fire and burglary insurance
Reading Time: 4 minutes

Fire and Burglary Insurance

आजच्या भागात आपण मालमत्तेसंदर्भातील महत्वाच्या विमा प्रकारांबद्दल (Fire and Burglary Insurance) माहिती घेणार आहोत. हा काहीसा दुर्लक्षित पण महत्वाचा विमा प्रकार आहे.

  • सर्वसाधारण लोकांना मुदतीचा विमा, आरोग्य विमा याची प्रामुख्याने गरज असते. याशिवाय अपघात विमा आणि काही गंभीर आजारांचे संरक्षण यासाठी विम्याची गरज पडते.
  • गृहकर्ज देताना आजकाल ते देणाऱ्या कंपन्या या कर्जाच्या फेडीचा विमा उतरवण्याची सक्ती करतात. यामुळे कर्जदाराचे बरेवाईट झाल्यास अन्य कायदेशीर कारवाई करून कर्ज वसुली करण्याऐवजी एकरकमी भरपाई विमा कंपनीकडून मिळण्याची खात्री रहाते.
  • या खालोखाल अनेकांना आग, नैसर्गिक आपत्ती आणि चोरी यामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी विम्याची गरज असते.
  • घर,ऑफिस, कच्चा माल पक्का माल , माल ठेवण्याच्या जागा, उत्पादन प्रक्रियेत अर्धवट असलेला माल, उत्पादन केले जाते ती इमारत व तेथिल यंत्रसामग्री याचे आग, नैसर्गिक आपत्ती, चोरी यामुळे नुकसान होऊ शकते.
  • यासाठी सर्वसाधारण विमा कंपन्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे संरक्षण मिळू शकते. मालमत्तेचा विमा या प्रकारात सदर करार मोडत असून त्यात चल अचल मालमत्तेचा समावेश होतो.
  • सर्वसाधारण विमा कंपन्यांकडून यातील जोखमीचा विचार करून वेगवेगळ्या जोखिमेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय आहेत हे  मान्य केलेले लिखित करार असल्याने त्यातील अटी शर्तीनुसार गरज पडल्यास त्याची भरपाई केली जाते.
  • यात आगीपासून संरक्षण देणारा विमा असल्यास त्यामुळे चोरीपासून असलेले संरक्षण मिळू शकत नाही. यामुळेच ग्राहकाला आपल्या गरजेनुसार वेगवेगळे करार करावे लागतील. यातील अनेक करारांमध्ये विशेष उल्लेख नसेल तर अन्य गोष्टींचा समावेश होत नाही. तर काही गोष्टीपासून आपोआप संरक्षण मिळते.

अग्नीपासून संरक्षण करणारी पॉलिसी 

  • अग्निपासून संरक्षण असलेल्या पॉलिसी मध्ये आगीपासून संरक्षण मिळतेच पण त्याशिवाय वीज पडणे, स्फोट होणे, विमान पडणे, वादळ, महापूर, भूस्तलन, क्षेपणास्त्र चाचणी अशा अनेक प्रकारांनी होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळेल 
  • यामध्ये युद्धजन्य परिस्थिती मुळे होणारे नुकसान, यांत्रिक बिघाड, प्रदूषण,चोरी घरफोडी यामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई केली जात नाही. काही अतिरिक्त रक्कम प्रीमियम म्हणून भूकंपासारख्या घोक्यापासून संरक्षण मिळू शकते.

घरफोडीचा विमा: 

  • यातून घरफोडी आणि घरफोडीच्या प्रयत्नामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळेल. 
  • यामुळे होणाऱ्या नुकसानीची करारातील शर्तींप्रमाणे प्रमाणशीर भरपाई केली जाते. यात दंगल,अतिरेकी कारवाया, चोरी यामुळे होणाऱ्या नुकसानीचा समावेश होऊ शकतो. 
  • यात ताबेकबजातील अन्य व्यक्तीची न नोंदवलेली मालमत्ता, युद्धजन्य कारवाई, संप यासारख्या गोष्टींमुळे होणारे नुकसान भरून दिले जात नाही. 
  • यासाठी संबंधित व्यक्तीस विमाकंपनीची अधिक प्रीमियम भरून मान्यता घ्यावी लागेल.

