FD FAQ: मुदत ठेव गुंतवणुकीसंदर्भात काही मूलभूत प्रश्नोत्तरे

Reading Time: 3 minutes

FD FAQ: मुदत ठेव 

आजच्या लेखात आपण मुदत ठेव गुंतवणुकीसंदर्भात काही मूलभूत प्रश्नोत्तरांची (FD FAQ) माहिती घेणार आहोत. हे प्रश्न अतिशय सामान्य प्रश्न वाटत असले तरी अत्यंत महतवाचे आहेत.

मुदत ठेव (FD) हा तसा आपल्या समाजात बऱ्याच प्रमाणात प्रचलित झालेला आणि रूढार्थाने आपल्या समाजाने स्वीकारलेला एक विश्वासाचा गुंतवणुकीचा मार्ग आहे. मुदत ठेव करण्याचे निश्चितच काही फायदे आहेत, पण बदलत्या आर्थिक जगात मागच्या काही वर्षात कमालीचे बदल झाले आहेत. अनेक नवे गुंतवणुकीचे मार्ग खुले झाले आहेत. गरज आहे ती आपल्या ध्येयनिश्चितीची आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे आपण किती धोका पत्करण्यासाठी तयार आहोत या जाणिवेची. अर्थात आजही सर्वात सुरक्षित पर्याय म्हणून मुदत ठेव (FD) या पर्यायाकडे पाहिलं जात असलं तरी गुंतवणुकीसाठी हा पर्याय निवडताना काही गोष्टींचाविचार करणे आवश्यक आहे. 

हे नक्की वाचा: काय आहे मुदत ठेवींचे गणित?

FD FAQ: मुदत ठेव गुंतवणुकीसंदर्भात काही महत्वाची प्रश्नोत्तरे

१. मुदत ठेव (FD) किती रकमेची करावी? 

 • सर्व बँकांमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती रक्कमेची मुदत ठेव करता येईल हे ठरलेले असते. 
 • अनेक बँका ५००० रुपयांपासून पर्याय उपलब्ध करून देतात. 
 • जर ‘अज्ञान’ व्यक्तीच्या नावाने एफडी करायची असेल, तर काही बँका २,००० इतकी रक्कम ठेवायची देखील परवानगी देतात. 
 • सध्याच्या स्थितीत मुदत ठेव म्हणून १ कोटीपेक्षा जास्त रक्कम ठेवायची असल्यास काही बँका त्याबाबत आधी सूचित करण्याविषयी आग्रही असतात. त्यासंदर्भात बँकांचे काही वेगळे नियम असू शकतात. 

२. मॅच्युरिटीच्या तारखेसंदर्भात कोणती काळजी घ्याल? 

 • तुम्ही केलेल्या एफडी ची मॅच्युरिटी तारीख संबंधित एफडी च्या पावतीवर नमूद केलेली असते. 
 • तुम्ही जर काही खास कारणासाठी उदा.’भेट’ म्हणून अथवा मुलांच्या पुढील शिक्षणासाठी एफडी करत असाल, तर ती मॅच्युअर केव्हा होणार आहे, म्यॅच्युरिटीनंतर किती रक्कम मिळेल, ऑटो रिन्यूअल सुविधा आहे काव असल्यासती घेतली आहे का, या सर्व गोष्टींची खात्री करून घ्या. 

३.एफडी मध्येच बंद केल्यास नुकसान होते का?

 • सुरुवातीला एफडी सुरु करताना ठराविक कालावधीसाठी केलेली असते, परंतु अचानक काही कारणामुळे ती मोडावी लागते किंवा त्यातील काही रक्कम कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच काढावी लागते. यामध्ये आपले नुकसान होते. 
 • जेव्हा तुम्ही एफडी तोडता तेव्हा कमी व्याज मिळते आणि अकाली पैसे काढण्यासाठी दंड देखील भरला जातो. समजा, तुम्ही 1 वर्षाची एफडी केली त्यावर बँक 7.5%  व्याज देत असेल आणि ही एफडी 10 महिन्यांत बंद करण्याचा निर्णय घेतल्यास एफडीवरील व्याज 1% कमी होईल. 
 • हा दंड साधारणतः रकमेच्या १% इतका असतो. पण सर्वच बँकांमध्ये तो आकारला जातोच असे नाही त्यामुळे ते नक्की तपासून पाहावे. एफडी करण्यापूर्वी याबद्दलचीदेखील पूर्ण माहिती घेऊन त्यानुसार एफडी करावी. 

संबंधित लेख: मुदत ठेव गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी नक्की विचारात घ्या 

४. एफडी वरील व्याजाचा कालावधी वेगवेगळा असतो का? : 

 • हो. तुम्ही बँकेमध्ये ठेवलेल्या एफडी वर बँकेने तुम्हाला कशा प्रकारे व्याज द्यावं ती पद्धत तुम्ही ठरवू शकता. 
 • यासाठी बँका मासिक, तिमाही, सहामाही किंवा कालावधी संपल्यावर असे विविध पर्याय देतात. या पर्यायांपैकी व्यवस्थित कॅल्क्युलेट करून तुमच्या सोयीचा पर्याय तुम्ही निवडू शकता. 

५. एफडी चे नूतनीकरण (ऑटो रिन्यूवल) करता येते का?

 • ऑटो रिन्यूवल म्हणजे एफडी ची मुदत संपल्यावर तिचे पुन्हा तुमच्या सोयीस्कर कालावधीनुसार नूतनीकरण करणे. 
 • हे नूतनीकरण तुमची सुरुवातीची मुद्दल आणि नंतर त्यावर मिळालेले व्याज अशा एकूण रकमेचेही करता येते. 
 • अनेक बँका आता ही सुविधा देतात आणि तुम्ही जर ही सुविधा निवडलेली असेल, तर तसे तुमच्या एफडी च्या पावतीवर नोंदवलेले असते. 

६. एफडी खात्याला नॉमिनी ठेवणे आवश्यक आहे का? 

 • एफडी केल्यानंतर तिच्या कालावधीमध्ये दुर्दैवाने धारकाचा मृत्यू झाल्यास संबंधित एफडी चे पैसे कोणाला मिळावेतहे एफडी करतानाच ठरवू शकतो. 
 • अशा परिस्थितीमध्ये ठरवलेल्या नॉमिनीला सर्व खात्री करून, ओळख पटवून ते पैसे दिले जातात. 
 • तुम्ही ठरवलेल्या नॉमिनीसंबंधी आवश्यक माहिती तुमच्या एफडी पावतीवर दिलेली असते.

महत्वाचे लेख: ठेवी व कर्ज : कोणते व्याजदर कमी हवेत?

एफडी चा पर्याय निवडताना वरील सर्व गोष्टी नीट समजून घेऊन, त्याबद्दल चौकशी करून, खात्री करून त्यानुसार तुमचे पैसे कोणत्या बँकेमध्ये, किती कालावधीसाठी गुंतवायचे हे ठरवले, तर नंतर येणाऱ्या बऱ्याच समस्या नक्कीच टळतील. त्यातही काही ठराविक मुद्दे प्रामुख्याने विचारात घ्यायलाच हवेत, ते म्हणजे बँक शेड्युल्ड बँक असावी, करामध्ये सवलत मिळावी, व्याजदर चांगला मिळावा, वेळेआधी पैसे काढावे लागले तर दंड बसू नये किंवा किमान दंड बसावा इत्यादी. शिवाय तुम्हाला तुमच्या एफडी चा पुरेपूर फायदा मिळण्यास मदत होईल.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Leave a Reply

Your email address will not be published.