Reading Time: 4 minutes
  • “मित्रा जरा पैसे उधार देतोस का? आठवड्यात परत देतो” असे वाक्य तुम्ही हमखास महिन्या दरमहिन्याला कॉलेज, शाळेत, सहलीत ऐकतच असता. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बचत आणि खर्च ह्यांच्यात जणू टॉम अँड जेरीचा खेळ सुरू असतो. 
  • कधी बचत  जास्त तर कधी डोक्यावर खर्चाचा भार…! घरातून मिळालेला पॉकेट मनी असो, इतरांकडून घेतलेली उधारी असो, बक्षिसात मिळालेले पैसे असो किंवा इतर कोणत्याही सेव्हींग्ज, महिन्याच्या शेवटी सारे काही गायब…! 
  • अर्थात विद्यार्थी जीवनात असे होणे स्वाभाविक आहे. पण ह्याला योग्य वेळी वळण मिळाले नाही तर मोठं नुकसान होणार हे मात्र नक्की. ह्या वयातच मनी मॅनेजमेंट जमलं नाही तर पुढे हातात पैसे टिकणार तरी कसे. 
  • नोकरी लागल्यावर तर महिन्याआखेरी पगार अदृश्य होईल. व्यवसाय केला तर दोन महिन्यात घरी बसावं लागेल. अर्थात ही भीती नाही तर सावधानतेचा सल्ला आहे. मुलांनी ह्याच वयात मनी मॅनेजमेंटची कला अवगत करायला हवी. 
  • अर्थात असे सल्ले सगळे देतात पण त्यासाठी नेमक काय केलं पाहिजे हे मात्र कोणी सांगत नाही. चिंता नका करू आजच्या लेखात आम्ही तुम्हा विद्यार्थ्यांना अशा दहा गोष्टी सांगणार आहोत ज्या पाळल्याने तुम्हाला देखील पैस्यांचे उत्तम नियोजन करता येईल. कधी कुठे कसा आणि किती खर्च करायचा हे तंत्र ध्यानी येईल. 
  • ह्या आहेत त्या दहा मौल्यवान गोष्टी ज्या तुम्हाला आर्थिक सक्षम आणि साक्षर बनवतील.

1.बजेट पक्के करा –

  • विद्यार्थी महिन्याला कॉलेज, शाळा किंवा इतर ठिकाणी जातात तेव्हा अनेकदा खर्च होतो. खर्च खाण्यापिण्याचा असो, फोन च्या ब चा असो किंवा प्रवासाचा. पण हा खर्च दर महिन्याला कमी जास्त होतो. बऱ्याचदा जास्तच वाढत जातो. 
  • त्यामुळे प्रत्येक खर्चाचे बजेट आधीच पक्के करत चला. म्हणजे बजेट पेक्षा जास्त खर्च कोणत्याही एका गोष्टीवर करायचा नाही. हा नियम सगळ्यात पाहिले आपल्या खर्चिक वृत्तीला शिस्त लावेल.एकूण काय तर बजेट च्या बाहेर जायचं नाही.

2.आपल्या खर्चांची नोंद ठेवत चला –

  • विद्यार्थी मित्र अनेकदा अनावश्यक खर्च करत असतात. पण ते त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे प्रत्येक खर्चाची नोंद ठेवत जायची. कागदावर, एक्सेल स्प्रेडशीटवर किंवा अगदी कायम हाताशी असणाऱ्या फोन मध्ये सुध्दा चालेल. पण नोंद करणे आवश्यक आहे. 
  • ह्याने होईल अस की महिना अखेरीस कोणते खर्च अनावश्यक होते, कोणते खर्च टाळता आले असते हे समजत जाईल. यामुळे बचत करण्याची सवय आपल्या स्वभावातच निर्माण होईल.

नक्की वाचा – श्रीमंत व्हायचय? तरुणांनो गुंतवणूक करताना या 6 चुका टाळा!

3.उधार घेतलेल्या पैशांची नोंद ठेवा –

  • अनेकदा आपण मित्रांकडून उधारी घेत असतो. पण जेव्हा मित्र त्याचे पैसे परत मागतो त्या वेळी आपल्याकडे देण्यासाठी पैसे नसतात. 
  • महिन्याला मिळालेला पॉकेट मनी आपण खर्च केलेला असते. त्यामुळे आता उधार घेतलेल्या पैशांवर लक्ष ठेवा. त्यांची नोंद करत चला आणि महिन्याला मिळालेल्या पॉकेट मनी किंवा कोणत्याही बचती मधून आधी उधारीची रक्कम बाजूला करत जा. 
  • ह्याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे मित्राची उधारी वेळेवर चुकवता येईल आणि बाजूला काढलेल्या रक्कमे मुळे हातात कमी पैसे राहतील ज्याने खर्च करण्याची इच्छा पण कमी होईल. अर्थात बचत होईल हा फायदाच झाला की.

4.गरजा आणि अपेक्षांची विभागणी करा –

  • अनेकदा आपण गरजेपेक्षा जास्त खरेदी करतो. फक्त अपेक्षा, इच्छा आहे म्हणून. एखादी गोष्ट आवडली की विचार न करता आपण घेतो. त्यामुळे खर्च वाढतो. 
  • केवळ गरजांचा विचार करावा असे नाही. पण आधी गरजा भागवून नंतर पैशांचा विचार करत आणि हाती असलेली रक्कम बघत इतर इच्छा अपेक्षांप्रमाणे खर्च करावा.

