Reading Time: 3 minutes

आताची पिढी अर्थसाक्षरतेच्या अभियानामुळे आपल्या निवृत्तीचे नियोजन योग्यरीत्या करत आहे. एसआयपी मधून आपल्या २०-२५ वर्षांपासून येणाऱ्या निवृत्तीसाठी मोठा निधी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून उभा करत आहे. आपण अशा लोकांचा विचार करू जे गेल्या ६-८ वर्षात निवृत्त झाले आहेत किंवा पुढील ६-७ वर्षात निवृत्त होणार आहेत. ही अशी पिढी आहे जी गुंतवणुकीच्या बाबतीत जराही जोखीम न घेता निश्चित परतावा देणाऱ्या बँकेच्या एफडी, पोष्टाच्या योजना किंवा जीवन विमाच्या एन्डॉवमेंट प्लॅन्स किंवा मनी बॅक प्लॅन्स मध्ये गुंतवणूक करीत आली. त्यात बहुतेक लोकांची पूर्वीची आर्थिक परिस्थिती, घरात असलेली २-३ किंवा जास्त मुलं, त्यांचा घरांची, शिक्षणाची आणि लग्नाची जबाबदारी त्यांना जोखीम न घेण्यासाठी बंधने घालत राहिली.

आताची नवीन पिढी छोट्या कुटुंबात समाधानी राहते. त्यामुळे त्यांचे खर्च कमी होतात. त्यांच्या घराची जबादारी त्यांच्या पालकांनी पार पाडलेली असते. त्यामुळे नवीन पिढी जोखीम घेऊन तरुण वयापासून एसआयपी किंवा स्टॉक मार्केट अशी जास्त परतावा देणारी पण जास्त जोखीम असलेली गुंतवणूक करू शकतात. वर उल्लेख केलेली जी पिढी आहे, त्यांचे वयोमान साधारणतः ५४ तो ६६ दरम्यान आहे. त्यांना चांगली मासिक पेन्शन कशी मिळू शकेल? याचा आढावा घेऊ.

