Financial Freedom
Reading Time: 4 minutes

Financial Freedom

आर्थिक स्वातंत्र्य (Financial Freedom) म्हणजे पैशांची उधळपट्टी नव्हे, तर आयुष्यात केव्हाही पैशांची आवश्यकता असताना कोणाकडे हात पसरायची वेळ येऊ नये म्हणून केलेली उपाययोजना. थोडक्यात, आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा आपल्याकडे असणारी पैशांची उपलब्धता. पण आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे कसे? याचे उत्तर अगदी सोपे आहे, आपले उत्पन्न, गरज आणि इच्छा यांचा सुयोग्य मेळ घालून आर्थिक स्वातंत्र्य मिळविणे सहज शक्य आहे. याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या लेखात पाहणार आहोत. 

नेहमीप्रमाणे आज पण टिमची झूम मीट होती. वर्क फ्रॉम होम मूळे सगळे कंटाळून जायचे. ना ऑफिस, ना लंच टाइम मधील धमाल, ना गॉसिप, ह्या अशा घरून कामामुळे काम तर होत होते पण त्यात जीव ओतल्या जात नव्हता. व्हाट्स अप ग्रुप मध्ये हीच चर्चा असायची सध्या. टिम लीडर श्रुतीने यावरती उपाय काढला. आठवड्यातून दोनदा झूम मीट ठेवायची. त्यात हवी ती चर्चा करू शकता, कामाविषयी अथवा अन्य कोणतीही! 

सगळे एकदम खुश, यामुळेच तर श्रुती सर्वांची आवडती टीम लीडर होती. 

मीटिंग सुरू झाली गप्पा टप्पा चालू असतानाच श्री म्हणाला, मला या महिन्यात थोडे पैसे कमी पडत आहेत कोणीतरी मदत करा. सॅलरी झाली की लगेच देतो. 

कॉल चालू असतानाच त्याला आयुषने पैसे पाठवलेसुद्धा! 

इथे विचारायला नको होते असे वाटून श्री म्हणाला, “अरे काय करू आजकाल खर्च आणि येणारे पैसे यांचे गणित जरा बिघडले आहे. 

फार काही जबाबदर्‍या नसलेल्या श्री कडून हे ऐकले आणि श्रुतीने कान टवकारले. ती ऐकत होती तसे तिला समजले प्रत्येकाची काहीना काही तक्रार होती. 

“तुम्ही सगळे पैशाचे व्यवस्थापन करता की नाही?” श्रुतीने विचारले. 

“म्हणजे नेमके काय ग करायचे ?” भावनाने प्रश्न केला. 

तसे श्रुती म्हणाली, “आपले येणारे इन्कम आणि होणारा खर्च, करत असलेली बचत, गुंतवणूक यांचे व्यवस्थापन बरोबर होते आहे ना हे तपासले आहे का कधी सर्वांनी.”  

पीयूष गोंधलेल्या स्वरात म्हणाला, जरा समजावून सांग की म्हणजे नेमके काय करायचे ते. 

श्रुतीने सांगायला सुरुवात केली,

आपण सगळेच आपल्या परीने पैशाचे नियोजन करत असतो. आपल्यापैकी बर्‍याच जणांनी गुंतवणूक पण करतात हे मला माहीत आहे. मात्र फक्त बचत केली अथवा गुंतवणूक केली म्हणजे आपले नियोजन उत्तम असे होत नाही. त्यासाठी आपण काही पडताळणी करून पाहू शकता.

हे नक्की वाचा: पगारच पुरत नाही…बचत कशी करू?

Financial Freedom: आर्थिक व्यवस्थापनाची चेकलिस्ट

१. सर्वात प्रथम म्हणजे आपले उत्पन्न निश्चित आहे का?

  • आपल्याकडे प्रवाहीत उत्पन्न असणे आणि ते देखील दर महिन्याला ठराविक रकमेत मिळत असेल, तर ते उत्तम मानले जाते.
  • उत्पन्नाचा अखंड प्रवाहामुळे आपल्याला आर्थिक स्थैर्य मिळते.  

२. खर्चाचे नियोजन केले आहे का?

  • आपण किती कमावतो, त्याप्रमाणे आपला खर्च आहे का, हे तपासा.
  • आपली सागली बिलं वेळेत भरली जाणे, गृहकर्ज अथवा आणखी कोणते कर्ज असल्यास त्याचे हफ्ते वेळेत भरले जाणे, कुटुंबासाठी, घरखर्चाची रक्कम बाजूला काढून ठेवणे, हे सर्व आपले उत्तम नियोजनाचे लक्षण आहे.
  • खर्चाशिवायही आपली बचत मागे पडत असणे देखील गरजेचे आहे.

३. खरेदीचे व्यवस्थापन नीट होते का?

  • खरेदी करणे हे नेहमीच वाईट असते असे नाही. मात्र आपण खरेदी करत असताना आपले आर्थिक नियोजन जर कोलमडले जात असेल तर मात्र व्यवस्थापनात काहीतरी चुकते असे समजावे.
  • खरेदी करण्याआधी आपल्याला आर्थिक भार होणार नाही याची काळजी जरूर घ्यावी. खरेदी करताना आपली गरज आणि आवड यामधील फरक ओळखून खरेदी केली तर नक्कीच बचत होते.
  • अनेक श्रीमंत लोक आपल्या गरजा न वाढवल्या मुळेच यशाचे शिखर गाठतात. 

४. उधार न घेता सर्व बिलं भरली जातात काय?