सर्वसमावेशक विमा: 

  • याचे नाव सर्वसमावेशक असले तरी त्यात सर्वच गोष्टींचा समावेश नसतो. सर्वसाधारणपणे दागिने मौल्यवान वस्तूसाठी असा विमा घेतला जातो व्यक्ती अथवा संस्था यांच्या गरजेनुसार असे संरक्षण उपलब्ध करून दिले जाते.

विमा नियामक व विकास प्राधिकरण मंडळाची मार्गदर्शक तत्वे:

  • लोकांची ही स्वाभाविक गरज लक्षात घेऊन विमा नियामक व विकास प्राधिकरण (IRDA) या विमा नियामाकांनी सर्व सर्वसाधारण विमा कंपन्यांना एकत्रित संरक्षण देणारी एकसमान अटी असणारी सर्वसमावेशक पॉलिसी (Standard Fire and Special Perils Policy) 1 एप्रिल 2021 पासून उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. 
  • याच्या अटीशर्ती काय असतील त्याची रचना करून त्याना संकेतस्थळावर प्रसिद्धी दिली. 
  • यात सर्वसामान्य व्यक्ती, व्यावसायिक यांच्या किमान गरजांचा केला असून याचा प्रीमियम हा प्रत्येक कंपनीस वेगळा ठरवण्याचा अधिकार असला तरी रचना प्राधिकरणाने सुचवल्याप्रणाने आहे. 
  • व्यक्तिगतरित्या उपलब्ध पॉलिसीस भारत गृह रक्षा पॉलिसी असे याचे नाव असेल तर उद्योगासाठी भारत सूक्ष्म उद्योग सुरक्षा, भारत लघु उद्योग सुरक्षा या दोन पॉलिसी उपलब्ध आहेत यामुळे सर्वसाधारण लोक, लघु उद्योजक यांच्या विम्याच्या किमान प्राथमिक गरजा पूर्ण होतील.
  • भारत गृह रक्षा पॉलिसीद्वारे घराशिवाय घरातील वस्तुंना पॉलिसी रकमेच्या 20% मर्यादेत परंतू अधिकतम 10 लाख रुपयांचे संरक्षण देते हे संरक्षण कोणतीही माहिती न देता मिळते याहून अधिक रकमेचे संरक्षण हवे असेल तर त्याची स्वतंत्र यादी व पुरावे द्यावे लागतील. 
  • या प्रकारच्या भारत सूक्ष्म उद्योग सुरक्षा पॉलिसीमुळे सूक्ष्म उद्योगाना जास्तीतजास्त 5 कोटी तर भारत लघु उद्योग सुरक्षा पॉलिसीमुळे लघुउद्योगांना 50 कोटीपर्यंत संरक्षण मिळेल. 

संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आपल्या गरजेनुसार अशी पॉलिसी घेण्याचा विचार करता येईल. अनेक कंपन्यांनी अशा प्रकारच्या योजना बाजारात आणल्या आहेत.

खाली दिलेल्या 5 चित्रांमध्ये –

1 ल्या चित्रात या पॉलिसीत असणाऱ्या सुविधा दर्शवतो. 

Fire and Burglary Insurance

 

2 ऱ्या चित्रात कोणत्या अधिकच्या सुविधा जास्त प्रीमियम भरून मिळू शकतात ते दाखवले आहे.

 

इतर सर्व 3,4,5 क्रमांकाची चित्रे यामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट नाहीत ते दर्शवतात.

– उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Fire and Burglary Insurance in Marathi, Fire and Burglary Insurance Marathi Mahiti, Fire and Burglary Insurance Marathi, Fire and Burglary Insurance mhanje kay 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.