F.I.R.E. movement
Reading Time: 2 minutes

F.I.R.E. Movement

F.I.R.E Movement – Financial Independence Retire Early अर्थात आर्थिक स्वातंत्र्य आणि वेळेअगोदर निवृत्ती. 

शहराबाहेर एक “सेकंड होम”.  त्यामागे खळखळ वाहणारी नदी, काहीशी रेंगाळलेली नीरव शांत दुपार, पुस्तकांनी भरलेला बुक शेल्फ आणि अंगणात छानसा झोपाळा. 

समुद्रकिनाऱ्याजवळ एक छोटं पण टुमदार घर, निवांत संध्याकाळ, बेडरूमच्या गॅलरीतून दिसणारा पाण्यात बुडणारा सूर्य, लाटांची गाज, भिरभिरणारा वारा, गझल आणि कॉफी. 

आपल्या जोडीदारासोबत वर्ल्ड टूर किंवा आपल्या स्वप्नातल्या घराची खरेदी. 

निवृत्तीपश्चात आयुष्याची अशी किंवा या प्रकारची स्वप्ने अनेकजण पाहत असतील. आयुष्यभर दगदग केल्यानंतर विसाव्याचे चार क्षण आनंदाने जगावेत असं कोणाला वाटणार नाही? मग ही निवृत्ती चाळिशीतच घेता आली तर?

नाही, नाही… !!! हे दिवास्वप्न नाही. हे प्रत्यक्षात घडू शकतं “फायर मूव्हमेंटच्या  (F.I.R.E Movement)” मदतीने. 

हे नक्की वाचा: पेन्शनचं टेन्शन!

F.I.R.E. movement: “फायर मूव्हमेंट” म्हणजे काय?

 • फायर मूव्हमेंट म्हणजे आपल्या भविष्याची आर्थिक तरतूद करून, सर्वसामान्य लोकांपेक्षा साधारणतः वीस वर्ष लवकर निवृत्त होणे. 
 • अर्थात ही काही अगदीच सोपी गोष्ट नाही. काही कमवायचे असेल तर, त्यासाठी काही ना काही गमवावे हे लागतेच. इथे तर तुम्हाला चक्क  वीस वर्ष अगोदर आर्थिक स्वातंत्र्यासह निवृत्ती घ्यायची आहे. 
 • काटकसर आणि वेळ व पैशाचे योग्य नियोजन या गोष्टींना प्राधान्य देऊन तुम्हाला तुमचं निवृत्ती नियोजन करावं लागतं. 
 • जर तुम्ही तुमच्या ९ ते ६ च्या आयुष्याला, कंटाळवाण्या आफिस कामाला कंटाळले असाल, तर “फायर” तुमच्यासाठी संजीवनी प्रमाणे काम करू शकेल.  

महत्वाचा लेख:तरुणांनो वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे? मग हे करा

F.I.R.E Movement: “फायर मूव्हमेंट”  कोणी चालू केली? 

 • साधारणतः १९९० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळापासून ही पद्धत अस्तित्वात होती. या पद्धतीला जगासमोर आणायचं श्रेय जातं ते विकी रॉबिन आणि जो डोमिंग्यूझ यांना. 
 • या दोघांनी लिहिलेल्या “Your Money or Your Life,” या पुस्तकामध्ये एक सामान्य जीवन कसे जगावे आणि पैशावरील आपले अवलंबित्व कसे कमी करावे याविषयी सविस्तर माहिती दिली  आहे. 
 • याचबरोबर या पुस्तकात त्यांनी घड्याळावर चालणाऱ्या आपल्या आयुष्याला ९ ते ६ च्या चक्रातून कसे बाहेर पडायचे, याबद्दलही मार्गदर्शन केले आहे. 
 • रॉबिन आणि डोमिंग्यूझ यांनी लाइफस्टाइल आणि ग्रासरूट मुव्हमेंट सुरु केली. 
 • चंगळवादी वृत्तीला आवर घालून, साधे पण समाधानी आयुष्य जगता येते आणि त्यांचं साधं आयुष्यच त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यात कशी मदत करू शकते याबद्दल जनजागृती करणे, हे या मुव्हमेंटचे मुख्य उद्दिष्ट होते.
 • त्यांनतर २०११ मध्ये पिटर अ‍ॅडेनी यांनी  लिहिलेल्या ब्लॉगमुळे या मुव्हमेन्टला जास्त प्रसिद्धी मिळाली. पीटर यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांचा वैयक्तिक अनुभव नमूद केला होता. 
 • पीटर व त्यांची पत्नी दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्यामुळे त्यांना मिळणारा गलेलठ्ठ पगार चंगळवादी जीवनशैलीवर न उडवता त्यांनी काटकसरीने साधं आयुष्य जगत होते. योग्य आर्थिक नियोजन व गुंतवणूक नियोजन यामुळे ते अवघ्या तिशीतच निवृत्त झाले. 
 • आपल्याकडे अनेकांचं करिअर तिशीत सुरु होत असेल. पण तरीही हरकत नाही. तुमचं आर्थिक ध्येय, त्यादृष्टीने तुम्ही केलेले नियोजन आणि तुमची मानसिकता, चिकाटी, काटकसर करून साधं आयुष्य जगण्याची तयारी या गोष्टी ध्येयपूर्तीसाठी खूप महत्वाच्या असतात.
 • पीटर यांचा ब्लॉग प्रचंड लोकप्रिय झाला आणि अल्पावधीतच या ब्लॉगने ३.५० कोटीहून जास्त वाचकसंख्येचा आकडा पार केला. 
 • जगभरातील हजारो ब्लॉग्ज, वार्षिक कॉन्फरन्सन्स, रिट्रीट आणि लाखो फायर प्रॅक्टिशनर्ससह ही चळवळ वाढत आहे.

विशेष लेख: जेष्ठ नागरिकांसाठी महागाईवर मात करणारे निवृत्तीवेतन

फायर मूव्हमेंट सगळ्यांसाठी उपयुक्त आहे का?

 या प्रश्नाचं उत्तर “नाही” असंच असेल. 

मग ही चळवळ नक्की  कोणासाठी आहे? 

फायर जीवनशैली म्हणजे नक्की काय? 

ती आचरणात आणणे कठीण आहे का? त्यासाठी काय करावे लागेल? 

खरंच ही जीवनशैली यशस्वी झाली आहे का? 

मी ही जीवनशैली आचरणात आणून खरंच नियोजित कालावधीमध्ये आर्थिक स्वातंत्र्यासह निवृत्ती घेऊ शकतो का? या साऱ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे या लेखाच्या पुढच्या भागात मिळतील. 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: F.I.R.E Movement in Marathi, F.I.R.E Movement Marathi Mahiti, F.I.R.E Movement Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…