आरोग्य विमा महत्वाच्या संज्ञा 
https://bit.ly/3myObiU
Reading Time: 3 minutes

आरोग्य विमा –  काही महत्वाच्या संज्ञा 

आरोग्य विमा हा विमा कंपनी व ग्राहक यातील कायदेशीर करार असल्याने त्यातील काही महत्वाच्या संज्ञा आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. 

हे नक्की वाचा: आरोग्य विम्यासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी

आरोग्य विमा –  काही महत्वाच्या संज्ञा:

 • मध्यस्थ (Agent): विमा कंपनी व ग्राहक यामधील दुवा जो ग्राहकांना मदत करेल.
 • लाभार्थी (Assignee): कराराचा लाभ होऊ शकणाऱ्या व्यक्ती.
 • दावा (Claim): लाभार्थीने विमा कंपनीस होणाऱ्या अथवा झालेल्या खर्चाच्या पूर्ततेसाठी अथवा भरपाईसाठी केलेली विनंती.
 • करार प्रमाणपत्र (Certificate of Insurance): कंपनी ग्राहक यामधील सविस्तर करार, ज्यात सर्व तपशील असेल. कोणत्या आजाराची भरपाई मिळेल / मिळणार नाही. अधिकतम खर्च मर्यादा.
 • खर्च वाटा (Co payment): एकूण खर्चातील धारकाचा टक्केवारीत वाटा.
 • अतिरिक्त लाभ (Bonus): जर धारकाने पॉलिसी वर्षात एकही दावा केला नाही तर त्याला मिळणारा फायदा. हा फायदा एकूण सुरक्षा मर्यादेत वाढ अथवा प्रीमियममध्ये सूट अशा प्रकारे आणि टक्केवारीत असून त्याला एक उच्चतम मर्यादा असते.
 •  वजावट (Deductible): धारकाने करायचा खर्च.
 • अवलंबित(Dependent): जोडीतर, मुले, पालक ज्यांना योजनेचा लाभ घेता येईल.
 • अपवादात्मक परिस्थिती (Exclusion): जेव्हा धारकास योजनेचा लाभ मिळणार नाही.
 • विमाकंपनी (Insurer): अशी कंपनी जी आपल्या योजनांमधून ग्राहकांना विमा सवलत देते.
 • दीर्घकालीन शुश्रूषा (Long term care): पॉलिसी काळात अपंगत्व आल्यास त्यासाठी आवश्यक सेवा शुश्रूषा.
 • दीर्घकालीन भरपाई (Long term disability): आजारामुळे हॉस्पिटलमध्ये राहावे लागल्यास दररोज रुपयात मिळणारी भरपाई तरतूद.
 • विमाहप्ता (Premium): योजनेचा हप्ता हा आपल्या सोयीनुसार मासिक अथवा वार्षिक देता येतो.
 • करार (Policy): योजनेच्या अटी शर्ती असलेले कायदेशीर दस्त.
 • पूर्वेतिहास (Pre-existing conditions): योजना घेण्यापूर्वीची आरोग्यविषयक माहिती.
 • साखळी (Network): योजनेशी संबंधित मध्यस्थ, डॉक्टर, हॉस्पिटल, तपासणी केंद्रे यांची माहिती, योजनाधारकासाठी असलेले सवलतीचे दर.
 • सुरक्षा कवच मर्यादा (Sum assured) : योजनेची अधिकतम खर्च मर्यादा.
 • थांबण्याचा कालावधी (Waiting Period) : करारानुसार लाभ किती कालावधीनंतर मिळणार तो कालावधी.

हे नक्की वाचा: नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन

आरोग्य विमा घेण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात.

 1. आरोग्य विमा करारातील नियम अटी, त्याचे नेमके शब्द (संज्ञा) आणि त्याचे अर्थ, महत्वाच्या शब्दांचे अर्थ वर दिले आहेत.
 2. कंपनीचे दावे मंजूर करण्याचे प्रमाण,
 3. प्रीमियम रक्कम इतर कंपन्यांचा तुलनात्मक प्रीमियम 
 4. मिळणाऱ्या विविध सोई सुविधा जसे 
  • ओ पी डी खर्च, 
  • विविध तपासण्या, 
  • रुग्णालयात भरतीचा किमान कालावधी, 
  • डे केअर सुविधा, 
  • रोजचा राहण्याचा खर्च, 
  • रुग्णवाहिकेचा खर्च, 
  • कोणते आजार समाविष्ट आहेत कोणते नाहीत, 
  • आजारावरील खर्चाची मर्यादा, मोतीबिंदू सारख्या विशिष्ट आजाराची पात्रता,
  • काही उपचार घरातून करता येत असतील तर त्या खर्चाची भरपाई,
  • विशेष उपचारांची सोय,
  • पर्यायी उपचार पद्धतीची सोय, 
  • आधुनिक तंत्रज्ञान वापरायची सोय, 
  • वर्षभरात दावा दाखल न झाल्यास पात्र बोनस सुरक्षा कवचात वाढ करून मिळणार की प्रीमियम मध्ये सूट देऊन,
  • दुसऱ्या तज्ञांचा सल्ला व मत घेण्याची सुविधा, 
  • रुग्णालयात भरती होण्यापूर्वी व सोडल्यावर किती दिवसापर्यतचा मंजूर होणारा खर्च,
  • कोणते खर्च नाकारले जातात उदा. बँडेज, निडल्स, ग्लोज, कॅथेटर, बाळांतपणाचा खर्च, काही योजनांत असे खर्च नाकारले जातात,
  • जवळपास कॅशलेस हॉस्पिटलची सोय, 
  • आजारानुसार एकूणखर्च मर्यादा, को पेमेंटची गरज.
 5. शक्यतो सर्व कुटूंबाची एकच पॉलिसी घेऊन बरोबर रायडर घेणे अधिक फायद्याचे, शक्य असल्यास विशेष योजना वेगळी घ्यावी, यामुळे अशी परिस्थिती उद्भवल्यास त्याकरिता एकरकमी रक्कम मिळते.
 6. आजाराचा पूर्वेतिहास असल्यास त्याची भरपाई पात्रता कधी ते माहिती करून घ्यावे. हा कालावधी 24 ते 48 महिने एवढा प्रत्येक पॉलिसीनुसार कमी-जास्त असतो.
 7. आरोग्य तपासणीची सुविधा
 8. गरजेनुसार सुरक्षा कवच वाढवण्याची सोय
 9. पॉलिसी पोर्ट करण्याची म्हणजेच इन्शुरंस देणारी विमा कंपनी बदलण्याची सोय
 10. तक्रार निवारण यंत्रणा तसेच पॉलिसी मंजूर नसल्यास लगेच अथवा काही कालावधीनंतर परत करण्याची सोय त्यामधून मिळणाऱ्या परताव्यात होणारी घट याचे प्रमाण.

