक्षा कालावधी ऐवजी असणारी ही उत्तम योजना आहे. म्हणजेच त्यांना 2 ते 4 वर्षांच्या प्रतीक्षा कालावधीची वाट बघण्याऐवजी को-पेमेंटचा फायदा घेता येतो. 
 • आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे को-पेमेंट योजने अंतर्गत आपल्याला को-पेमेंट नसलेल्या योजनेच्या तुलनेत कमी प्रिमियम भरावा लागतो. 

६. नो क्लेम बोनस –

 • प्रत्येक वर्षी आपल्याला विमा म्हणून ठरवून दिलेली रक्कम वापरायची जर विमाधारकाला गरज पडली नाही, तर विमा कंपनी त्या अंतर्गत विमाधारकास बोनस देऊ करते. 
 • याबद्दल देखील विमा घेण्याआधी विचारपूस करावी.  

७. नूतनीकरणाची तरतूद –

 • अनेक विमा कंपन्याची नूतनीकरण सुविधा ऑनलाइन प्रणालीद्वारे होते. यामुळे वेळेची बचत तर होतेच शिवाय फ्लेक्सिबल पेमेंटचे पर्याय देखील मिळतात. 
 • याशिवाय  नूतनीकरणाच्या वेळेस जर आपणास आणखी चांगले फायदे दुसर्‍या कंपनीकडून मिळत असतील, तर आपल्याला पोर्ट करण्याची सुविधा देखील उपलब्ध असते  आणि अशावेळेस प्रतीक्षा कालावधी देखील वेगळा नसतो. 
 • अर्थातच आपल्याला समजले असेलच की आपल्याला उत्तम रिन्युवल तरतूद असणारी विमा कंपनी निवडायची आहे.

८. रुग्णालयातील रूमचे भाडे –

 • काही विमा कंपन्या रुग्णालयात भरती झाल्यास रूमच्या भाड्यावर कॅपिंग ठेवतात म्हणजे रूमचे भाडे विमाधारकास द्यावे लागते. तर काही आरोग्य विमा योजने अंतर्गत विमाधारकास 1% रूम भाड्यामध्ये तर 2% आय.सी.यू. भाड्यात सवलत मिळते. 
 • अजून काही योजनेमध्ये आय.सी.यू.च्या वापरामध्ये कॅपींग ठेवत नाहीत. आपल्या योजनेमध्ये यापैकी काय काय समाविष्ट आहे याची माहिती ती घेण्याआधी करून उत्तोमोत्तम स्कीम निवडावी.

सरल जीवन विमा योजना – विमा नियामकांची ग्राहकांना भेट 

९. प्रिमियम – 

 • प्रत्येक विमा कंपनीचा प्रिमियम वेगळा असू शकतो आणि त्याचप्रमाणे त्यासोबत येणारे फायदे देखील वेगवेगळे असू शकतात. फक्त प्रिमियमचा विचार न करता योजनेमधील सर्व अंतर्भूत बाबींचा विचार करून, तसेच आपल्याला गरजेच्या वेळी उत्तम सपोर्ट मिळेल अशीच योजना निवडावी. 

१० अपवाद – 

 • जेव्हा आपण विमा योजना घेणार असतो तेव्हा त्याआधी त्यावर असलेले अपवाद काळजीपूर्वक आणि संपूर्ण वाचून घ्यावेत. 
 • कमीत कमी अपवाद असलेली योजना निवडावी. जेणेकरून गरजेच्या वेळी आपल्याला आणि कुटुंबीयांना नेटवर्क रुग्णालयांत उपचार घेताना कमीत कमी त्रास होईल.

११. चांगले रेटिंग्स –

 • रेटिंग्स पाहणे तसे फारसे महत्वपूर्ण नसले तरी जर आपण माहिती नसलेल्या अथवा नवीन विमा कंपनीची योजना घेण्याचा विचार करत असाल, तर त्याबद्दल अधिक जाणून घेणे उत्तम. 
 • तेव्हा यासाठी रेटिंग्स शिवाय कंपनीची पूर्वीपासूनची माहिती सर्व गोष्टी अगोदरच तपासून पहाव्यात.

वरील सर्व काळजी घेऊन जेव्हा आपण विमा योजना निवडाल तेव्हा तुम्ही भविष्यातील येणार्‍या आरोग्य समस्यांसाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम असाल जी आजच्या काळाची गरज आहे, इतक बोलून नेत्रा ताई थांबल्या. त्यांनी सर्व हॉल मध्ये नजर फिरवली सर्वांच्या डोळ्यांमधील समाधानावरून त्यांना आपण उत्तम बोललो याची ग्वाही मिळाली.      

आरोग्य विम्यासंदर्भात मूलभत प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…