Rule of 4%
Reading Time: 3 minutes

Rule of 4%

४% चा नियम (Rule of 4%) म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा खरा दर. नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात ट्रिनिटी विद्यापीठातील काही प्राध्यापकांनी फायर मुव्हमेंटची गुंतवणूकीच्या पद्धती बद्दल अभ्यास केला. या पद्धतीनुसार कसे कार्य करते याबद्दल सविस्तर माहितीही त्यांनी दिली.

F.I.R.E. Movement: फायर लाइफस्टाइल म्हणजे काय? 

 • अल्प कालावधीत आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी एक साधं सूत्र आचरणात आणावे लागते. यामध्ये प्रामुख्याने – 
  • उत्पन्नाच्या ५०% ते ७०% बचत करणे. 
  • काटकसर
  • कमी किमतीच्या स्टॉक इंडेक्स फंडात गुंतवणूक
 • हे सारे केल्यांनतर निवृत्तीपश्चात आयुष्याची तरतूद करून आपण लवकरात लवकर निवृत्त होऊ शकतो का? आपण फायर जीवनशैली आचणरणात आणण्यात यशस्वी झालो आहोत, हे कसं समजू शकेल? यासाठी “फायर” तज्ज्ञ ४% चा नियम वापरतात.

हे नक्की वाचा: पगारच पुरत नाही…बचत कशी करू?

Rule of 4%: काय आहे ४% चा नियम?

 • समजा तुम्ही तुमचे उत्पन्न किमान वर्षाला ७% उत्पन्न देणाऱ्या स्टॉकमार्केट किंवा तत्सम गुंतवणुकीत गुंतवले. इथे आपल्याला चलनवाढ गृहीत धरणे आवश्यक आहे.
 • समजा तुम्हाला गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा दर ७% असेल आणि आपण सरासरी ३% चलनवाढ गृहीत धरली, तर दरवर्षी तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नाचा खरा दर असेल ४%.
 • यामध्ये आपण फक्त तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नाचा म्हणजेच परताव्याचा विचार केला आहे. तुमचे गुंतवणुकीचे मूळ मुद्दल सुरक्षित आहे. परताव्यमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची तुम्ही बचत करू शकता अथवा खर्च करू शकता. हाच आहे ४% चा नियम.
 • आपल्या बचत दराची शक्ती आणि लवकर सेवानिवृत्तीची वास्तविक शक्यता पडताळून पाहू शकता.

“फायर मुव्हमेंट”- लवकरात लवकर निवृत्त होण्यासाठी काही महत्वाच्या पायऱ्या:

पहिली पायरी –  निवृत्तिनियोजनाची वेळ ठरवा:

 • तुम्हाला वयाच्या कोणत्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे, हे ठरवणे महत्वाचे आहे. 
 • निव्वळ लवकर निवृत्त व्हायचे आहे असं म्हणून काहीच उपयोग नाही. त्यासाठी “डेडलाईन” ठरविणे महत्वाचे आहे. 
 • एकदा तुम्ही निवृत्तिनियोजनाची वेळ निश्चित केली की त्यानुसार तुम्हाला आर्थिक नियोजन करावे लागेल. 
 • तुमची निवृत्ती नियोजनाची वेळ जितकी लवकर त्या प्रमाणात काटकसर पर्यायाने बचत व गुंतवणूक जास्त व खर्च कमी करावे लागतील 

विशेष लेखकाटकसर म्हणजे नक्की काय?

दुसरी  पायरी – निवृत्ती योजना : 

 • आपल्या मासिक उत्पन्नाच्या किमान १५% रक्कम कोणत्याही खात्रीशीर विमा योजनेमध्ये गुंतवा. 
 • लक्षात ठेवा ही तुमची दीर्घकालीन गुंतवणूक असेल, त्यामुळे खात्रीशीर योजनेची निवड करा. 
 • यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडाची निवड करू शकता. परंतु, अशावेळी बाजाराच्या चढ उतारामुळे घाबरून जाऊन गुंतवणूक काढून घेण्यासारखे कोणतेही चुकीचे निर्णय घेऊ नका. तुमच्या उत्पन्नानुसार योग्य योजनेची निवड करा. 