महत्वाचे लेख:  तुम्हाला विमा भेट कार्डबद्दल माहिती आहे का?

थोडक्यात महत्वाचे: 

 • पॉलिसी घेतल्यापासून अपघात वगळता 30 दिवसानंतर येणाऱ्या वैद्यकीय खर्चाचा दावा करण्यास आपण पात्र होतो तर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी 30/60 दिवस व त्यानंतर 60/90 दिवस या काळातील औषधे तपासण्या यांच्यावर झालेला खर्च सर्वसाधारणपणे सर्व कंपन्या परत देतात. 
 • काही कंपन्या आपल्या धारकांना त्याचे दावे नसल्यास काही तपासण्या करण्यासाठी ठराविक कालावधीनंतर काही रक्कम मंजूर करतात. 
 • मिळालेली पॉलिसी वाचून पाहून जर आपल्या गरजेनुसार नसेल तर कोणतेही कारण न देता 15 दिवसात रद्द करता येते. कवचितप्रसंगी काही किरकोळ रक्कम वजा करून उरलेले पैसे परत मिळतात. 
 • आजकाल सर्व योजना IRDA या विमा नियामक यांची संमती घेऊन आणल्या जातात. त्याचप्रमाणे सर्व विमा कंपन्या आपली गुंतवणूक विविध प्रकारात विहित मर्यादेत करतात, असे न करणाऱ्या कंपन्यांवर व्यवसायबंदी सारख्या कठोर कारवाईस सामोरे जावे लागते. 
 • इन्शुरन्स रिपोजेटरी मध्ये आपली आरोग्य विमा पॉलिसी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवता येते. ज्यांना ती कागदपत्राच्या स्वरूपात ठेवणे सोईचे वाटते त्यांनी करारपत्र आणि ओळखपत्र सहज सापडेल अशा ठिकाणी सुरक्षित ठेवावे.

आरोग्यविम्याचे फायदे:

आर्थिक स्थिरता :  

विनाखर्च सुविधा किंवा खर्चाची भरपाई मिळत असल्याने आपली बचत, गुंतवणूक, मालमत्तेचे रक्षण होते. यासाठी वेगळी स्वतंत्र तजवीज करावी लागत नसल्याने चिंतामुक्त जीवन जगता येते.

सर्वोत्तम उपचार : 

आजारावरील उपचारासाठी उपलब्ध उपचार करण्यावर एक व्यक्ती म्हणून मर्यादा येतात. आरोग्यविमा असेल तर उपलब्ध पर्याय अजमावता येतात. 

योजना निवडीचे पर्याय: 

अनेक विमा कंपन्या त्यांच्यात असलेली ग्राहक निवडीची स्पर्धा यामुळे आपल्या गरजेनुसार योजना निवडीचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध होतो. आपले अधिकार न गमावता एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीकडे जाऊन त्यांची योजना घेता येते. 

विशेष योजना: 

केवळ विशिष्ठ आजार किंवा एकत्रित गंभीर आजार यासाठी विशेष योजना असून आपल्या गरजेनुसार योग्य योजना निवडीचा पर्याय ग्राहकांना आहे. 

आपल्याला उपयोग होईल अशी सर्वोत्तम योजना निवडून स्वतः अर्ज करावा, पॉलिसी घरच्या पत्त्यावर मागवून घ्यावी, मिळाल्यावर सर्वसामान्य तपशीलाबरोबरच पुढील तपशील आवर्जून आणि बारकाईने वाचावा – व्याख्या (Definitions), कोणते आजार अंतर्भूत आहेत (Inclusion Clause), कोणते आजार अंतर्भूत नाहीत (Exclusion Clause), कोणत्या आजारात किती वर्षांनतर विमा कवच लागू होईल. यासंबंधी काही तक्रार उद्भवलीच तर तक्रार निवरण यंत्रणा संबंधित कंपनी व IRDA या नियमकाकडे उपलब्ध आहे.

– उदय पिंगळे

आरोग्य विमासंदर्भातील अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

insurance Marathi Mahiti, Important terms of health insurance in Marathi, Important terms of health insurance Marathi, Health insurance Marathi Mahiti, Health insurance terms marathi

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…