Reading Time: 3 minutes

सीएफए सोसायटी इंडिया ही चार्टर्ड फयनांशिअल एनालिस्ट या गुंतवणूक व्यावसायिकांची संघटना आहे. गुंतवणूक क्षेत्रातील सर्वात जास्त मानसन्मान CFA परीक्षेच्या तीनही लेव्हल पास झालेल्या व्यक्तींना मिळतो.  

भारतातील गुंतवणूक उद्योगामध्ये नीतिमत्तेला धरून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देणाऱ्या या संघटनेमध्ये पोर्टफोलिओ मॅनेजर, स्टॉक एनलिस्ट, गुंतवणूक सल्लागार आणि इतर आर्थिक व्यावसायिकांचा समावेश आहे.

 • आर्थिक साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी, सीएफए सोसायटी इंडियातर्फे १५ ते  २९ नोव्हेंबर या कालावधीत जन-निवेश अभियान उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. 
 • यासाठी एकूण १४ दिवसांचा “सायकल” प्रवास  दौरा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये एकूण ५००० स्वयंसेवकांनी भाग घेतला असून, या दौऱ्याची सुरुवात १५ नोव्हेंबर रोजी एकत्रितपणे गुडगाव व मुंबई पासून करण्यात आली आहे. यानंतर  दोन्ही भागातील स्वयंसेवक अहमदाबाद येथे भेटतील व इंदोरला या दौऱ्याची आणि अभियानाचीही सांगता करण्यात येईल. 
 • या अभियानामध्ये सामील झालेले सर्व स्वयंसेवक  सीएफए सोसायटीमधील वित्त आणि संपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती आहेत.
 • या दौऱ्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमधील २२ ठिकाणी आर्थिक साक्षरता या विषयावर मोफत शिबिर आयोजित करण्यात येणार असून, यामध्ये सिएफए सोसायटीमधील तज्ञ व्यक्ती आर्थिक नियोजन, गुंतवणूक, आर्थिक फसवणूक व त्यापासून वाचण्याचे उपाय, इत्यादी  विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. 
 • सगळी सोंग करता येतात, पण पैशाचे सोंग आणता येत नाही. परंतु योग्य आर्थिक नियोजन केल्यास आर्थिक अडचणींना दूर ठेवणं सहज शक्य होतं.
 • या शिबिरांमध्ये देशातील नामांकित अर्थतज्ञ बचत, गुंतवणूक आणि सांपत्तिक वाढ कशी करता येईल, याबद्दल सोप्या शब्दात मार्गदर्शन करतील.

संगमनेर दौरा:

 • काल दि. १६/११/२०१९ रोजी पुण्यामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये इतर माननीय वक्त्यांसोबतच  सुप्रसिद्ध गुंतवणूक सल्लागार श्री. भरत फाटक यांनी गुतंवणूक कुठे, कधी व कशी करायची, त्यामधील धोके, फसवणूक याबद्दल महत्वपूर्ण माहिती सांगितली, तर एनएसडीएलचे असिस्टंट मॅनेजर श्री. मेहुल मेहता यांनी आर्थिक नियोजन व अर्थसाक्षरता याबद्दल अत्यंत सोप्या शब्दात बहुमूल्य मार्गदर्शन केले. 
 • आज दि. १७/११/२०१९ रोजी संगमनेर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 
 • यासाठीचा प्रवेश विनामूल्य असून, भारतातील आर्थिक क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती सर्वसामान्य जनतेशी संवाद साधून त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करतील.

नाशिक दौरा

नाशिकमध्ये, येत्या सोमवारी, दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ रोजी, “सीएफए सोसायटी व एन एसडील (NSDL)” पुरस्कृत आर्थिक साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 

स्थळ-

परशुराम सभागृह, एम जी रोड

वेळ- सायंकाळी ५.०० – ७.००

प्रवेश नि:शुल्क आहे. 

आयोजक- सिएफए सोसायटी, इंडिया आणि  एसडील (CFA Society India & NSDL)

कार्यक्रमाची रूपरेषा 

 • सूत्रसंचालन व मुख्य संकल्पना – श्री.श्रीनिवास कुंटे, (CFA, CIPM, Director, CFA Institute ) – १५ मिनिटे   
 • आर्थिक नियोजन – श्री  विनायक सप्रे – ४५ मिनिटे
 • आर्थिक साक्षरतेवर एक छोटेसे नाट्य – १५ मिनिटे 
 • एका तरुण दाम्पत्याबरोबर आर्थिक संवाद – १५ मिनिटे 
 • श्री. मेहुल मेहता, श्री.संदीप वर्मा, NSDL (एन.एस.डी.एल) – १० मिनिटे
 • श्री. महेश पवार (SEBI)- १० मिनिटे
 • आभार प्रदर्शन – ५ मिनिटे

(सदर कार्यक्रम सिएफए सोसायटी व एन एस डी एल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला आहे.  अर्थसाक्षरतेच्या प्रसारासाठी भारतातील गुंतवणूक व्यवसायातील नामांकित व्यक्तींची तगमग व त्यासाठी ते घेत असलेली मेहनत याबद्दलची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचावी व त्यांना त्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने सदर लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.) 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

टेलिग्राम ॲपवर आम्हाला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आमचे @arthasakshar हे चॅनेल सबस्क्राइब करा-  

https://t.me/arthasakshar

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपनी ही एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असलेली, व्यक्ती अथवा समूहाने विशिष्ट उद्देशाने स्थापन संस्था आहे तिला शाश्वत उत्तराधिकार असतो. कायद्याने तिला स्वतंत्र व्यक्तीसारखी कृत्रिम ओळख दिली असून तिला स्वतःची मुद्रा (Seal) असते. ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष आणि नोंदणी केलेले राज्य याचा उल्लेख असतो. त्याचा उपयोग कंपनीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. व्यक्तीची ओळख ज्याप्रमाणे सहीने सिद्ध होते त्याप्रमाणे कंपनीची ओळख तिच्या मुद्रेने होते. अशा प्रकारे कंपनीची मुद्रा असण्याचे कायदेशीर बंधन आता नाही. तरीही काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट करण्यासाठी अजूनही याची गरज लागते. भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष प्रकारावरून चार तर त्यावर नियंत्रण कोणाचे? यावरून तीन प्रकार आहेत. याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात.

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…