तिसरी पायरी: शैक्षणिक खर्च 

 • मुलांच्या शैक्षणीक खर्चाची तरतूद हा कोणत्याही पद्धतीने केलेल्या आर्थिक नियोजनामधील महत्वाचा घटक आहे. 
 • मुलं लहान असतानाच त्यांच्या उच्च शिक्षणाची तरतूद सुरु करा. कारण, तुमच्या निवृत्ती नियोजनाच्या स्वप्नाला तिलांजली देण्याचं काम करणाऱ्या काही खर्चांपैकी हा एक महत्वाचा व न टाळता येण्यासारखा खर्च आहे. 
 • मुलांना लहान वयातच काटकसरीचे व बचतीचे महत्व पटवून द्या. खर्च वाचविण्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे. 

काय आहे बचतीचा आधुनिक फॉर्म्युला? 

चौथी पायरी –  कर्जफेड

 • अनेकदा आपली काही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी किंवा काही अडचणी आल्यामुळे नाईलाजाने कर्ज  घ्यावे लागते. 
 • आपण घेतलेली सर्व कर्जे वेळच्या वेळी फेडणे खरंतर वेळेच्या आधी फेडणे आवश्यक आहे. यामुळे व्याज रूपाने जाणारा आपला जास्तीचा पैसा वाचेल. 
 • कर्ज फेडतानाही योग्य तो क्रम निश्चित करावा. जास्त व्याजदर असणारे कर्ज आधी फेडून त्यांनतर कमी व्यजदर असणारे कर्ज फेडावे. 
 • यामुळे तुमचा व्याजापायी खर्च होणार पैसा वाचून तुमच्या बचत खात्यात अतिरिक्त रकमेची भर पडेल. साधारणतः ४ ते ६ महिन्यांची अतिरिक्त बचत झाल्यास आपोआपच अचानक उद्भवणाऱ्या खर्चाची म्हणजेच इमर्जन्सी फंडाची तरतूद होईल. 
 • कर्जफेड हे मुख्य उद्दिष्ट ठेवून त्यानुसार आर्थिक नियोजन करावे लागेल. हे करताना तुम्हाला तुमच्या अनेक इच्छांना मुरड घालावी लागेल. घरातील काही महत्वाची कामे टाळावी लागतील किंवा स्वतः करावी लागतील. उदा. रिपेरिंग, क्लिनिंग, इत्यादी. 

पाचवी पायरी – करबचत:  

 • कायदेशीर मार्गाने कर वाचविण्यात काहीही गैर नाही, उलट तो तुमचा अधिकार आहे. 
 • करबचत करणारे विविध प्रकारचे गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी सुयोग्य पर्याय निवडून त्यामध्ये गुंतवणूक करा. 
 • गुंतवणूक करताना किमान १५% गुंतवणूक “लॉक इन” कालावधी असणाऱ्या पर्यायांमध्ये करा. जेणेकरुन ही गुंतवणूक तुम्हाला काढून घेता येणार नाही व तुमच्या भविष्याची तरतूद म्हणून सुरक्षित राहील. 

अनिश्चित उत्पन्न आणि गुंतवणूक नियोजनच्या ५ स्टेप्स

तुमचे लवकर निवृत्ती घेण्याचे स्वप्न पूर्ण करताना, या पाच महत्वाच्या पायऱ्या तुम्हाला पार कराव्या लागतील. आवश्यकता वाटल्यास आर्थिक नियोजकाचा सल्ला घ्या. चुकीचे निर्णय घेऊन नुकसान सहन करण्यापेक्षा आर्थिक नियोजकाच्या सल्ल्याने प्रत्येक पायरीवर भक्कमपणे पॉल टाका. तुमच्या निवृत्तिनियोजनाच्या स्वप्नांचा मजला तुम्हाला समोर दिसतच असेल, त्याला गाठण्यासाठी काटकसर, संयम, धैर्य व नियोजनाची आवश्यकता आहे. हे ज्याला जमलं त्याचं स्वप्न साकार झालं ! 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

web search: Rule of 4% in Marathi, Rule of 4% Marathi mahiti, Rule of 4% Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

बी.ए. नंतरचे सर्वोत्तम करिअर पर्याय

Reading Time: 4 minutes बी.ए. नंतरचे करिअर पर्याय  ग्रॅज्युएशननंतर करिअरचे कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात याबद्दलची माहिती…

बी.कॉम. नंतरचे १० करिअर पर्याय

Reading Time: 5 minutes बी.कॉम. नंतरचे करिअर… ग्रॅज्युएट झाल्यावर चांगल्या करिअरसाठी पुढचे शिक्षण घेणे आवश्यक असते. ग्रॅज्युएशन…