Reading Time: 3 minutes

गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन आपल्या घरी होते. घरात प्रार्थना किंवा गणपती आरती झाल्यानंतर गणेश स्तोत्र म्हटले जातात. या गणेश स्तोत्रामध्ये गणपतीच्या बारा नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. 

अ. गणपती बाप्पाच्या नावांतून आपल्याला आर्थिक बाबींमध्ये काय शिकायला मिळते ते आपण बघूया –

१. लंबोदर –

 • गणपती बाप्पाला लंबोदर नावाने ओळखले जाते. लंबोदर म्हणजे मोठं पोट असणारी गणपती देवता. गणपती देव भक्तांच्या सर्व चुका त्याच्या पोटात घेत असतो. 
 • आपण सुरुवातीला गुंतवणूक करताना चुका करत असतो. गुंतवणुकीला सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा तोट्याला सामोरे जावे लागते. पहिल्या चुका पोटात घेऊन आपण परत अभ्यास करून गुंतवणुकीला सुरुवात करायला हवी. . 
 • यातून नफा आणि तोटा दोन्ही सहन करण्याची शक्ती आपल्यात निर्माण होते. म्युच्युअल फंड किंवा प्रत्यक्ष शेअर्स गुंतवणुकीमध्ये सतत  आवश्यक आहे.  

 

२. एकदंत –

 • गणपतीला एकदंत म्हणून सुद्धा ओळखले जाते.तुमचा उत्पन्नाचा एकच मार्ग सुरु असेल तर तुम्ही पैशांचे योग्य नियोजन नक्कीच करायला हवे. 
 • आपण छोट्या छोट्या गुंतवणुकींमधून पैशांचे आर्थिक नियोजन करू शकता. त्यासाठी मासिक पगार किंवा बचतीतून गुंतवणूक करायला हवी.  
 • पोस्ट ऑफिस सेव्हिंग डिपॉझिट, मुदत ठेव आणि रिकरिंग डिपॉझीट मध्ये आपण पैशांची गुंतवणूक करू शकता. विशिष्ट कालावधीनंतर आपल्याला या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळतो. 

 

३.  धुम्रवर्ण

 • धुम्रवर्ण या शब्दाचा अर्थ धुरासारखा रंग असा होतो. गणपती जिथे असतो तिथे अग्नी असतो आणि तिथे धूर निर्माण होतो. गणपती हा तेज तत्वाचा स्वामी मानला जातो.
 • गुंतवणूक करत असताना धुम्रवर्ण शब्दाचा अर्थ समजून घ्यायला हवा. कुठेही गुंतवणूक करताना अभ्यास करून, चौकस बुद्धीने, सर्व बाजूंनी विचार करूनच आपल्या कष्टपूर्वक मिळवलेल्या पैश्याची गुंतवणूक करायला हवी. 
 • जेथे जास्त फायदा आणि लालच दाखवली जाते तिथे संशयाचा धूर निर्माण होतो. अशा ठिकाणाची गुंतवणूक फसवी असते. त्यामुळे आर्थिक नियोजन करताना धुम्रवर्ण शब्द कायम लक्षात ठेवावा. 

 

४. विकट – 

 • गणपती बाप्पाला विकट नावाने ओळखले जाते. विकट या शब्दाचा अर्थ विकृत बुद्धीचा नाश करून मोक्ष देणारा होय. 
 • गुंतवणूक करत असताना विकट शब्द कायम लक्षात ठेवावा. तुम्ही जेव्हा गुंतवणूक करता तेव्हा अनावश्यक आणि दिखाऊ ऑफर्सला टाळून गुंतवणुकीतून चांगला परतावा देणाऱ्या पर्यायांचा विचार करायला हवा. 
 • क्रेडिट आणि डेबिट कार्डवर ऑफर असताना त्यांची खरेदी करू नये. गरज नसताना अशा अनेक ऑफर्सला भुलण्यापेक्षा योग्य गुंतवणूक केलेली चांगली ठरते. 

 

नक्की वाचा : Personal Budget: मासिक बजेट तयार करण्याच्या ११ स्टेप्स

 

ब. गणेश उत्सवातुन आपल्याला आर्थिक बाबींमध्ये काय शिकायला मिळते ते आपण बघूया –

१. कालावधी –

 • गणपती सणाचा कालावधी ठरलेला असतो. सगळीकडे गणपती एकाच दिवशी येतो. पण त्याच्या विसर्जनाचा दिवस मात्र सगळीकडे वेगवेगळा असतो. दीड दिवसापासून ११ दिवसापर्यंत गणपतीचे विसर्जन होत असते. 
 • प्रथा आणि परंपरेनुसार त्याचे विसर्जन केले जाते. आपणही आपल्या आर्थिक नियोजनामध्ये आपल्या ऐपतीप्रमाणे आणि बचतीनुसार गुंतवणूक करू शकता. 
 • आपण गुंतवणुकीला सुरुवात केल्यानंतर परतावा मिळेपर्यंतचा कालावधी ठरलेला असतो. 

