क्रेडिट कार्ड
https://bit.ly/2KvKYTR
Reading Time: 3 minutes

क्रेडिट कार्ड कसे वापरावे?

क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर तुम्ही त्याचा कसा आणि किती जास्त वेळा वापर करता, त्यावर तुम्हाला मिळणारे लाभ आणि रिवॉर्ड पॉईंट्स अवलंबून असतात. त्यामुळे त्याचा वापर प्रभावीपणे करता येणे महत्त्वाचे आहे. कधी कोणत्या प्रकारच्या खरेदीवर क्रेडिट कार्ड वापरावे हे माहित असणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हालाही स्मार्ट बनावे लागेल. त्यासाठी या काही टिप्स पाहूया..   

हे नक्की वाचा: क्रेडिट कार्ड घेताना माहित करून घ्या या ६ महत्वाच्या गोष्टी

क्रेडिट कार्ड वापरण्याची योग्य पद्धत

१. क्रेडिट कार्डची सर्वात उच्चतम मर्यादा माहित करुन घ्यावी 

 • प्रत्येक व्यक्तीसाठी क्रेडिट कार्डवरील मर्यादा भिन्न-भिन्न असते.
 • तुम्ही पहिल्यांदा कार्ड घेत आहात, की अशा सेवेचे नियमित ग्राहक असून दुसऱ्या किंवा तिसऱ्यांदा प्रिमिअम कार्ड घेत आहात यावर तुमचे क्रेडिट अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही घेत असलेल्या कार्डची उच्चतम मर्यादा किती आहे, हे जरूर विचारावे. 

२. रिवॉर्ड पॉईंट्स, बक्षिसे आणि अन्य लाभांची वेळोवेळी माहिती करुन घ्यावी 

 • क्रेडिट कार्ड आपल्याला विशिष्ट प्रकारच्या खर्च आणि खरेदीवर विविध ऑफर्स आणि रिवॉर्ड्स देत असतात. 
 • जास्त मर्यादा असणारी कार्ड देखील खात्रीशीर गिफ्ट व्हाउचर आणि लाभ मिळवून देतात. त्यासंदर्भातील माहिती नेहमी तुमच्या मोबाईल नंबर किंवा ई-मेलवर मिळत असते. 
 • तसेच आपण विविध खरेदीवर जमवलेले गुण रोख स्वरूपात किंवा कोणत्याही अन्य प्रकारात परत केले जाऊ शकतात. मात्र फसव्या मेसेजना किंवा ई-मेल ला बळी पळू नका. 

महत्वाचा लेख: क्रेडिट कार्ड की वैयक्तिक कर्ज, योग्य पर्याय कोणता? 

३. तुमच्या क्रेडिट कार्डची सर्व बिले वेळेवर भरा

 • क्रेडिट कार्ड च्या बाबतीत ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. याकडे थोडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण बिल वेळेवर न भरणे ही सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. 
 • तसेच अनेकदा तुम्ही बिलाची शेवटची तारीख चुकवत असाल तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. 
 • बिल वेळेवर न भरल्याने दंड म्हणून जादा रक्कम तर भरावीच लागते दुसरीकडे सतत बिल भरण्यात अनियमितता तुम्हाला डिफॉल्ट लिस्ट मध्ये टाकले जाते जेणेकरुन तुमचा स्कोअर खराब होवू शकतो आणि तुम्हाला मिळणारे लाभही कमी होऊ शकतात. 

४. थकबाकीवर किमान देयक भरणे हा नेहमी उपाय असू शकत नाही

 • आपल्या कार्डाच्या थकबाकीवर किमान देय देणे पुरेसे असते आणि जरी शेवटची तारीख चुकली तरी किमान रक्कम भरून दंड टाळू शकतो असा एक चुकीचा समज आहे. 
 • बिलाची तारीख चुकल्यानंतर केवळ दंडच नाही तर जेवढे दिवस तुम्ही उशिर कराल तितके व्याज देखील भरावे लागते. त्यामुळे दंड आणि व्याज असा जादा भार तुम्हाला सोसावा लागतो. 
 • हे टाळण्यासाठी नेहमी सर्व बिले वेळेवर भरा त्यासाठी शेवटच्या तारखेआधी एक तारीख तुम्हीच निश्चित करा. 

५. एटीएम मध्ये क्रेडिट कार्ड वापरू नका 

 • काही बँका क्रेडिट कार्डद्वारे तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा देतात. मात्र शक्यतो ही सुविधा वापरणे टाळा. 
 • जरी परवानगी असेल तरीही क्रेडिट कार्डद्वारे एटीएममधून पैसे काढण्यावर जादा शुल्क आकारले जाते. 
 • तसेच महिन्यातून केवळ एकदा किंवा दोनदा अशाप्रकारे पैसे काढण्याची सुविधा असते. त्यामुळे पैसे काढण्यासाठी केवळ डेबिट कार्डचा वापर करा. 