5.इतरांच्या तुलनेत खर्च करणे थांबवा –

  • अनेकदा विद्यार्थी एखादी गोष्ट गरज म्हणून नाही, इच्छा म्हणून नाही तर दुसऱ्या मित्राकडे पाहून ती घेत असतात. मग भले ही त्या गोष्टीचा वापर होवो अथवा न होवोत पण मित्राकडे आहे मग आपल्याकडे पण पाहिजे अशी तुलना सुरू होते. पण ह्या तुलनेमुळे खर्चाचा डोंगर वाढतो. 
  • फोन, घड्याळ, कपडे हे आपल्या पसंती आणि गरजेपेक्षा मित्र कसे वापरतात हे पाहून आपण खर्च करणे आता टाळले पाहिजे. ह्यामुळे पैशांची खूप बचत होईल इतके नक्की.

6.स्टेशनरी चे समान एकत्र खरेदीचा प्रयत्न करा –

  • पेन्सिल, पेन, वाही, पुस्तके, इत्यादी गोष्टी तशा किमतीने किरकोळ वाटत असतात. पण जर तुम्ही खर्च काढलात तर समजेल की ह्यावर खूप पैसा खर्च झालेला असतो. 
  • आता स्टेशनरीचे समान गरज पण आहे. त्यामुळे ते सामान एकत्र घेण्याचा प्रयत्न करा. वर्षातून एकदाच वाह्यांचा सेट, कंपास बॉक्स, असे समान घ्या. जेणेकरून त्यावर मोठ्या प्रमाणात सवलत ही मिळेल आणि वेगवेगळं घेऊन होणारे नुकसान पण नाही होणार.

7.ऑनलाइन डिस्काउंट ऑफर्सवर लक्ष ठेवा –

  • ज्या वस्तू आपल्या जवळच्या दुकानात इतक्या महाग मिळतात त्याच वस्तू ऑनलाईन साईटवर खूप स्वस्त मिळतात. 
  • अनेकदा, सणांमुळे, विशेष महिन्या मुळे ऑफर्स आणि डिस्काउंट  असतात. त्याचा फायदा देखील होतो तो वेगळाच. 

नक्की वाचा – कर्ज देणाऱ्या ‘ॲप सावकारी’ पासून सावधान!

8.विद्यार्थी ऑफर्सचा फायदा घ्या –

  • अनेकदा स्टार बॉक्स, डोमिनोज अशा कंपन्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत देत असतात. विद्यार्थी नेहमीच अशी खरेदी करतात त्यामुळे ह्या प्रकारच्या डिस्काउंट विद्यार्थ्यांना देणे ह्या ब्रँड्स ला सोपे जाते. म्हणून विद्यार्थ्यांनी नेहमीच आपले आयडी कार्ड किंवा ओळखपत्र सोबत ठेवावे. 
  • सगळीकडे अशा डिस्काउंटची चौकशी करावी. बघा नक्कीच फायदा होईल आणि म्हणतात ना पैसे वाचवणे हे पैसे मिळवण्या सारखेच असते. त्यामुळे आपल्या विद्यार्थी असण्याचा पुरेपूर फायदा घ्या.

9.स्वतः मध्ये केलेली गुंतवणूक महत्त्वाची –

  • अनेकदा अशा ठिकाणी खर्च होतो ज्याचा नंतर काही उपयोग पण होत नाही. विद्यार्थी जीवनात स्वतः च्या विकासावर केलेला खर्च हा उत्तम असतों. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सॉफ्ट स्किल्स ह्या अशा काही गोष्टी आहेत की ह्यांच्यावर केलेला खर्च हा विद्यार्थ्यांना आयुष्यभरा साठी उपयोगी ठरतो. 
  • वेगवेगळे सेमिनार, कोर्स केल्याने आज थोडा खर्च होईल पण ह्याचे फायदे आयुष्यभर उपभोगता येतील. काही गोष्टींचा फायदा लगेच मिळत नसतो. पण तो जेव्हा मिळतो तेव्हा मोठ्या प्रमाणात मिळतो इतकं नक्की. म्हणून विद्यार्थ्यांनी आता स्वतः वर आणि स्वतःच्या व्यक्ती विकासावर खर्च करावा. स्वतः मध्ये गुंतवणूक करावी.

 

 

  • विद्यार्थी मित्रांनी जर वरील मार्ग आत्मसात केले तर नक्कीच महिना आखेरी हातात पैसे उरतील. खर्च कमी झाल्याने हातात आता जास्त प्रमाणात पैसे असतील. तर ह्या पैशांचे काय करायचे हा प्रश्न आहे. अर्थात नुसते ठेऊन दिलेत तर नवीन खर्च करायची इच्छा होणार. आणि पुन्हा खर्चाचा डोंगर वाढणार. 
  • त्या पेक्षा हे पैसे उत्तम ठिकाणी गुंतवले पाहिजे. अनेक मार्ग असतात. अनेक माध्यम असतात जिथे हे पैसे गुंतवले जाऊ शकतात. ह्यामुळे पैशांची बचत तर होईलच पण वर व्याज देखील मिळेल. पुढच्या दृष्टीने ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना खूप मदतीच्या ठरतील.

अर्थात आर्थिक नियोजन म्हणजे खूप काही मोठं काम नाही. पण आपल्या खर्चांवर, पैशांवर, उधारी तसेच इतर गोष्टींवर लक्ष ठेवणे. बजेट काढून त्या प्रमाणे खर्च करणे. उत्तम ठिकाणी पैसे गुंतवणे आणि स्वतः च्या विकासा साठी गुंतवणूक करणे. झालं.. जमलं की तुम्हाला आर्थिक नियोजन !

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…