Ramayana
Reading Time: 3 minutes

Ramayana

भारताला खूप मोठ्या संस्कृतीचा वारसा आहे. रामायण-महाभारतासारख्या (Ramayana – Mahabharat) महाकाव्यांनी आपल्याला अगदी गोष्टरुपात काय योग्य आणि काय अयोग्य याचे धडे दिले आहेत. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल की रामायणातून आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्याचे अर्थकारण कसे असावे याविषयीही योग्य-अयोग्याच्या सीमारेषा ठरवता येतात. जाणून घ्या कसे ते:

१. लक्ष्मणरेषा ओलांडायची नाही

  • लक्ष्मणाने आखून दिलेली रेषा सीतेने ओलांडली आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून घेतला हे आपण जाणतोच. 
  • आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणात आपल्या खर्चाची लक्ष्मणरेषा जर आपण पाळली नाही तर आपण कर्जबाजारी होऊ हे सांगण्यासाठी कुणा अर्थतज्ज्ञाची गरज नाही. 
  • आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी उत्पन्नाच्या प्रमाणात खर्चाची लक्ष्मणरेषा आपल्याला आखता यायला हवी आणि तिचा आदरही करता यायला हवा.

२. आपल्या सदसद्विवेकबुद्धीवर अहंकाराचा विजय होऊ द्यायचा नाही

  • रावण अतिशय विद्वान होता, मोठा शिवभक्त होता, विविध विद्यांत तो पारंगत होता परंतु त्याच्या बुद्धीचा आणि बळाचा त्याला एवढा अहंकार होता की स्वतःच्या सख्ख्या भावाने दिलेला काळजीचा सल्ला तो ऐकू शकला नाही. त्याच अहंकाराने त्याचा घात झाला.
  • आपला आपल्या आर्थिक उलाढालींवर किंवा त्याविषयीच्या ज्ञानावर जेव्हा आत्मविश्वासाच्या पलीकडे अहंकार वाढत जातो तेव्हा आपल्या हातूनही अनावधानाने चुकीची आर्थिक गुंतवणूक होते.  
  • या चुकीच्या गुंतवणुकीतून बाहेर पडण्यासाठी कुणा तज्ज्ञाचा सल्ला घेणं कमीपणा वाटू लागतं आपल्या अहंकारामुळे अजून एक चुकीचा निर्णय घेतो आणि हळू हळू स्वतःच्या अधःपतनाचा रस्ता स्वतःच तयार करतो. म्हणूनच कोणत्याही बाबतीत अहंकार हा तोट्याचाच.

३. स्वतःचे सैन्य उभारण्यास कमीपणा कसला?

  • प्रभू श्रीराम साक्षात विष्णूचे अवतार होते, परंतु रावणाच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनीही अगदी विनम्रपणे सैन्याची गरज ओळखली. वेगवेगळ्या खुबी असणारे वेगवेगळे लोक आपल्या बाजूने उभे केले.
  • तसेच आपल्याला भविष्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही मोठ्या आर्थिक संकटात केवळ आपली बचत किंवा आपली एखादी ‘एफडी’ आपल्याला वाचवेल,असे गृहीतधरणे वेडेपणाचे ठरेल.
  • आपल्याला वेगवेगळ्या पद्धतींनी आपली गुंतवणूक करता यायला हवी. जीवन विमा, आरोग्य विमा, शेअरबाजार, म्यूच्युअल फंड, रिअल इस्टेट, सोने या आणि अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये आपली गुंतवणूक असेल, तर आपण कुठल्याही संकटास सामोरे जायला सज्ज आहोत असे समजावे.

४. संजीवनी बुटी शोधता येत नसेल तर थेट द्रोणागिरी उचला

  • युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडल्यानंतर संजीवनी बुटीची तातडीने गरज होती. हुनुमानाला ती बुटी आणायला पाठवण्यात आले होते परंतु आपल्या बजरंगबलींना ती काही ओळखता येईना. समयसूचकता म्हणून त्यांनी थेट द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला.
  • आपलेही बऱ्याचदा असेच होते. शेअर बाजारात गुंतवणूक करायची असते परंतु नेमके चांगले स्टॉक कोणते आणि घातक कोणते हे ओळखता येत नाही. अशावेळी ‘अक्कड-बक्कड बंबे बो’ म्हणून चालत नसते. त्यावेळी डोळे झाकून ‘इंडेक्स म्युच्युअल फंड’चा हात पकडायचा. 
  • यामध्ये आपल्याला एकाच वेळी अनेक चांगल्या स्टॉकमध्ये भागीदारी नोंदवता येते. याचा फायदा असा होतो की काही कोसळे तरी काहींच्या वर जाण्याने आपल्याला मोठा तोटा सहन करावा लागत नाही.

हे नक्की वाचा: Definition of Rich गरीब-श्रीमंत की श्रीमंत-गरीब? 

५. चकाकते ते नेहमीच सोने नसते

  • सोनेरी हरणाचा सीतेने रामाकडे हट्ट धरला. परंतु जेव्हा हे लक्षात आले की ते हरीण नसून तो मायावी राक्षस मारीच आहे तोवर वेळ गेली होती. सीतेचे अपहरण झाले होते. म्हणजे सोनेरी हरीण तर  मिळाले नाही परंतु प्राणाहून मोठे संकट राम-सीतेने ओढवून घेतले होते.
  • असेच आपल्या बाबतीतसुद्धा होऊ शकते.एका रात्रीत श्रीमंत होण्याच्या मोहापायी कुणाची टीप मिळाली म्हणून शेअर बाजारात, क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केली जाते आणि एका रात्रीतून आपण करोडपती नव्हे, तर रोडपती होऊन बसतो. 
  • त्यामुळे आर्थिक गुंतवणूक म्हणजे चमत्कार होऊन श्रीमंत होणे नव्हे हे स्वतःला समजवायला हवे.

६.रामसेतू बनवायचा असेल तर छोट्या दगडांचे महत्व समजायला हवे.

  • सीतेला आणण्यासाठी श्रीराम जेव्हा निघाले तेव्हा त्यांना हिंदी महासागर आडवा झाला. भारतातून श्रीलंकेला जाण्यासाठी ‘रामसेतू’ बांधण्याचे ठरले, त्यासाठी छोट्या छोट्या दगडांचा वापर केला गेला आणि भला मोठा रामसेतू तयार झाला.
  • यातून हे शिकायला हवं की खूप मोठा आर्थिक फायदा होण्यासाठी आपण छोट्या गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. ‘एसआयपी’ सारख्या छोट्या छोट्या गुंतवणुकीने एक दिवस आपल्या हाती मोठी रक्कम उभी राहणार आहे यावर आपला विश्वास असेल तर सर्व काही शक्य आहे.

विशेष लेख: आर्थिक नियोजनाचे हे ७ महत्वाचे प्रकार, तुम्हाला माहिती आहेत का? 

रामायणाने मर्यादा पुरुषोत्तम पती, आदर्श पत्नी, आदर्श पुत्र, आदर्श बंधू आणि आदर्श राजा कसे असावे याचे अनेक वस्तुपाठ दिले आहेत परंतु वरील काही उदाहरणांतून जर आपण आपल्या दैनंदिन जीवनातील आर्थिक बाबींविषयी डोळसपणे विचार करू तेव्हा आपल्या आयुष्याचा आर्थिक वनवास फार काळ टिकणार नाही याची खात्री आहे.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

web shares: lesson from Ramayana Marathi, lesson from Ramayana Marathi Mahiti, Ramayana & finance Marathi Mahiti 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.