हे नक्की वाचा: क्रेडिट कार्ड कॅशबॅक एक भुलभुलैया

६. को-ब्रँडेड कार्डची तुम्हाला खरंच गरज आहे का?

 • बाजारात अनेक ब्रँड्स त्यांच्याशी जोडलेली आणि त्यांच्या खरेदीवर विशेष सवलती देणारी को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड घेण्यासाठी नेहमीच ग्राहकांना मोहात पाडतात. 
 • मात्र अशा विशेष कार्डांचा जर वापर करणार असाल तर त्या ब्रँडच्या गोष्टी तुम्ही नेहमी विकत घेता का आणि वर्षातून किती वेळा तुम्ही असे ब्रँडेड वस्तू, कपडे खरेदी करता याचा विचार करा. 
 • अशी कार्ड म्हणजे केवळ कार्ड नसून क्लब असतात. एका छताखाली मिळणारे अनेक लाभ या स्वरुपात ही क्लब कार्ड असतात मात्र तुम्ही तशा प्रकारच्या उच्चभ्रू श्रेणी तील (हाय क्लास सोसायटी) ग्राहक आहात का आणि याचे किती लाभ तुम्ही वर्षभरात घेता याचा विचार करुनच अशी को-ब्रँडेड क्लब कार्ड घ्यावी. 

७. आपल्या क्रेडिट कार्डचे सर्व तपशील सुरक्षित ठेवा 

 • डिजिटल जगात वावरत असताना सुरक्षितता ही नेहमीच पहिल्या क्रमांकाची जबाबदारी असली पाहिजे. बँकिंग आणि आर्थिक सर्व व्यवहार अत्यंत सुरक्षितपणेच केले पाहिजे. यातील सर्व धोक्यांची जाणीव करून घेऊनच व्यवहार करावे. 
 • तुमच्या डेबिट असो की क्रेडिट.. सर्व कार्डाचे सुरक्षा पिन, सीव्हीव्ही क्रमांक, ओटीपी, तुमची जन्मतारीख, पत्ता, कार्डची कालबाह्य होण्याची तारीख या सर्व गोष्टी सुरक्षित ठेवल्या पाहिजे. तुमच्या व्यतिरिक्त त्या कोणालाही समजता कामा नये. 
 • अगदी एटीएम मशिनमध्ये देखील कार्ड वापरताना सर्व खबरदारी घ्यावी. अगदी दुकानात, मॉलमध्ये खरेदी नंतर बील देताना जर पीओएस मशीन विषयी तुम्हाला खात्री नसेल, तर डिजिटल पेमेंट न करता, रोखीने व्यवहार करा. 
 • हल्ली कार्ड क्लोन करण्याचे प्रमाण ही खूप वाढले आहे त्याविषयी योग्य खबरदारी घ्यावी. जेणेकरून तुमच्या कार्डचा गैरवापर टळेल. 

८. आवश्यकता असल्यास क्रेडिट कार्डवर कर्ज मिळवू शकता

 • तुम्ही बँकेचे किती नियमित आणि क्रेडिटेबल ग्राहक आहात, यावर तुम्हाला मिळणाऱ्या सुविधा अवलंबून असतात. 
 • तुमच्या क्रेडिट कार्डाचा एकूण इतिहास जर खुपच चांगला असेल तर कधी खुपच आवश्यकता असल्यास तुम्हाला क्रेडिट कार्डच्या बदल्यात ठराविक रकमेचे कर्ज मिळू शकते. त्यासाठी काही किमान कागद पत्रांवर सही करून आणि काही अटी मान्य करुन बँक तुम्हाला असे कर्ज देऊ शकते. मात्र त्यासाठी तुमचा ग्राहक म्हणून इतिहास (Credit history) खूपच चांगला असला पाहिजे. 

हे नक्की वाचा: क्रेडिट कार्ड आणि सिबिल स्कोअर

९. क्रेडिट कार्डचे बिल वेळोवेळी तपासून पहा 

 • जेव्हा तुम्हाला बिलाची प्रत मिळेल तेव्हा पैसे भरण्यापूर्वी सर्व बिलाची सखोल छाननी करा. 
 • तुम्ही खरेदी केलेल्या तेवढ्याच वस्तुंचे बिल आहे की अन्य काही चुकीची रक्कम दाखवली आहे ते पहा. 
 • खरेदी व्यतिरिक्त अन्य कोणते शुल्क त्या बिलात आहे का ते तपासून पहा. 
 • कोणतीही विसंगती आढळल्यास तसे त्वरीत संबंधित कंपनीला कळवा.  

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…