 

२. शिस्तबद्धता –

 • गणपती सणाची सुरुवात शिस्तबद्धतेत होत असते. गणपतीच्या आगमनापासून त्याच्या विसर्जनापर्यंतचे नियोजन ठरलेले असते. त्याच्या आरतीची आणि प्रसादाची वेळ ठरलेली असते. 
 • आपण आर्थिक नियोजन करताना शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे. खर्चाचा ताळेबंद लिहिणे, कर्ज वेळेवर भरणे आणि अनावश्यक खर्च टाळणे या सवयींनी शिस्तबद्धता अंगी येते. 
 • शिस्तीने आर्थिक गोष्टींचे पालन केले तर भविष्यात अडचण येत नाही. 

 

३. टीमवर्क – 

 • गणपती बाप्पा बसल्यावर घरात  काम करताना कुटुंबातील सर्वजण एकत्र येतात. कोणी गणपतीची सजावट करते, कोणी मूर्ती घेऊन येते तर कोणी नैवैद्य बनवण्याचे काम करत असते. 
 • गणपती बसल्यापासून विसर्जन होईपर्यंत सर्वजण एकत्र बसून काम करत असतात. आर्थिक व्यवहाराची घडी बसवताना कुटुंबातील सर्वानी एकत्र येऊन करणे गरजेचे आहे. कुटुंबातील प्रत्येकाचा निर्णय आर्थिक व्यवहारांमध्ये महत्वाचा असतो. 

 

४. मोदक – 

 • गणेशाचा आवडता प्रसाद असणारे मोदक आर्थिक नियोजनातील संयम शिकवून जातात. गणेशाची आरती होईपर्यंत मोदक खाण्यासाठी संयम ठेवावा लागतो. त्यानंतर गोड प्रसादाचा आस्वाद घेण्याची संधी दिली जाते. 
 • फसव्या योजनांपासून स्वतःचे रक्षण करून दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर त्याचे फळ चांगला परतावा म्हणून मिळतो. त्यामुळे झटपट मिळणाऱ्या पैशांच्या योजनांपासून लांब राहावे. 

 

नक्की वाचा : गणपती बाप्पाची नावे आणि बचत व आर्थिक शिस्तीचे मार्ग

 

क. गणेशाची देहयष्टी आणि आर्थिक नियोजन 

१. गणेशाचे मोठे डोके –

 • आर्थिक गुंतवणूक करत असताना संकट आल्यावर त्याच्यावर मात करून पुढे जाता यायला हवे. 
 • आर्थिक गुंतवणूक करत असताना एखादी अडचण आली तर त्याच्यावर मात करून आपण पुढे जाऊ शकता. एखाद्या वेळेला धोका पत्करून मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा छोटी गुंतवणूक केलेली चांगले राहते. 

 

२. गणपतीचे बारीक डोळे – 

 • गणपतीचे बारीक डोळे सांगतात की आर्थिक गुंतवणूक करताना छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. आर्थिक गुंतवणूक करत असताना बारकाईने काळजी घेणे गरजेचे असते. 
 • विमा पॉलिसी, म्युच्युअल फंडमध्ये  गुंतवणूक केल्यानंतर त्यामधील  नियम वाचणे गरजेचे असते. ते नियम वाचल्यानंतर आपल्यावर भविष्यात येणारी नामुष्की टाळता येऊ शकते. 

 

३. गणपतीचे मोठे कान  –

 • आर्थिक गुंतवणूक करताना किंवा केल्यानंतर कान कायम उघडे ठेवत जा हे गणपतीचे मोठे कान सांगतात. 
 • आपण दीर्घकालीन गुंतवणूक केली की निश्चित होऊन जातो पण जगभरात घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवायला हवे. या घटनांचा परिणाम तुम्ही गुंतवलेल्या गुंतवणुकीवर होत असतो. त्यामुळे याबद्दलची माहिती घेणे गरजेचे आहे. 

 

४. गजाननाची सोंड –

 • गणपतीच्या मोठ्या सोंडेकडून शिकायला मिळते की परिस्थिती कितीही अडचणीची असली तरीही तुम्ही त्यातून बाहेर पडायला शिकले पाहिजे. 
 • समजा एखाद्या गुंतवणुकीत तोटा झाला तर त्यातून बाहेर पडून काय करता येईल हे तुम्हाला ठरवता यायला हवे. एखादा अडचणींचा प्रसंग शांतपणे आणि संयमाने सांभाळून नेला तर सगळं काही व्यवस्थित होते. 

 

गणपती देवतेच्या नाव, देहयष्टी आणि कार्यक्रम पद्धतीतून आर्थिक नियोजन आणि अर्थसाक्षरता शिकायला मिळते गुंतवणूक करत असताना सण समारंभाच्या काळात शिकण्यासारखे खूप असते. आपण त्यातील प्रत्येक गोष्टीमधून शिकत राहायला हवे, तरच आपले सण उत्सव खऱ्या अर्थाने सार्थकी लागतील.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…