  • या पिढीने आपली बहुतेक गुंतवणूक ही बँक एफडी , पोस्ट ऑफिस किंवा विमा योजना अशामध्ये केलीली आहे. या अशा योजना आहेत, ज्यामध्ये निश्चित परतावा मिळतो. मात्र परताव्याचा दर हा देशाच्या आर्थिक परिस्थितीशी थेट प्रमाणात असतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर देशाची आर्थिक परिस्थिती जस जशी मजबूत होत जाईल, त्या प्रमाणात व्याजदर खाली येतील. १५ वर्ष पूर्वी व्याजदर हे साधारण १३-१४% आसपास होते. आज ते ७% च्या आसपास आहेत.
  • १५ वर्षांपूर्वी आपल्या देशाची आर्थिक परस्थिती चांगली नव्हती, आज आपण जगातील ६ व्या क्रमांकाची अर्थसत्ता आहे आणि येणाऱ्या ८-१० वर्षात भारत जगात ३ ऱ्या क्रमांकावर पोहचेल. याचाच अर्थ आजचे जे व्याजदर आहेत ते येणाऱ्या काळात खाली जाण्याची शक्यता जास्त आहे. अशावेळी आपले निवृत्तीवेतन जर व्याजदर निगडित मालमत्ता वर्गात असतील तर आपल्याला व्याजातून मिळणारे उत्पन्न कमी कमी होत जाईल.
  • मात्र महागाईही दर वर्षी वाढत राहील. तसेच निवृत्तीनंतर आपले वय जसे वाढत जाईल तसे औषधांवरचा खर्चही वाढेल. मग अशावेळी निवृत्तीधारकांनी आपले मासिक उत्पन्न वाढवण्यासाठी काय करावे?
  • निश्चित व्याज देणाऱ्या मालमत्ता वर्गाबरोबरच, म्युच्युअल फंडाच्या कमी जोखीमवाल्या योजनांचा समावेश आपल्या मालमत्ता वर्गामध्ये केला पाहिजे. ज्यांना खूप कमी जोखीम घ्यायची आहे, त्यांनीही म्युच्युअल फंडाची इक्विटी सेविंग कॅटेगरी किंवा डेट हायब्रीड फंडाचा समावेश करावा, जे थोडी जास्त जोखीम घेऊ शकतात, त्यांनी बॅलन्सड ऍडव्हान्टेज फंड कॅटेगरी किंवा इक्विटी हायब्रीड फंड कॅटेगरीचा समावेश आपल्या मालमत्ता वर्गात करावा.
  • म्युच्युअल फंडाच्या या अशा प्रकारच्या योजना आहेत ज्या नियमित उत्पन्ना बरोबरच भांडवलवृद्धीसाठी मदत करतात. या योजनांबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
  1. इक्विटी सेविंग फंड कॅटेगरी: यामध्ये साधारण ३०-३५ % गुंतवणूक ही शेयर बाजारात होते व बाकीची गुंतवणूक डेट / आर्बिट्राज अशा खूप कमी जोखीम असलेल्या अशा साधनांमध्ये होते. शेयर बाजार चंचल जरी असला तरी या कॅटेगरी मध्ये त्याचा हिस्सा कमी असल्याने योजनेची जोखीम कमी होऊन जाते. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर करही कमी लागतो.
  2. डेट हायब्रीड फंड: या कॅटेगरीमध्येही साधारण २५-३० % गुंतवणूक ही शेयर बाजारात होते. त्यामुळे जोखीमही कमी होऊन जाते. यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर जास्त कर लागतो.
  3. बॅलन्सड ऍडव्हान्टेज फंड: या कॅटेगरीमध्ये योजनेच्या फंड मॅनेजरला डेट किंवा इक्विटीचे प्रमाण बाजाराचा चढ उताराप्रमाणे कमी जास्त करण्याची मुभा असते. जेव्हा शेयर बाजार पोषक असतो तेव्हा जास्त गुंतवणूक ही शेयर बाजारात होते व जेव्हा शेयर बाजार पोषक नसतो तेव्हा खूप कमी गुंतवणूक शेयर बाजारात होते. तज्ञ फंड मॅनेजरच्या योग्य व्यवस्थापनाने आपल्याला शेयर बाजाराचा चांगला लाभ करून घेता येतो.
  4. इक्विटी हायब्रीड फंड: या कॅटेगरी मध्ये शेयर बाजारातील गुंतवणूक हि साधारण ६५ तो ७५ % असते त्यामुळे ह्यात जोखीम थोडी जास्त असते मात्र जास्त परतावा मिळविण्याची शक्यताही जास्त असते.
  • वर माहिती दिलेल्या ४ प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर दरमहा नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी एसडब्लूपी सेवेचा लाभ घ्यावा.  आपण एक निश्चित रक्कम म्हणजे साधारण आपल्या मूळ गुंतवणुकीच्या ८-९%pa रक्कम दरमहा मिळण्यासाठी म्युच्युअल फंडाला ‘एसडब्लूपी’चा फॉर्म भरून द्यायचा. उदाहरणार्थ जर आपण रु. १० लाख गुंतविले तर आपण रु ७००० किंवा ७५०० ची एसडब्लूपी चालू करायची. आपण लिहू दिलेल्या तारखेला ही रक्कम म्युच्युअल फंडाकडून आपल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होईल. ‘एसडब्लूपी’मधून नियमित घेतलेले उत्पन्न हे जास्त करप्रभावी असते, कमी कर भरावा लागतो.
  • म्युच्युअल फंडाचा मागील इतिहास जर आपण पहिला तर वर उल्लेखलेल्या ४ हि कॅटेगरी ने चांगला परतावा दिला , म्हणजेच आपण ८-९% प्रतिवर्ष असे नियमित उत्पन्न घेऊनसुद्धा आपल्या मूळ गुंतवणुकीत चांगली भांडवलवृद्धी झाली.
  • यातली जोखीमेची बाजू म्हणजेच, बाजारातील चढ उतारामुळे अल्पकाळात आपल्या मूळ गुंतवणुकीत जर थोडी घट झाली तरीही न घाबरता दीर्घकालीन गुंतवणुकीतून आपल्याला धनवृद्धीचा चांगला लाभ होतो. नियमित उत्पन्न तसेच भांडवलवृद्धी झाल्यामुळे येणाऱ्या काळात महागाई वाढली तरीही आपल्याला त्याची काळजी वाटणार नाही. ‘एसडब्लूपी’च्या अधिक माहितीसाठी माझ्या YouTube चॅनेल वरील १३ क्रमांकाचा व्हिडिओ पहा.

जेष्ठ नागरिकांना महागाई वर मात करणाऱ्या निवृत्ती वेतनासाठी शुभेच्छा!!

– निलेश तावडे  

– ९३२४५४३८३२

[email protected]

(लेखक हे २० वर्ष्ये म्युच्युअल फंड क्षेत्रात कार्यरत होते , सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत.)

एस.आय.पी.(SIP) – स्मार्ट गुंतवणुकीचा एक पर्याय ,  चाळीशी पुढील वयोगटासाठी निवृत्ती नियोजन,

गुंतवणूक नक्की कशासाठी? करबचतीसाठी की….. ?,  निवृत्ती नियोजनाची ११ महत्वाची कारणे

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…