  • आपली महिन्याची येणारी बिलं ही ठराविक किंमत असते आणि त्याचा आपल्याला अंदाज आलेला असतो.
  • आपले ईएमआय, फोन, वीज बिलं, किराणा इ. ला लागणार्‍या पैशांसाठी आपणास कधीही उसने पैसे घ्यायची पडत नसेल, तर आपले व्यवस्थापन उत्तम आहे. असे होत नसेल तर मात्र त्यासाठी नियोजन कारला सुरुवात करा.  

वैचारिक लेख: आर्थिक नियोजन – कौटुंबिक का वैयक्तिक?

५. सतत शिकण्याचा ध्यास –

  • याचा आपल्या पैसे व्यवस्थापनात संबंध कसा असे वाटणे साहजिक आहे. पण पहा गुंतवणुकी बाबतचे करासंबंधित असलेले नियम व कायदे सतत बदलत असतात आपण त्याची माहिती घेऊन आवश्यक ते बदल दरवर्षी करणे गरजेचे असते. 
  • शेअर बाजाराची माहिती घेऊन त्यामध्ये थोडीफार गुंतवणूक केल्याने आपणास जास्त फायदा मिळू शकतो. त्यासाठी सतत त्याबद्दलच्या बातम्या पाहत रहाव्यात. असे एक न अनेक फायदे आपण सतत अपडेटेड असण्याचे आहेत.    

६. आपल्या वस्तूंची देखभाल होते काय?

  • प्रत्येक गोष्टीला देखभालीची गरज असते. मग ती आपली कार असो अथवा घर किंवा आणि छोट्या मोठ्या वस्तु.
  • प्रत्येकाची वेळेत देखभाल आणि गरज असल्यास दुरूस्ती करत राहिले, तर बिघाडीमुळे होणार्‍या मोठ्या खर्चापासून आपण वाचू शकतो. 

७. आपल्या आरोग्याची काळजी घेता काय?

  • जसे आपल्या वस्तूंना देखभालीची आवश्यकता असते तसेच आपल्या शरीराला देखील असते.
  • आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतल्याने आपणास आर्थिक आणि मानसिक नुकसानीपासून वाचता येते.
  • दात, डोळे इ. ची दुखणी दुर्लक्ष केल्यास त्यावर जास्त खर्च होतो. तसेच छोटी छोटी दुखणी अंगावर न काढता वेळेत डॉक्टरचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते.    

८.क्रेडिट स्कोअर तपासता का?

  • आपण आपला क्रेडिट स्कोअर नियमित तपासात असाल तर आपण याबाबत जागरूक आहात. 
  • उत्तम क्रेडिट स्कोअर असला की ऐनवेळी कर्ज घेताना क्रेडिट कार्ड घेताना धावपळ होत नाही. तेव्हा आपला क्रेडिट स्कोअर नेहमी उत्तम ठेवायचा प्रयत्न करा.
  • क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा हे आम्ही आमच्या यापूर्वीच्या लेखामध्ये संगितले आहेच .

महत्वाचा लेख: विवाहानंतरचे आर्थिक नियोजन

९. आपल्या क्रेडिट कार्ड वर शून्य कर्ज आहे काय?

  • क्रेडिट कार्ड असावे की नसावे हा तसा वादातीत प्रश्न आहे. मात्र क्रेडिट कार्ड असूनही त्याचा योग्य वापर करता येणे आणि त्यात कोणतीही थकबाकी नसणे हे जर आपल्याला जमत असेल तर आपले अभिनंदन.
  • असे नसेल तर शक्यतो क्रेडिट कार्ड वर थकबाकी टाळायचा प्रयत्न करावा.

१०. सेवानिवृत्तीची तरतूद केली आहे काय?

  • सेवानिवृत्तीची तरतूद आपण जितक्या लकर कारला सुरुवात करू तितके चांगले असते.
  • आपल्या मिळकटीतून दरमहा ठराविक रक्कम निवृत्ती निधि मध्ये जमा करावी.  त्यासाठी पीपीएफ, एनपीएस असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.  

११. दरमहा बचत, गुंतवणूक करता काय?

  • आपला खर्च जावून दरमहा आपण ठराविक बचत करत असाल तर खूप छान, मात्र असे करत नसाल तर लगेच बचत करायला सुरुवात करा.
  • बचतीमधील काही रक्कम विमा, म्यूचुअल फंड, एफडी इ. ठिकाणी गुंतवणुकीसाठी वापरुन काही रक्कम आपत्कालीन परिस्थितीसाठी बाजूला ठेवत जायची.

१२. आपले आर्थिक ध्येय गाठण्याच्या दिशेने आपली वाटचाल चालू आहे काय?

  • आपली वाटचाल आपले आर्थिक ध्येय गाठण्याच्या दिशेने चालू असेल तर आपण योग्य वाटेवर आहात.
  • आपली आर्थिक ध्येय म्हणजे घर घेणे, गाडी घेणे, मुलांची उच्च शिक्षणं, लग्न इ. जर योग्य वेळेत होत असेल तर चिंता नाही.
  • खर्च करताना आपल्या आर्थिक ध्येयांबाबत जागरूक राहून त्यासाठी गुंतवणूक करत राहणे म्हणजे आपण उत्तम व्यवस्थापन करत आहात.

अगदी सोप्या भाषेत श्रुतीने सर्वांना ते नेमके कुठे आहेत याचे परीक्षण करायला लावले. अर्थात त्यामुळे सर्वांना फायदा होणार होता. अगदी असाच फायदा आपल्या वाचकांना व्हावा यासाठी हा लेख प्रपंच.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Financial Freedom Marathi, Financial Freedom in Marathi, Financial Freedom mhanje kay, Financial Freedom Marathi mahiti, steps of Financial Freedom in Marathi

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.